Maharashtra Rain Update : या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज 26 जुलै. 20 वर्षांपूर्वी 26 जुलै रोजी अख्खी मुंबई पाण्यात बुडाली होती. या दिवशी तब्बल 944 मिमी इतका पाऊस पडला होता. या पावसाच्या कडू आठवणी अद्यापही ताज्या आहेत. दरम्यान आज मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, पालघरला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Rain Live Updates : कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना इशारा
सातारा पाटण - कोयना धरणाच्या जलाशय पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. कोयना धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे पुन्हा ४ फूट उघडून नदीपात्रात प्रतिसेंकद १६,५६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीपात्रात एकूण १८,६६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे धरण व्यवस्थापना कडून नदीकाठावरील गावांसह कराड, सांगली या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Live Update : हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, कयाधू नदी दुधडी भरून वाहते
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून पडत असलेल्या रिमझिम पावसाने दुपारपासून जोर धरला आहे.. तर हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी यावर्षी पहिल्यांदाच दुधडी भरून वाहत आहे. तर या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं आहे, तर हिंगोली जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
Live Update : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये संततधार सुरू, उतवाली ते धारणी दरम्यानच्या नदीला पूर
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये संततधार सुरू, उतवाली ते धारणी दरम्यानच्या नदीला पूर..
नदीवरून वाहू लागले पुराचे पाणी..
पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालक जीव धोक्यात टाकून काढत आहे वाहने..
Live Updates: शरद पवार हे सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता
आज शरद पवार हे सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता
दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट होणार असल्याची माहिती
राज्यातील वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात ही पवार हे सीएम यांना भेटणार
Live Update : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे मेघा नदीला पूर
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे मेघा नदीला पूर
Live Update : संततधारेने दक्षिण गडचिरोलीत जनजीवन विस्कळीत
शुक्रवारच्या ‘रेड अलर्ट’मध्ये दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पण संध्याकाळी अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याने फारसा फटका बसला नाही. मात्र दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी तालुक्यात काही मार्ग अडल्याने आणि नदी-नाल्यांना पूर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला असून त्याच अनुषंगाने रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहे.
Rain udpate: अमरावतीत विविध भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस
अमरावतीत विविध भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस..
चांदुरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला पूर..
बंधारे देखील पाण्याखाली आलेत..मेघा नदी दुथडी भरून वाहत आहे..
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..
पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा..
Live Update : अमरावतीत विविध भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस..
अमरावतीत विविध भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस..
चांदुरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला पूर..
बंधारे देखील पाण्याखाली आलेत..मेघा नदी दुथडी भरून वाहत आहे..
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..
पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा..
Live Update : सिंधुदुर्गात अधूनमधून पावसाच्या सरी, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवली, कुडाळ, मालवण सह सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 67 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
Live Update : लातुरमध्ये पावसाची संततधार, पिकांना नवसंजीवनी
मागील महिनाभरापासून उघडी दिलेल्या पावसानं लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे 30 दिवसानंतर सुरू झालेल्या या संतधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना नव संजीवनी मिळालेली आहे पिका हातून जातील अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाले आहेत कालपासूनच लातूर जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कालपासून झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळालेली आहे हंगाम हातातून जाईल अशी भीती शेतकऱ्यांना होती मात्र कालपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत
Live Update : साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणाचे दरवाजे आज पुन्हा उघडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Live Update : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Live Update : खडकवासला धरणक्षेत्रात 85.20 टक्के पाणीसाठा
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात 24.84 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 85.20 टक्के पाणीसाठा उपलब्ध
गेल्या यावर्षी याचवेळी धरणात 22.25 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 76.32 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता
गेल्यावर्षी याचवेळी पेक्षा अडीच टीएमसी पाणीसाठा जास्त
खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात.
वरसगाव धरणातून मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू
यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रता पाणीसाठा वाढला
खडकवासला १.१३ टीएमसी
पानशेत ९.२३ टीएमसी
वरसगाव ११.५२ टीएमसी
टेमघर २.९५ टीएमसी
Live Update : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं स्वयंचलित दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होते. गेले दोन दिवस हलका पाऊस पडत होता. रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर शहरासह, पाणलोट क्षेत्रात पावसाची गती वाढली आहे. कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलेलं राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सध्या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडलेत. यामुळे नदीपत्रात झपाट्याने पाणी वाढणार आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटावर आहे. जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापुरातील सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाकडून वारंवार नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
Live Update : जायकवाडी धरण 80 टक्के भरलं, मराठवाड्यातून मोठी दिलासादायक बातमी
जायकवाडी धरण 80 टक्के भरलं, मराठवाड्यातून मोठी दिलासादायक बातमी
जायकवाडी धरण फक्त 20 टक्के खाली
यंदाही जायकवाडी धरण 100 टक्के भरण्याची शक्यता
जायकवाडी धरणात 12 हजार 762 क्युसेकने पाण्याची आवक सुरू
जोरदार पाऊस झाल्यास आवक वाढण्याची शक्यता
Rain Live Updates: विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा दिवस
पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी. संपूर्ण विदर्भात आज ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गोंदिया आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा रेड अलर्ट.
नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांना मुसळधार ते खूप मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित.
उर्वरित संपूर्ण पश्चिम विदर्भात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून कित्येक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.
Live Updates: आज विदर्भात कित्येक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पाऊस
आज विदर्भात कित्येक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पाऊस
नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट चा दुसरा दिवस. रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू. मात्र, जिल्ह्यात कुठेही पाणी तुंबल्याची किंवा पूर परिस्थितीची सूचना नाही. प्रशासन स्थितीवर लक्ष ठेवून आहे. काल नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून देखील पाऊस अपेक्षेप्रमाणे बरसला नव्हता. वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असला तरी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.
आज चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून
अमरावती, नागपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
Rain News: रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट
आज रायगडला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे आणि पावसाचा जोर देखील कायम आहे. काल रात्री पासून महाड, पोलादपुर आणि महाबळेश्वरमध्ये जोरदार पावसानंतर महाडमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर महाड आणि पोलादपुरमधील शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
Rain Live Updates: महाड, पोलादपूरमध्ये शाळांना सुट्टी
रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्ट नंतर, कालपासून महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या संततधारेमुळे महाडमध्ये अनेक भागांत सखल परिसरात पाणी साचले असून, पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे..
महाडमधील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. दस्तुरी नाका, गंधारिपुल, नातेखिंड, नांदगाव खुर्द, पोलादपूर बाजारपेठ हे रस्ते जलमय झाले असून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे..
Beed News: बीडच्या बिंदुसरा धरणावर तरुणांची हुल्लडबाजी...!
बीड जिल्ह्यात दोन दिवसापासून सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एका अनेक प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. बीड पासूनच जवळच असलेल्या बिंदुसरा प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाले आहे. याच धरणावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे, प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा आदेश देऊन देखील तरुण सांडव्याच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत आहेत. या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे.
Live Update : कोल्हापुरातील राधानगरी धरणाची तिन्ही दरवाजे उघडले
कोल्हापुरातील राधानगरी धरणाची तिन्ही दरवाजे उघडले, धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू
Live Update : आज दुपारी 1.15 वाजता समुद्राला मोठी भरती...
पहाटेपासुन मुंबईत पावसाची हजेरी, मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत, आज दुपारी 1.15 वाजता समुद्राला मोठी भरती...
Live Update : पालघर, रायगडसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांना रेड अलर्ट
पालघर, रायगडसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांना रेड अलर्ट, पश्चिम विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
Live Update : महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?
Live Update : मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात पुढील तीन ते चार तास मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात पुढील तीन ते चार तास मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.