जाहिरात
37 minutes ago

Mumbai Rain LIVE Updates: मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबईत गेल्या आठवडाभरापासून तुफान पाऊस बरसत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये कोसळत असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचले असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. आजही मुंबईसह पुण्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  या पावसामुळे मानखुर्दमध्ये बिल्डिंग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या, महामार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. 

Mumbai Rain LIVE Update: पुढचे तीन तास चिंता वाढवणारे, मुंबईला पुन्हा रेड अलर्ट

पुढचे तीन तास चिंता वाढवणारे

मुंबईला पुन्हा रेड अलर्ट

ठाणे, रायगड, पुण्यालाही रेड अलर्ट

पावसाचा धुमाकूळ सुरूच राहणार

60-70 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Pune Rain LIVE Update: पूरपरिस्थितीत अडकलेल्या ४०८ भाविकांची सुटका, ; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच  (एनडीआरएफ) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली.

बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील १५० गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Raigad Rain Update: रोहा - कोलाड रोड पाण्याखाली

रोहा - कोलाड रोड पाण्याखाली गेला आहे.
रोहा मधील कुंडलिका नदीचा रौद्ररूप आणि रोहा शहराला घातलेला वेढा.. NDTV मराठी च्या हाती..
रोहा शहरातील योगेश देशमुख यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले हे कुंडलिका नदीचे रूप समोर
रोहा शहराला लागून असलेल्या अष्टमी, रायकर पार्क, दमखाडी, रोहाचा छोटा पूल पाण्याखाली गेल्याची दृश्ये.
रोहा मधील दमखाडी आणि वरसे जवळील पूल पाण्याखाली गेल्यामुळे जलमय.
फोर व्हीलर, टूव्हीलर वाहने पाण्याखाली ग्राउंड अनेक घरे देखील पाण्याखाली रोहा रेल्वे स्थानक परिसराला देखील कुंडलिका नदीचा पुराच्या पाण्याचा वेढा.

Mumbai Rain LIVE Updates: लोकलच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा, मुंबईकरांचे हाल

ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर प्लास्टिक अडकल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

संबंधित प्लास्टिक काढण्याचे काम सुरू आहे. सेंट्रल रेल्वे, आणि पश्चिम रेल्वेची, मुंबईकडे येणारी वाहतूक थांबली.

या कारणामुळे विखरोळी आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान दोन गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

Mumbai Rain LIVE Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळांवर पाणी साचल्याने खोळंबा

मुसळधार पावसामुळे विरार नालासोपारा तसेच वसईच्या दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे, तसेच सकाळी आणि पालघर रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार तालुका प्रवाशांची मोठी गर्दी असून लोकल सह लांब पल्ल्याच्या गाड्या देखील थांबलेल्या आहेत. जोपर्यंत रुळावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु होणार नाही.. 

Mumbai Rain LIVE Updates: सायन सर्कलला टेम्पोवर पडले झाड, वाहतुकीवर परिणाम

- सायन सर्कलला टेम्पोवर पडले झाड 

- मुंबईत आतापर्यंत शेकडो झाड उन्मळून पडले 

- अनेक मुंबईकरांचा झाडाच्या खाली दाबून जीव गेला, तर अनेक जण जखमी झालं आहे 

- या टेम्पो मधील चालक सुरक्षित

- थेट रस्त्यात झाड पडल्याने वाहतुकीवर परिणाम

Pune Rain LIVE Updates:आपत्ती व्यवस्थापन दलाचे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू

पीएमआरडीए (PMRDA) अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन दलाचे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू

पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात (PMRDA Area) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीएमआरडीएचे आपत्ती व्यवस्थापन दल (PDRF) आणि अग्निशमन विभागाची विविध केंद्रे अहोरात्र कार्यरत आहेत. नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या आपत्कालीन कॉल्सवर तत्परतेने कारवाई करत सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचा संक्षिप्त आढावा खालीलप्रमाणे आहे:

📍 विविध केंद्रांतर्गत सुरू असलेले मदत व बचाव कार्य

१. मावळ, लोणावळा व तळेगाव परिसर:

पाटण बोराज रोड: मुसळधार पावसामुळे घरावर दरड कोसळल्याने ४ नागरिक अडकल्याची माहिती मिळताच मदतकार्य रवाना करण्यात आले आहे.

मळवली व पाटण गाव: मळवली परिसरात दरड कोसळल्याने आणि पुराचे पाणी घरात शिरल्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच पाटण गावामध्ये PDRF आणि NDRF च्या संयुक्त पथकांद्वारे युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम सुरू आहे.

लोणावळा (हुडको कॉलनी व वेदांत अकॅडमी): PDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

आपटेगाव (पवना लेक परिसर): दरड कोसळल्याने सुमारे २० ते ३० नागरिक अडकल्याची माहिती असून तिथे तात्काळ साहाय्य पोहोचवले जात आहे.

बोरावली स्टेशन व तळेगाव दाभाडे (स्कोडा कंपनी परिसर): पाण्यात अडकलेल्या बसमधील २६ प्रवाशांसह अन्य नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

२. मारुंजी व हिंजवडी परिसर:

कासार साई: घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळताच सदर कॉल हिंजवडी फेज ३ केंद्राकडे वर्ग करून मदत पथके रवाना करण्यात आली आहेत.

मारुंजी (मंत्रा २४ वेस्ट सोसायटी): सोसायटीच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पाण्याचा निचरा व आवश्यक मदतकार्य सुरू आहे.

३. चाकण, आळंदी व देहू परिसर:

चाकण (चिंबळी फाटा): एका कंपनीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने आत अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एमआयडीसी (MIDC) अग्निशमन केंद्राच्या समन्वयाने बचाव कार्य सुरू आहे.

धानोरे गाव (आळंदी): वादळी पावसामुळे झाड कोसळल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत रस्ता मोकळा केला आहे. तसेच आळंदी व संवेदनशील भागात पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.

देहूगाव: निवासी भागात व घरांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

📢 नागरिकांना जाहीर आवाहन

अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत माध्यमांतून येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

अधिकृत सूचनांचे पालन करा: पूरस्थिती आणि जलभराव लक्षात घेता प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

२४x७ तत्परता: आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित PDRF आणि अग्निशमन दलाची पथके सदैव सज्ज आहेत.

📞 आपत्कालीन संपर्क क्रमांक (Emergency Helplines)

कोणत्याही तातडीच्या मदतीसाठी नागरिक खालील अधिकृत क्रमांकांवर २४ तास संपर्क साधू शकतात:

📱 PDRF आपत्ती व्यवस्थापन मदत कक्ष: ९५४५ २८ २९ ३०

🚒 अग्निशामक दल (नांदेड सिटी केंद्र): ०२०-६७५२०००१ / ०२०-६७५२०००२

🚒 अग्निशामक दल (मारुंजी केंद्र): ०२०-६७९९२१०० / ०२०-६७९९२१०१

🚒 अग्निशामक दल (वाघोली केंद्र ): ०२०-२९५१८१०१ / ०२०-२९५१९१०१

Mumbai Rain LIVE Update: ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहणार, BMCकडून बांधकामधारकांना मोठे आवाहन

सध्याचे हवामान आणि ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक (LS), कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. 

१) बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान / परांची (स्कॅफोल्डिंग), सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह (कंपाऊंड वॉल्स) बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचाबांधणी (फॉर्मवर्क) तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी.

इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर (टेरेस) आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे व खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्यप्रकारे बांधून सुरक्षित करावे.

२) कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या व पद्धतशीरपणे करावी.

खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी.

३) टॉवर क्रेन, मटेरियल होईस्ट, बांधकाम लिफ्ट, सुरक्षा जाळ्या (सेफ्टी नेट्स) आणि उचलण्याची उपकरणे (लिफ्टिंग इक्विपमेंट) यांची स्थिरतेच्या दृष्टीने तपासणी करावी.

हवामानामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास उचलण्याची कामे (लिफ्टिंग ऑपरेशन्स) आणि उंचावरची सर्व कामे तात्काळ थांबवावीत. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या परिसरात प्रतिबंधित सुरक्षा क्षेत्र (Exclusion Zone) कायम ठेवावे.

४) सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) तसेच उंचावर काम करताना आवश्यक 'फॉल प्रोटेक्शन'चा वापर करणे बंधनकारक आहे.

संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात.

५) हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावे. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतींचे काटेकोरपणे पालन करावे.

Mumbai Pune Rain Update LIVE: पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

पुणे-​मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. ​सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस 'उर्से टोल नाका' परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये.

Pune Rain Alert: आळंदीत 250 नागरिक अडकले

आळंदी मध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पाण्यामध्ये अडकले!

इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी...

पोलीस आणि अग्निशमन दल आळंदी नागरिकांची करत आहेत सुटका...

Mumbai Rain Alert Update: मुंबईकरांना महत्त्वाचे आवाहन, समुद्रकिनारी जाणे टाळा

बृहन्मुंबई महानगरपालिका

महत्त्वाची जनहित सूचना

➡️ भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

➡️ बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे.

➡️ नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे.  प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.

➡️ तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्‍यात येत आहे. 

 ➡️ बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अहोरात्र कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.

Mumbai Pune Highway: मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुक ठप्प

भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Expressway) आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित  झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबवण्यात आली आहे. नागरिकांना विनंती आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास पुढे ढकलावा आणि यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्यतनांचे (updates) पालन करावे. जनहित आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करत आहे. 

मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरातील काही भाग आणि रस्त्यांवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे; या भागात पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या पर्यायी मार्गांचाही समावेश होतो.  त्यानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत खालील मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Expressway): काँक्रीटचा खांब पडल्यामुळे 'कनेक्टिंग लिंक' आणि 'मिसिंग लिंक' दरम्यानचा मार्ग बंद. जुना पुणे-मुंबई महामार्ग: काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे (ओव्हरफ्लो झाल्यामुळे) मार्ग बंद.

Mumbai Pune Rain LIVE Updates: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा जोर; वाहनचालकांकडून पार्किंग लाईटचा वापर

लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून दाट ढग आणि कमी दृश्यमानतेमुळे दिवसा अंधाराचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक वाहनचालक पार्किंग लाईट सुरू ठेवून वाहने चालवत आहेत.

पावसाचा जोर आणि कमी दृश्यमानतेमुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग सुमारे 40 किमी प्रतितास इतका कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनचालक सावधगिरीने प्रवास करत आहेत.

प्रशासनाने वाहनचालकांना सुरक्षित अंतर राखून, वेगावर नियंत्रण ठेवून आणि आवश्यक असल्यासच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Mankhurd Building Collapse LIVE Updates:मानखुर्द दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईतील मानखुर्द भागात एक घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.

kalyan Dombivli Rain Update: कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून मुसळधार पाऊस सखल भागांत साचले पाणी

कल्याण-डोंबिवली परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे नेहमीप्रमाणे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.

सर्वात मोठी अडचण कल्याण आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कल्याण-शीळ मार्गावर निर्माण झाली आहे. या मार्गावर पाणी साचल्याने सकाळच्या वेळी नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना संथ वाहतुकीचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra Rain LIVE Update: वारणा खोऱ्यात पावसाची संततधार, अनेक छोटे बंधारे पाण्याखाली

सांगलीच्या वाळवा तालुक्यासह वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चिकुर्डे येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तर सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत असल्याने या भागातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.. 

Mumbai Rain LIVE Updates: भाईंदरमध्ये स्लॅब कोसळून 4 जखमी

मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे काशीमीरा येथील मीरा गावठाण परिसरातील निर्माणाधीन विघ्नहर्ता इमारतीच्या २४व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली पडून लगतच्या श्री हरिधाम वेल्फेअर सोसायटी चाळीतील घरावर कोसळला.

या दुर्घटनेत घरात झोपलेल्या एका महिलेसह चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रियंका सतीश चौबे, सतीश चौबे, धर्मेंद्र सोनी आणि संतोष जाधव यांचा समावेश आहे. जखमींपैकी प्रियंका सतीश चौबे यांच्यावर ऑर्बिट रुग्णालयात, तर इतर तिघांवर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Rain LIVE Updates: मुंबईकरांनी सतर्क रहा, आज समुद्र खवळणार

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी… आज दुपारी मुंबईतील समुद्राला मोठी भरती येणार आहे….दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी समुद्रात ४.१२ मीटर म्हणजेच सुमारे १३.५४ फूट उंच लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी तसेच मुंबईकरांनी अनावश्यकपणे समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, दादर, वांद्रे आणि वर्सोवा परिसरात नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी..

Mumbai Pune Rain LIVE Updates: यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गुडघाभर पाणी

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गुडघाभर पाणी 

कामशेत बोगद्याच्या अलीकडे महामार्गावरून पाणी वाहू लागले 

पुणे मुंबई एक्सप्रेस वे पूर्णतः बंद 

मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे 

जुना पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्ग सुरू परंतु प्रचंड वाहतूक कोंडी

Ratnagiri Rain Alert News: रत्नागिरी जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट, 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात विक्रमी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट

 गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात विक्रमी पाऊस 

गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 156 मिलिमीटर इतका पाऊस 

तर दापोली तालुक्यात 24 तासात 304 मिलिमीटर पावसाची नोंद 

मंडणगडमध्ये 259, तर खेड तालुक्यात 213 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद 

24 तासांत उत्तर रत्नागिरीला पावसाने अक्षरशहा झोडपून काढलं 

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सरींवर पाऊस 

खेडमधील जगबुडी अजूनही धोक्याच्या पातळीवर, चिपळूणची वाशिष्टी, रत्नागिरीतील काजळी राजापूर मधील कोदवली नद्या इशारा पातळीच्या खाली 

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी 

जगबुडीची पाणी पातळी होते कमी 

काजळी नदी सध्या दुथडी भरून, आज दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा 

सकाळपासून मात्र पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणात ओसरला 

Maharashtra Rain LIVE Updates: पुणे-नाशिक महामार्ग काहीकाळ बंद; वाहतुकीचा खोळंबा

पुणे-नाशिक महामार्गावर मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. चाकणजवळील एका ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने महामार्ग काही काळ पूर्णपणे बंद करावा लागला. रस्त्यासह परिसरातील अनेक दुकानेही पाण्याखाली गेली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

Mumbai Pune Train Updates: दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद, अनेक गाड्या रद्द

कोणकोणत्या एक्स्प्रेस रद्द? 

२२१०५/२२१०६ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस
१२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
१२१२७/१२१२८ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
११००७/११००८ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
१२१२३/१२१२४ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
१२१२५/१२१२६ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
११००९/११०१० सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
११०११/११०१२ सीएसएमटी-धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस

Maharashtra Rain LIVE Updates: पावसाचा फटका! ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद

पुणे–रायगड राष्ट्रीय महामार्गावरील ताम्हिणी घाट मार्ग मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद

ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी प्लस व्हॅली पॉईंटजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने निर्णय

पुणे–माणगाव मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक आज (५ जुलै) रात्री ९ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद

गेल्या दोन दिवसांपासून मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत

डोंगरवाडी प्लस व्हॅली पॉईंटजवळ पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहतुकीला धोका

जनसुरक्षेच्या दृष्टीने मार्ग बंद करण्याचे निर्देश

तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, मुळशी (पौड) यांनी आदेश जारी केले

पोलीस व संबंधित यंत्रणांना वाहतूक बंदीची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे

परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेशानंतरच मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार

Mumbai Rain LIVE Updates: आज मुंबईत समुद्र खवळणार!

आज मुंबईत समुद्राला मोठी भरती

३ः५० वाजत मुंबईतील समुद्राच उसळणार मोठ्या लाटा

४.१२ मि (१३.५४ फुट )पर्यंत लाटा उसळणार

मुंबईकरांनो आज समुद्रावर जाणं टाळावं प्रशासनाचे आवाहन

Pune Rain LIVE Updates: मावळात दरड कोसळली, संपूर्ण कुटुंब अडकल्याची भिती

मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटे घरावर दरड कोसळली.

प्राथमिक माहितीनुसार, घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले.

बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पुणे येथील ५व्या बटालियनची मदत मागविण्यात आली.

३० सदस्यांचे एनडीआरएफ पथक घटनास्थळी रवाना झाले.

पथकात १ अधिकारी, २ वरिष्ठ अधिकारी आणि २७ जवानांचा समावेश आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्यांसह पथक सकाळी ५.५० वाजता रवाना झाले.

घटनास्थळी युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे.

सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.


Mumbai Rain LIVE Updates: पावसाचा फटका, पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली

प्रवासी सूचना वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान झालेल्या पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा सध्या अंदाजे १५–२० मिनिटे उशिराने धावत आहे. प्रवाशांनी कृपया आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे व अतिरिक्त प्रवास वेळ गृहीत धरावा. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

Pune Rain LIVE Updates: तळवडे चाकण एम आय डी ला जोडणारा मोई गावचा पूल वाहतुकीसाठी बंद

इंद्रायणी नदीवर असलेला तळवडे तसेच चाकण एम आय डी सी ला जोडला जाणारा मोई गावचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्या नंतर हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यामुळे पुलाच्या पलीकडे असलेल्या चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे गावाचा संपर्क तुटला आहे ,त्यामुळं गावकऱ्यांना 10 किलोमीटर पर्यंत वळसा घालून गावात यावं लागत आहे ,

Pune Rain LIVE Update: आळंदीत इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली, सर्व पूल तात्पुरते बंद

आळंदीत इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली, सर्व पूल तात्पुरते बंद

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

सुरक्षेच्या कारणास्तव आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद

भाविक, वारकरी आणि नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन

नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्यास प्रशासनाची मनाई

बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नये

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सार्वजनिक सूचना जारी केली

आळंदी नगरपरिषदेने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी सुरू ठेवली आहे..

Pune Rain LIVE Update: भोर - महाड मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली

- भोर - महाड मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळयाची घटना 

- घाट माथ्यावर 3-4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळं मध्यरात्रीच्या सुमारास घाटातील उंबर्डे वाडीच्या हद्दीत दोन ठिकाणी ही दरड कोसळली..

- दरडीसोबत माती दगडासह झाडे झुडपांचा राडारोडा रस्त्यावर आल्याने ह्या संपूर्ण मार्गावरची वाहतुक ठप्प झाली..

- दरड कोसळताना या रस्त्यावर कोणीही नसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही 

- भोर प्रशासनाची टीमने घटनास्थळी दाखल होतं.. रस्त्यावरील राडारोडा बाजूला करत वाहतूक पुन्हा सुरळीत केली..

- दरम्यान, घाटमाथ्यांवरील सततचा पाऊस लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे..

- घाटरस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा तसेच दरडग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी थांबून सेल्फी काढणे, व्हिडिओ चित्रीकरण करणे किंवा गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..

Pune Rain LIVE Updates: पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर, मावळ व भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर, मावळ व भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

मावळ तालुक्यातील उजनी–खंडाळा परिसरात तब्बल ५१० मिमी पावसाची नोंद

मावळमधील पवना परिसरात ३४८ मिमी पाऊस

भोर तालुक्यातील हिरडोशी येथे ३०३ मिमी पावसाची नोंद

भोरमधील शिरगाव येथे २८४ मिमी पाऊस नोंदवला

डोंगराळ भागात मुसळधार पाऊस कायम, नद्या-ओढे दुथडी भरून वाहू लागले

अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अनावश्यक प्रवास टाळण्यासह नदी, ओढे आणि धबधब्यांपासून दूर राहण्याच्या सूचना

पावसाची तीव्रता लक्षात घेता परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष

Mumbai Pune Rain LIVE Updates: पुणेकरांनो काळजी घ्या, सतर्क रहा! प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

🚨 पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत.

📍 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

- लँडलाईन : ०२०-२६१२३३७१

- टोल फ्री हेल्पलाईन : १०७७

- मोबाईल : ९३७०९ ६००६१

🏛️ पुणे महानगरपालिका (PMC)

- ०२०-२५५०१२५९

- ०२०-२५५०६८००

🏙️ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)

- ०२०-६७३३११११

🚑 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF)

- ९५४५२ ८२९३०

⚠️ नागरिकांना आवाहन :

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

Mumbai Pune Rain LIVE Updates: लोणावळा घाटात भीषण वाहतूक कोंडी; मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

गेल्या तीन तासांपासून लोणावळा घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घाटमार्गावर जाणे टाळावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mumbai Pune Rain LIVE Updates: पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प

पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे.

VO :

आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावर ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय

Mumbai Pune Road Closed LIVE Updates: मुंबई- पुणे वाहतूक पूर्णपणे बंद

पुणे–मुंबई  मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद

दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूकवरपरिणाम 

नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा.

Mumbai Pune Rain LIVE Updates: पुणे–मुंबई मार्गावरील १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द

लोणावळा–कर्जत दक्षिण-पूर्व घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

६ जुलै रोजी पुणे–मुंबई मार्गावरील १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द

इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्या रद्द

सीएसएमटी–धुळे एक्स्प्रेस आणि धुळे–सीएसएमटी एक्स्प्रेसही रद्द

प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासूनच रेल्वे स्थानकाकडे जाण्याचे आवाहन

५ जुलैच्या प्रवासासाठी ९ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले

अहमदाबाद–कोल्हापूर, अहमदाबाद–पुणे दुरांतो, इंदूर–दौंड, बिदर–सीएसएमटी, नांदेड–पनवेल, चेन्नई–सीएसएमटीसह अन्य गाड्यांचा समावेश

मार्ग बदललेल्या गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड तसेच पर्यायी मार्गांवरून धावणार

दरड हटविण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

मध्य रेल्वेने प्रवाशांना अधिकृत माहितीनुसारच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन

Maharashtra Rain LIVE Updates: पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित

दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.

पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा.

नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.

Mankhurd Building Collapse LIVE Updates: मानखुर्दमध्ये घर कोसळून ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू; महापौर रितू तावडेंनी कुटुंबीयांचे केले सांत्वन

मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात आज रविवार दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री ०८.३० वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जावून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार  अबू असीम आझमी,  रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते.

Pune Rain LIVE Updates: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

पुणे जिल्ह्यासाठी ६ जुलै रोजी भारतीय हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी

मुसळधार ते अति मुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण)तील सर्व शाळांना सुट्टी

सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले

सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टीचा निर्णय लागू

मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मात्र नेहमीप्रमाणे उपस्थित राहण्याचे निर्देश

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी शाळा प्रशासनाने सज्ज राहावे

नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नदी-नाले, धबधबे व वेगवान पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

भारतीय हवामान विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

Show full article
Listen to the latest songs, only on JioSaavn.com