IAS Transfer: पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका! राज्यातील 8 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली; राज्य सरकारचा निर्णय

  महाराष्ट्र राज्य प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचे फेरबदल करत शासनाने बुधवारी आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra IAS Transfer: राज्य सरकारकडून प्रशासकीय सेवेतील आएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका सुरुच आहे. राज्याचे अधिवेशन सुरु असतानाच  महाराष्ट्र राज्य प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचे फेरबदल करत शासनाने बुधवारी आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 

राज्यातील ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

​यामध्ये महत्त्वाच्या बदलांमध्ये श्री रुचेश जैवंशी यांची महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांना आता अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, श्री निलेश सागर यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे येथे आयुक्तपदी वर्णी लागली असून, आदिवासींच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Advertisement

रिक्षा-टॅक्सी, बस चालकांनो लक्ष द्या! वाहन चालकांसाठी मराठीचे ज्ञान सक्तीचे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

​शहरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरही मोठे फेरबदल झाले आहेत. डॉ. मंगेश गोंदवले यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्री पंकज देवरे हे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) येथे सह महानगर आयुक्त म्हणून कार्यरत असतील. याशिवाय, श्री श्रीधर डुबे यांची राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाचे (NRLM) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

​सिडको आणि महिला व बालविकास आयुक्तालयासारख्या संवेदनशील विभागांतही नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. श्री जगदीश मिनियार हे आता छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळतील, तर सौ. वर्षा लड्डा महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त म्हणून पुणे येथे कार्यभार स्वीकारतील. डॉ. मंजिरी मनोलकर यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. हे फेरबदल येत्या काही दिवसांत प्रभावीपणे अमलात येतील, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

काळजावर दगड ठेवून सासऱ्यांनी स्वतः केले सुनेचे कन्यादान! 'या' विवाह सोहळ्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले