
रेवती हिंगवे, पुणे:
Maharashtra Heavy Rain: गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याआधी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पाऊस आणि मॉन्सून लवकर राज्यात दाखल झाल्यामुळे 34 हजार हेक्टरहून अधिक बाधित क्षेत्र राज्यभरात आहेत. त्याबद्दलचे पंचनामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत.तर वापसा आल्यावरच पेरणी करावी अस आवाहन कृषी संचालकांकडून करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुठल्या जिल्ह्यात किती हेक्टरच आणि कुठल्या पिकांच नुकसान झाल आहे?
जिल्हा: अमरावती
बाधित क्षेत्र (हेक्टर): 12,295
कुठले पीक: मूग, कांदा,ज्वारी, केळी, संत्रा आणि इतर
जिल्हा: जळगाव
बाधित क्षेत्र (हेक्टर): 4538
कुठले पीक: कांदा, मका, ज्वारी, केळी, पपई, आंबा, भाजीपाला
जिल्हा: बुलढाणा
बाधित क्षेत्र (हेक्टर): 4003
कुठले पीक: उ. मूग, उडीद, मका, पपई, कांदा, भाजीपाला, केळी
जिल्हा: नाशिक
बाधित क्षेत्र (हेक्टर): 3230
कुठले पिक: बाजरी, मका, डाळिंब, आंबा, कांदा, भाजीपाला
जिल्हा: जालना
बाधित क्षेत्र (हेक्टर): 1726
कुठले पीक: पपई, केळी, बाजरी, भाजीपाला
जिल्हा: चंद्रपूर
बाधित क्षेत्र (हेक्टर): 1308
कुठले पीक: मका, धान, फळपिके
जिल्हा: सोलापूर
बाधित क्षेत्र (हेक्टर): 1252
कुठले पीक: केळी, आंबा, डाळिंब
जिल्हा: अहिल्यानगर
बाधित क्षेत्र (हेक्टर): 1156
कुठले पीक: बाजरी, कांदा, पपई, मका, केळी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world