Mahad Election Result: भरत गोगावलेंनी गड राखला, महाडमध्ये सुनील तटकरेंना धक्का, वाचा निकाल

महाडमध्ये शिवसेनेचे सुनील कविस्कर यांनी दणदणीत विजय मिळवत महाडवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Local Body Election Result 2025: कोकणातील नगररपरिषद तसेच नगरपंचायतींचे निकाल लागण्यास आता सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा महाड आणि श्रीवर्धनच्या निकालांची होत आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. महाडमध्ये शिवसेनेचे सुनील कविस्कर यांनी दणदणीत विजय मिळवत महाडवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

महाडमध्ये सुनील तटकरेंना दणका...

महाड नगरपरिषदेमध्ये शिववसेना शिंदे गटाचे 8 नगरसेवक विजयी झाले असून मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेचा गड राखला आहे.  दुसरीकडे, श्रीवर्धनमध्येही तटकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. येथे उबाठा गटाचे अतुल चोगुले यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अवघ्या ८६ मतांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादी-भाजप युतीचे बाळा सातनाग यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

Maval Election Result: एका मताने निकाल फिरला, अजित पवारांचा शिलेदार जिंकला, राज्यातील पहिला विजय!

​चिपळूणमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ यांनी १२५८ मताधिक्य घेत विजय मिळवला. येथे शरद पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव झाला आहे.  राजापूर नगरपरिषदेत मात्र काँग्रेसने आपले अस्तित्व राखले असून हुस्नबानू खलिफे यांनी शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर यांचा पराभव केला. पालघरमधील जव्हार नगरपरिषदेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत विजयी झाल्या असून २० पैकी १४ जागांवर भाजपने कमळ फुलवले आहे.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live: कोकणात भाजपची पिछेहाट, शिवसेना शिंदे गटाची मुसंडी