ST Bus Recruitment: एसटी महामंडळात मेगा भरती! 17450 पदे भरणार, पगार किती? वाचा A टू Z माहिती

MSRTC Corporation Recruitment 2025: महामंडळात तब्बल १७ हजार ४५० पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या निर्णयामुळे एसटीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या हजारो तरुणांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

MSRTC ST Bus Job Recruitment 2025: गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तोट्यात असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आता पुन्हा एकदा कात टाकत असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि सेवा अधिक सुरळीत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच महामंडळात तब्बल १७ हजार ४५० पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या निर्णयामुळे एसटीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या हजारो तरुणांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळात मेगा भरती!

महामंडळात सध्या चालक आणि वाहकांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली. महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही भरती एकूण १७ हजार ४५० पदांसाठी असेल. यासाठीची निविदा प्रक्रिया येत्या २ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.

Solar Eclipse 2025: एक दिवस आधीच 'Google' वर सूर्यग्रहण! स्क्रीनवर दिसतेय कमाल जादू; तुम्हीही करुन पाहा

किती असेल पगार

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीपासून किमान ३० हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे. म्हणजेच, हा पगार ३० हजार रुपयांपेक्षा अधिकच असेल. या आकर्षक पगाराच्या संधीमुळे तरुणांमध्ये या नोकरीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या मोठ्या भरतीमुळे एसटीच्या सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तसेच, कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तरुणांना ही संधी गमावू नये असे आवाहन केले आहे. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार ठेवावीत आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली होती, पण आता ही मोठी भरती जाहीर झाल्याने महामंडळाला पुन्हा नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, ज्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळेल.