4 months ago
मुंबई:

विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. समृद्धी महामार्गावर खड्डे, भेगा पडल्यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरजवळ भेगा, काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचा भागही उखडला आहे. पुढील 20 वर्षे समृद्धीला काही धोका नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. यावर विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. समृद्धी महामार्गाला संभाजीनगरजवळ लांबलचक आणि मोठी भेग पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. 

Jul 11, 2024 14:49 (IST)

उत्तर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Jul 11, 2024 13:24 (IST)

अडीच हजार किलो खिचडी, 50 हजार पाण्याच्या बाटल्या, जरांगेंच्या शांतता रॅलीची तयारी

शांतता रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी तब्बल अडीच हजार किलो खिचडी तर 50 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, तर दीड क्विंटल हाराने होणार जरांगे पाटलांचं स्वागत

बीडमध्ये थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. याच दरम्यान लाखोंच्या संख्येने मराठा समाज रॅलीत सहभागी होणार आहे. आणि याच समाज बांधवांना जेवणासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी समाज बांधवांनी पुढाकार घेतलेला आहे. तब्बल अडीच हजार किलो खिचडी बनवली जात असून 50 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या इथे ठेवण्यात आलेल्या आहे. तर सुभाष रोड परिसरात दीड क्विंटल फुलाच्या हाराने स्वागत होणार आहे.

Jul 11, 2024 13:20 (IST)

समृद्धी महामार्गावर एवढ्या मोठ्याप्रमाणात भेगा कशा पडल्या?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्ग बनवणाऱ्या संबंधित कंपनीने नियमानुसार रोजच्या रोज रस्त्याचा आढावा घेणे बंधनकारक आहे. असे असतांना एवढ्या मोठ्याप्रमाणात भेगा कशा पडल्या. त्यामुळे संबंधित कंपनीकडून रस्त्याच्या कामाचा रोज आढावा घेतला जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जर आढावा घेतला जात असेल तर भेगा पडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रस्त्याचं काम केल्यानंतर संबंधित कंपनीला दोषनिवारण कालावधी ठरवून देण्यात आला असून, तो चार वर्षांचा आहे. त्यामुळे रस्त्यांवर भेगा पडल्यानंतर देखील संबंधित कंपनीने   दुर्लक्ष केलं का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Jul 11, 2024 13:04 (IST)

सोन्याच्या भावात 200 रुपये तर चांदीच्या भावात 1 हजार रुपयांची वाढ

जळगाव गोल्ड अपडेट : सोन्याच्या भावात 200 रुपये तर चांदीच्या भावात 1 हजार रुपयांची वाढ 

सोन्याचे भाव 72 हजार 700 रुपयांवर तर चांदीचे भाव 93 हजार रुपयांवर 

जीएसटीसह सोन्याचे भाव 74 हजार 881₹

जीएसटी सह चांदीचे भाव 95 हजार 790₹

Advertisement
Jul 11, 2024 13:00 (IST)

NDTV मराठीचा इम्पॅक्ट, समृद्धी महामार्गावरील भेगा बुजवण्यास सुरूवात

NDTV मराठीचा इम्पॅक्ट, समृद्धी महामार्गावरील भेगा बुजवण्यास सुरूवात

NDTV ने समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याची बातमी दाखवली होती. अखेर प्रशासन कामाला लागलं आहे. 

समृद्धीवरील भेगा पडल्याची पहिली बातमी NDTV ने दाखवली होती. 

Jul 11, 2024 11:37 (IST)

समृद्धीच्या भेगांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं

समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांवरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय. महामार्ग तयार होताच वर्षभरात त्यांवर भेगा पडतात, याचा अर्थ समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झालाय, अशा शब्दात रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे नाना पटोलेंनीही समृद्धी महामार्गावरुन बोलताना, सरकारला लाज शरम नसल्याचं म्हटलंय 

Advertisement
Jul 11, 2024 11:36 (IST)

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले, तोच...

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले, तोच या महामार्गाला मोठ्या आणि लांबलचक भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक 3 सेंमी रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. महामार्गासाठी एम-40 ग्रेडचे सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, तो फोल ठरला. माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. एमएसआरडीसीचे अधिकारी मात्र यावर बोलण्यास तयार नाहीत.

Jul 11, 2024 11:28 (IST)

भाजपच्या कोअर कमिटीची थोड्याच वेळात बैठक

भाजपच्या कोअर कमिटीची थोड्याच वेळात बैठक

भाजप प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव मार्गदर्शन करणार आहे. कोअर कमिटी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. 

Advertisement
Jul 11, 2024 11:27 (IST)

समृद्धी महामार्गावर लांबच लांब भेगा.. अनेक ठिकाणी खड्डेही