राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून आज देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत घोषणा होणार आहे. त्याआधी भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.
Live Update : नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड परिसरात पोलीस आणि नक्षली चकमकीत एक जवान शहीद
नक्षलविरोधी शोध मोहीमे करिता ३ डिसेंबरला नारायणपूर जिल्ह्यामधून DRG आणि BSF ची एक संयुक्त दल अबुझमाड परिसरातील पोलीस स्टेशन सोनपूर आणि कोहकामेट्टा सीमा भागात रवाना झाली होती. मोहीम राबवत असतांना आज दुपारी 1 वाजल्यापासून संयुक्त सुरक्षा दलाचे पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान नक्षलवाद्यांशी लढाई करताना, डीआरजी नारायणपूरचे हेड कॉन्स्टेबल बिरेंद्र कुमार सोरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. शहीद सैनिक बिरेंद्र कुमार सोरी 2010 मध्ये नारायणपूर जिल्हा दलात हवालदार म्हणून भरती झाले होते आणि नक्षल ऑपरेशनमध्ये त्यांच्या वीर कार्यासाठी त्यांना 2018 मध्ये माजी हेड कॉन्स्टेबल पदावर बढती देण्यात आली होती. नक्षलविरोधी गस्त आणि शोध मोहीम अजूनही सुरू आहे.....
Live Update : एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी कोणत्या नेत्यांना मिळाली?
राज्याच्या राजकारणात एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळवणाऱ्या नेत्यांच्या यादीत आता देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होत आहे. आतापर्यंत सहा नेत्यांनी एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले असून, फडणवीस सातवे नेते असणार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपदी राहण्याची संधी शरद पवारांनना मिळाली आहे...दरम्यान कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहेत.
शरद पवार
४ वेळा मुख्यमंत्री
वसंतराव नाईक
३ वेळा मुख्यमंत्री
वसंतदादा पाटील
३ वेळा मुख्यमंत्री
शकंरराव चव्हाण
२ वेळा मुख्यमंत्री
अशोक चव्हाण
२ वेळा मुख्यमंत्री
विलासराव देशमुख
२ वेळा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
Live Update : एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी कोणत्या नेत्यांना मिळाली?
राज्याच्या राजकारणात एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळवणाऱ्या नेत्यांच्या यादीत आता देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होत आहे. आतापर्यंत सहा नेत्यांनी एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले असून, फडणवीस सातवे नेते असणार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपदी राहण्याची संधी शरद पवारांनना मिळाली आहे...दरम्यान कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहेत.
शरद पवार
४ वेळा मुख्यमंत्री
वसंतराव नाईक
३ वेळा मुख्यमंत्री
वसंतदादा पाटील
३ वेळा मुख्यमंत्री
शकंरराव चव्हाण
२ वेळा मुख्यमंत्री
अशोक चव्हाण
२ वेळा मुख्यमंत्री
विलासराव देशमुख
२ वेळा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
Live Update : उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिका निमांत्रितांसाठी द्यायला सुरुवात
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह इतर मंत्री पण उद्या शपथ घेणार?
विशेष आमंत्रण पत्रिकेवर "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाचा शपथविधी" म्हणून मजकूर प्रसिद्ध
"मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथ विधी सोहळा" असे देखील या आमंत्रण पत्रिकेवर मजकूर
उद्या होणाऱ्या शपथ विधी सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिका निमांत्रितांसाठी द्यायला सुरुवात
दुपारी ३ वाजता निमंत्रण असलेल्यांना आझाद मैदानावर उपस्थितीत राहण्याच्या सूचना
Live Update : 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
Live Update : एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिवसेनेचे नेते उपस्थित
एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिवसेनेचे नेते उपस्थित.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गप्पा सुरू
मात्र अधिकृत रित्या शिंदेंनी कुणालाच काहीही सांगितलं नाही
Live Update : मारकडवाडीत जमावबंदी आदेश झुगारल्या प्रकरणी गुन्हे दाखल..
मारकडवाडीत जमावबंदी आदेश झुगारल्या प्रकरणी गुन्हे दाखल..
आमदार उत्तम जानकर यांच्यासह प्रमुख 88 कार्यकर्ते आणि अज्ञात 150 लोकांवर गुन्हा दाखल
नातेपुते पोलीस ठाण्यात मारकडवाडी प्रकरणात गुन्हे दाखल
Live Update : नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदें उपमुख्यमंत्रिपदी - सूत्र
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्री मंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असून सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Live Update : महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद
Live Update : एकनाथ शिंदेंचं संध्याकाळपर्यंत समजेल, पण मी शपथ घेणार हे नक्की!
एकनाथ शिंदेंचं संध्याकाळपर्यंत समजेल, पण मी शपथ घेणार हे नक्की!
सकाळी घेतलेली ते राहून गेलं होतं, आता 5 वर्ष टिकवू
- अजित पवार
Live Update : एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही यामध्ये संभ्रम कायम
आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या कल्याणकारी योजना कधीच झाल्या नव्हत्या, आम्ही केवळ निर्णय घेतल्या नाहीत तर राबवल्या. देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन. पुढील प्रवास यशस्वी आणि राज्याचा विकास करणारा ठरेल आणि त्यात सर्वांचा सहभाग असेल.
Live Update : देवेंद्र फडणवीसांना माझा पूर्ण पाठिंबा
सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत. आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. राज्यपालांनी परवानगी दिली. उद्या आझाद मैदानात शपथविधी आहे. अडीच वर्षांपूर्वी इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली. आणि आज फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे दिलंय.
नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह असतील किंवा नड्डाजी यांच्या निर्णयाला पूर्ण समर्थन असल्याचं मी आधीच सांगितलं होतं. मी मनमोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली. खेळमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होत आहे. इतिहासात महायुतीला इतकं बहुमत कधीच मिळालं नव्हतं. या राज्यातील मतदारांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला. यामागे गेल्या अडीच वर्षांचं काम कारणीभूत आहे. शेवटी सरकार सर्वसामान्यांसाठी आणि लोकांच्या विकासासाठी असतं.
- एकनाथ शिंदे
Live Update : आम्ही सरकारचा काम उत्तम पद्धतीने पार पाडण्याचं काम करू - अजित पवार
आम्ही सरकारचा काम उत्तम पद्धतीने पार पाडण्याचं काम करू. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न. - अजित पवार
Live Update : मी कुणालाही भेटलो नव्हतो. मी दिल्ली अमित शाहांना भेटलो नव्हतो. - अजित पवार
मी कुणालाही भेटलो नव्हतो. मी दिल्ली अमित शाहांना भेटलो नव्हतो. दिल्लीत अनेक कामं होती. त्याशिवाय राज्यपेक्षा दिल्लीत जर आराम मिळतो - अजित पवार
Live Update : उद्या सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात शपथविधी, देवेंद्र फडणवीसांनी केलं जाहीर
राज्यपालांनी दावा देणारं पत्र घेतल्यानंतर आम्हाला ५ तारखेला सायंकाळी ५.३० वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे. आज भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट, जनसुराज्य गट, रासप, अपक्ष अशी मोठी महायुती झाली आहे. सगळ्यांच्या सहीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे. मी विशेष आभार मानतो शिंदे गटाचे अध्यक्ष एकनाथ शिंदेंचं, त्यांनी सेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करण्यास पाठिंबा दिला, अजित पवारांनीही त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशी राज्यपालांकडे विनंती केली. या सर्व विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या ५.३० वाजता आझाद मैदानात शपथविधी पार पाडला जाईल. किती जणांचा शपथविधी होईल याची माहिती आज सायंकाळी दिली जाईल.
मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद ही आमच्यासाठी तांत्रिक गोष्ट आहे. राज्याच्या प्रगतीसाठी एकत्रित निर्णय होतील. असा मला विश्वास आहे.
- देवेंद्र फडणवीस
Live Update : तिन्ही नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू...
तिन्ही नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू...
Live Update : सत्तास्थापनेचा दावा करणारं निवेदन राज्यपालांकडे सुपूर्त
सत्तास्थापनेचा दावा करणारं निवेदन राज्यपालांकडे सुपूर्त
Live Update : राज्यपाल दाखल, थोड्याच वेळात महायुती सत्तास्थापनेचं निवेदन सादर करणार
राज्यपाल दाखल, थोड्याच वेळात महायुती सत्तास्थापनेचं निवेदन सादर करणार
Live Update : जितेंद्रनाथ महाराज, कारंजेकर बाबांना देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचे निमंत्रण...
उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी थाटात होणार आहे, या शपथविधीसाठी साधू संतांना निमंत्रण पाठविण्यात आलेय..त्यामध्ये अमरावतीच्या अंजनगावसुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर श्री जितेंद्रनाथ महाराज आणि महानुभाव आश्रमाचे प्रमुख कारंजेकर बाबा यांना या शपथविधीचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे, जितेंद्रनाथ महाराज आणि कारंजेकर बाबांना शपथविधीचं निमंत्रण मिळाल्यामुळे धार्मिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय...जितेंद्रनाथ महाराजांना यापूर्वी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला देखील प्रमुख म्हणून बोलवण्यात आलं होतं...
Live Update : अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते एकाच गाडीतून राजभवनात दाखल
अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते एकाच गाडीतून राजभवनात दाखल
Live Update : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल, महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करणार
Live Update : देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड होताच सोलापुरात जल्लोष...
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होताच सोलापुरात जल्लोष...
फटाके फोडून, मिठाई वाटत, ढोल ताशांच्या गजरात भाजपचा जल्लोष...
विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच सोलापुरात भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
सोलापुरातील भाजपा कार्यालयाजवळ जमून भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना मिठाई भरवून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
उद्या देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील आणि राज्यात राहिलेली विकास कामे मार्गी लावतील असा विश्वास या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
Live Updates: देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल; अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये होणार बैठक
Live Updates: देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल; अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये होणार बैठक
Mahayuti Government Formation: मोठी बातमी! उद्या फक्त तीन जणांचाच शपथविधी होणार
उद्या महायुती सरकारचा शपथविधी होणार असून या शपथविधी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तीन जणांचाच शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी होईल.
Bala Nandgaonkar: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवनिर्माण करावे: बाळा नांदगावकर
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले यांचा मला आनंद आहे. माझे आणि राज ठाकरे यांचे ते मित्र आहे. राज ठाकरे यांना ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंदच होईल. देवेंद्र फडणवीस अभ्यासू व्यक्तिमत्व राज ठाकरेंना अभ्यासू लोक आवडतात. मनसे कार्यकर्त्यांची भावना असू शकते की आम्ही थेट महायुती मध्ये असायला हवे होते पण याबाबतचा निर्णय राज ठाकरे यांचा असेल.
आता इथून पुढे आम्ही थेट महायुती मध्ये असू तर आनंद असेल एकत्र काम करायला मिळाले तर आनंद होईल. पण याबाबत राज ठाकरे यांचा निर्णय अंतिम असेल. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवनिर्माण करावे. अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Hingoli News: हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हिंगोलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय, हिंगोली शहरातील गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
Ahilyanagar News: देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, अहिल्यानगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची रॅली
राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीला मताधिक्य मिळाले. तर राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या यामध्ये भाजपाने तब्बल 132 जागांवर विजय मिळवत राज्यात नंबर एकचा पक्ष होण्याचा मान मिळवला. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर मोठी खलबते सुरू असतानाच आज भाजपाच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली निवड होताच राज्यभरातून भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. अहिल्यानगर शहरांमध्ये देखील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठा जल्लोष करत एकमेकांना लाडू भरवत तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरून विजयी रॅली काढत जल्लोष केला.
Dharashiv News: देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेते पदी निवड, धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर धाराशिव मध्ये भाजप कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी ही करण्यात आली.
उद्या महायुतीचा शपथविधी, ठाण्यातून 5 हजार कार्यकर्ते आझाद मैदानावर जाणार
भाजपच्या गटनेटेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.. एकमेकांना लाडू भरवत डीजेच्या तालावर डान्स करत कार्यकर्त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री याचा आनंद साजरा केला.. उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्याकरिता ठाण्यातून ५ हजार कार्यकर्ते आझाद मैदानावर जाणार असल्याचे भाजपचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सांगितले आहे.
Nitin Gadkari News: महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, नितीन गडकरी
महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा मला विश्वास आहे: नितीन गडकरी
Devendra Fadnavis Speech: राज्याच्या विकासासाठी 24 तास काम करणार: देवेंद्र फडणवीस
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज आपली सर्व प्रक्रिया पार पाडण्याकरिता दाखल झालेले विजय रुपानीजी, निर्मला सितारमनजी, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्वांचे आभारविधीमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली. ही निवड करण्याकरिता आलेले माननीय रुपाणी जी आणि सीतारमन जी यांचे आभार. यावेळची . निवडणूक अतिशय ऐतिहासिक अशी निवडणूक होती. या निवडणुकीने एक गोष्ट समोर ठेवली. एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है आणि मोदी है तो मुमकीन है.
या प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत असलले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे, रामदास आठवले यांच्यासह सर्व पक्षांचे आभार मानतो. अतिशय महत्वाचे असे हे वर्ष आहे. संविधानाचीही ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्याकरिता भारताचे संविधान सर्वात महत्वाचे आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे. इतका मोठा जनादेश हा आपल्याला मिळाला आहे. त्याचा आनंद आहे त्यासोबतच आपली जबाबदारीही वाढली आहे. प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करुन देणारा हा जनादेश आहे.
त्यामुळे दिलेली आश्वासने पूर्ण करणे याकडे आपली प्राथमिकता असेल.
मी इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही. मात्र सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला, आमदारांना त्रास देण्यात आला. अशाही परिस्थितीत आपल्याला एकही आमदार सोडून गेला नाही, याचा मला अभिमान आहे. आता पुन्हा एकदा पुर्ण बहुमताने आपले सरकार आले आहे. मी पंतप्रधान मोदीजींचे आभार मानेन. एका सामान्य कार्यकर्त्याला तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा सन्मान मिळाला.
BJP Vidhansabha Leader: देवेंद्र फडणवीस भाजपचे गटनेते, एकमताने निवड
भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दर्शवला.
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड
Nagpur News: फडणवीसांची गटनेते पदे निवड होताच नाशिक भाजप कार्यालयाबाहेर लागले होर्डिंग.. महाराष्ट्र धर्माचा आत्म सन्मान जोपासणारे दूरदर्शी धाडसी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख.. समस्त नाशिककर यांच्या वतीने करण्यात येते आहे. अभिनंदन...
Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक: चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण महाविजय मिळवला. यासाठी सर्वांनी मेहनत केली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये डबल इंजिन सरकार आणले. जनेतेने आपल्याला भरभरुन यश दिले. आपण जनतेचे आभार मानले पाहिजेत. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय आहे. आपल्याला सात अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. भाजपचेच एकूण 137 आमदार आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण हे यश मिळवले.
महाराष्ट्रासाठी पुढची पाच वर्ष ऐतिहासिक ठरणार आहेत. आपल्या विधीमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया विजय रुपानी यांनी सुरु करावी.
Maharashtra New CM: थोड्याच वेळात राज्याचा मुख्यमंत्री ठरणार! भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची जय्यत तयारी
एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपद आणि मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी बैठक सुरु असतानाच राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरु केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री जाहीर होताच मोठा जल्लोष केला जाणार आहे.
BJP Coar Meeting: गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव
भारतीय जनता पक्षाच्या गटनेते निवडीची बैठक सुरु आहे. गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगुंटीवार मांडणार आहेत. आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यावर अनुमोदन देणार आहेत.
BJP Core Meeting: गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव, लवकरच घोषणा होणार
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून याचा अंमित फैसला आज होणार आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आणि 11 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवे आमदार आणि नेते उपस्थित झाले आहेत. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
BJP Meeting: भाजप कोअर कमिटीची बैठक, महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार
राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे. गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Sukhbir Singh Badal Firing: पंजाबमध्ये सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार, हल्लेखोर ताब्यात
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर परिसरात हा गोळीबाराचा थरार घडला. या हल्ल्यातून बादल हे थोडक्यात बचावले असून गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
Gadchiroli Earthquake: गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सकाळी ७.३० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या धक्क्यामूळे नागरिकात भीतीचे वातावरण दिसत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगू या गावात होता. ५.३ स्केल चा भूकंपाचे धक्के होते.
गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचा हलका झटका...5 ते 10 सेकंदाचा झटका
महाराष्ट्र तेलंगणा सिमेजवळ भूकंपाचा जोरदार झटका. गोदावरी रिफ्ट भूकंपाचे कारण. भूकंपाचे धक्के चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले...
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये भीषण अपघात, 4 जखमी
धाराशिव सोलापूर महामार्गावर अपघात, धाराशिव शहराजवळ गणेश नगरच्या पाठीमागे हा अपघात घडला आहे, या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना धाराशिव जिल्ह्यातील सिविल हॉस्पिटल येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने दाखल करण्यात आले आहे. अपघातातील लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळालेली आहे. अपघात घडल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोणीही झाली होती.
Nirmala Sitaraman: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत दाखल
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे मुंबई विमानतळावर भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी स्वागत केले. यावेळी आमदार संजय उपाध्याय व भाजपा महामंत्री राजेश पांडे उपस्थित होते.
Pooja Khedkar News: पूजा खेडकरांच्या आईला पिस्तूल परवाना बहाल
खाडाखोड केलेली कागदपत्रे देणे, प्रशिक्षण कालावधीत चारचाकीवर अंबर दिवा लावणे आदींमुळे सहा महिन्यांपूर्वी पूजा खेडकर यांना सनदी सेवेतून बरखास्त करण्यात आले होते. त्यावेळी पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर जमिनीचा वादात समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवत धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांनी मनोरमा यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय रद्द केला आहे.
Mumbai Rain: मुंबईत सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात
मुंबईत सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात
कोकणकीणाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पावसाचा इशारा दिला होता
सकाळपासून मुंबईकरांना पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे