Mumbai Rain LIVE Updates: गेल्या 24 तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. शहरातील अनेक भागात पाणी साचले तसेच रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक सेवाही ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. आजही मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, कल्याणमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जिवीतहानी, पशुहानी झाल्याच्या घटना घडत आहेत. राज्यभरातील या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
Mumbai Rain News: मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ, ३५० नागरिकांचे स्थलांतर
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी ३.९ मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.
तसेच आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी ३.९ मीटर वरून आता ३.६ मीटर इतकी झाली आहे.
मुसळधार पावसाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
Mumbai Local Train Update: सीएसएमटी आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे बंद
मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि # रुळावर पाणी साचल्यामुळे, सीएसएमटी आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. ठाणे - कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू आहे.
Mumbai Rain LIVE Update: मुंबईची लाईफलाईन थांबली! मध्य आणि हार्बर लाईन पूर्णपणे ठप्प, रेल्वे प्रशासनाची माहिती
मुंबईत पावसाने कहर केला आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. ठाणे ते सीएसटीकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडूनही माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra Rain: सिंधुदुर्गात मुसळधार!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दूथडी भरून वाहत असून निर्मला नदीला पूर आल्याने कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार कायम आहे. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा, विद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
Pune Rain Alert: पुणेकरांनो काळजी घ्या! हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
पुणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
तर पुढील तीन तास मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, आणि पुण्यातील घाट परिसरात ४०-४५ किमी प्रतितास वेगाने पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे
६० किमी प्रतितास वेगाने वारे असतील तर मुसळधार पावसाची शक्यता देखील सांगण्यात आली आहे
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
नागरिकांनी सावधांगी बाळगणे गरजेचे
Mumbai Rain: बुलेट ट्रेनच्या कामामुळे संतोष भवन परिसरातील घरांमध्ये पाणी, नागरिकांचा संताप
नालासोपारा संतोष भवन परिसरामध्ये बुलेट ट्रेन च्या कामामुळे पाणी तुंबून लोकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्यामुळे येथील संतप्त रहिवाशांनी रस्त्यावर येऊन रस्ता रोको केला आहे. संतोष भवन गरेड पाडा मायकल कंपाऊंड या परिसरातील नागरिक रस्त्यावर आल्याने नालासोपारा रस्ता आडवला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Mumbai Rain LIVE Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
Mumbai Rain LIVE Update: मुंबईत सर्वाधिक नोंद झालेली ठिकाणे
मुंबईत सर्वाधिक पाऊस झालेली ठिकाणे:
Maharshtra Rain: कण्हेर धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात विसर्ग
: कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पाऊसामुळे कण्हेर धरणातून सद्यस्थितीत ४२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे या सोडण्यात आलेल्या विसर्गात पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पाऊसाच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वा विसर्गात वाढ करून ६२०० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
वेण्णा नदी वरील खालील दोन गावांना जोडणाऱ्या वेण्णा नदीवरील पुल पाण्याखाली जाणार आहेत. तरी संबंधित गाव रस्ता पूल वाहतुकीसाठी वापरणाऱ्या येऊ नये. पर्यायी रस्ताचा वापर करावा.
Mumbai Rain LIVE Updates: कुर्ला कमानी परिसरात पाणी भरलं; दुकाने बंद
कुर्ला कमानी विभागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरले आहे. एलबीएस मार्गला कमानी शी जोडणारा काळे रस्ता पाणी भरल्याने ठप्प झाला आहे. सुमारे तीन ते चार फूट पाणी भरले आहे. इथल्या दुकानात पाणी भरल्याने दुकाने बंद करण्यात आली आहे
Mumbai Rain Local Status: पावसाचा सर्वात मोठा फटका, मध्य रेल्वे ठप्प
मुंबईतील पावसाचा सर्वात मोठा फटका! मध्य रेल्वे ठप्प, सायन दादरजवळ लोकल सेवा खोळंबली आहे. गेल्या अर्धा तासांहून अधिक वेळ लोकल सायन आणि दादर दरम्यान थांबली आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने ही लोकल ठप्प झाली आहे.
Raigad Rain: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पावसाचा हाहाकार
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने अनेक शेतातून शेती साहित्य वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांसह शेती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच रावेर तालुक्यातल्या निंबोल शिवारात शेतातून वाहून जाणारे शेती साहित्य वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू असून निंबोल येथील शेतकरी शरद पाटील यांनी शेतातून वाहून जाणाऱ्या ठिबक सिंचनाच्या नळ्या व इतर शेती साहित्य वाचण्याचा प्रयत्न केला आहे.
Pune Rain LIVE Updates: मुळशी धरण ९५% भरले
मुळशी धरण ९५% भरले आहे व पाऊस अधिक प्रमाणात होत आहे.
मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 5000 Cusecs विसर्ग सकाळी १२:०० वाजता सुरू करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
हे आपल्या माहितीसाठी सविनय सादर.
Pune Rain:पुण्यातील सिंहगड रोड जॅम, वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुण्यातील सिंहगड रोड जॅम
पुण्यातील सिंहगड रोड वर परिस्थिती जैसे थे
पुण्यात मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण
सिंहगड रोड वरील वाहतूककोंडी वर उपयोजना कधी? पुणेकरांचा प्रश्न
सकाळच्या वेळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी
सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Pune Rain LIVE Updates: पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
सलग २ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरणातून मुठा नदीत होणारा विसर्ग वाढवला
सध्या कुठल्या धरणातून किती विसर्ग
कासारसाई: ५६० क्युसेक्स
वरसगाव धरण: ३९०९ क्युसेक्स
खडकवासला धरण: ४१७० क्युसेक्स
भाटघर धरण: १२,११४ क्युसेक्स
पानशेत: ३९९६ क्युसेक्स
पवना: २८६० क्युसेक्स
Pune Rain News: पुण्यात आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस
पुण्यात आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस
पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याचा आज ऑरेंज अलर्ट
शहरातील अनेक भागात आज सकाळपासून मुसळधार पाऊस
पुणे शहरासह घाट माथ्यावर देखील कालपासून जोरदार पाऊस
पावसामुळे रस्त्यावर हळूहळू पाणी साचायला सुरुवात
शहरात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता
Pune Rain LIVE Update: खडकवासला धरणातून मोठा विसर्ग
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 4170 क्युसेक वाढवून सकाळी 11.00 वा.7561क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
Mumbai Rains Update : मुंबईत मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, कुर्ल्यात NDRF टीम तैनात
मुंबई मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, कुर्ला पुलावरील क्रांतीनगर येथे पाणी पातळीत वाढ, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात, जवळपासच्या रहिवाशांना BMC कडून सतर्क राहण्याच्या सूचना
Mumbai Rain LIVE Updates: कल्याणमध्ये मुसळधार
कल्याण डोंबिवली सकाळपासून मुसळधार पाऊस
कल्याण कोर्टासमोर रस्त्यावर साचले पाणी
या साचलेला पाण्यामुळे वाहन चालक, रिक्षाचालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईत पावसाचे थैमान: सर्वाधिक पावसाची नोंद झालेले परिसर
मुंबईत पावसाचे थैमान: सर्वाधिक पावसाची नोंद झालेले परिसर...
Mumbai Rain LIVE Updates: कळवा मुंब्रा खाडीला भरतीला सुरुवात
कळवा मुंब्रा खाडीला भरतीला सुरुवात...
सतत दोन दिवसात पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात...
ठाण्याला लागूनच असणारा कळवा खाडी आणि मुंब्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाडीला भरतीला सुरुवात झाली असून खाडी मध्ये असणाऱ्या बोटीला प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे....
Mumbai Local Train Stutus: पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! तिन्ही मार्गावरील लोकल उशिरा
मध्य रेल्वे (Central Railway) ३० ते ४० मिनिटे उशिरा, पश्चिम रेल्वे (Western Railway) १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहे. त्याचबरोबर हार्बर (Harbour Line) मार्गावरीलही गाड्या 25 ते 30 तसेच ट्रान्स हार्बर रेल्वे- 20 ते 25 मिनिटं उशिरा धावत असल्याची माहिती मिळत आहे. क
Mumbai Rains : इंडिगो एअरलाईनकडून प्रवाशांसाठी गाईडलाईन जारी
इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांसाठी गाईडलाईन जारी केली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर पाणी साचले आहे आणि वाहतूक मंदावली आहे. यामुळे ऑपरेशनल अडचणी निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे उड्डाणे आणि आगमन दोन्हीमध्ये विलंब होत आहे.
Pune Rains Update: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, पूढील ३ तास महत्त्वाचे
पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील ३ तासांत छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Mumbai Rains Update: दादर टीटी परिसरात पाणी साचलं
दादर टीटी परिसरात पाणी साचलं
नागरिकांना गुडघाभर पाण्यातून काढवी लागतेय वाट
वाहतुकीवरही परिणाम
Maharashtra Rain: रत्नागिरी जिल्ह्यात तुफान पाऊस,हरचेरी बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता
जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार
रत्नागिरीतल्या काजळी नदीने ओलांडली इशारा पातळी
नदीने पातळी ओलांडल्याने चांदेराई लांजा रस्त्यावर पाणी
रसत्यावर जवळपास तीन फुट पाणी,चांदेराई लांजा अशी वाहतुक ठप्प
हरचेरी बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता
भितीने व्यापाऱ्यांकडून सामानाची हलवाहलव
Raigad Rain LIVE Update: रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू
रायगड जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू आहे. जोर कमी झाला असला तरी अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी कमी झाल्याने महाडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र माणगाव मधील पाणी अद्याप ओसरलेले नाही.
माणगावात बामणोली रोडवर अजूनही पाणी साचले असून नागरिकांनी उभी करून ठेवलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. हवामान खात्याने आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क आहे. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
Mumbai Rain Local Train LIVE Stutus: कल्याणमधून निघणाऱ्या लोकल गाड्यांचाही खोळंबा
कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. सध्या लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती
Mumbai Rain Local Stautus: पावसाचा लोकल सेवेवर परिणाम! पश्चिम रेल्वेवरील गाड्या उशिरा
मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या 15- ते २० मिनिटे उशिरा धावत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. सध्या पंपाद्वारे पाणी काढण्याचे पाणी सुरु आहे.
Mumbai Rain LIVE Updates: वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा, सखल भागामध्ये पाणी साचले
वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाचा तडखा.. अनेक सखल भागामध्ये पाणी साचले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. नालासोपाराअचोले रोड नालासोपारा वसई लिंक रोड, डॉन लेन, स्टेशनं परिसरात पाणी भरले, तर विरार पश्चिम भागातील रस्ते पाण्याखाली.. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच खासगी आणि अनुदानित शाळांना शाळांना सुट्टी जाहीर केली आहे
Mumbai Rain LIVE Updates: मुंबई उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु, एलबीएस मार्गावर पाणी
मुंबई उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू
Lbs मार्गावर पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात
घाटकोपर,विक्रोळी, कांजूर मार्ग, भांडुप मधील सकल भागात पाणी भरण्यास सुरुवात
Kolhapur Rain LIVE Updates: कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीच्या सातही धरणातून पाणी विसर्ग सुरु
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला
रात्रभर संततधार पाऊस
राधानगरी धरणच्या सातही धरणातून पाणी विसर्ग सुरु
पंचगंगा नदीची पाणी पातळी 34.9 फुटावर
प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
आपत्तीव्यवस्थापन विभाग सज्ज
Buldhana Rain LIVE Updates: सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीने बांध फुटला; शंभर एकर शेतीचे नुकसान
बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथिल शेततलाव फुटला मुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सदर मातीनाला शेत तलावांचे निर्माण आठ वर्षापूर्वी झाले होते या माती नालाबांध तलावाचे व्यवस्थित देखरेख न झाल्याने या भागात मुसळधार पाऊस पडल्याने हा फुटल्याने परिसरातील शंभर एकर शेतीचे नुकसान झाले आहे रमेश खरात उध्दव खरात यांच्या शेता लगत हा बांधारा.होता फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमानत नुकसान झाले आहे.
Mumbai Rain LIVE Update: भांडुपच्या सकल भागात पाणी साचलं
सकाळपासून उपनगरात जोरदार पावसाची हजेरी: भांडुपच्या सकल भागात पाणी साचायला सुरुवात; सकळ भागात पाणी साचल्यामुळे घरात आणि दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी
Konkan Rain LIVE Updates: तळकोकणात मुसळधार, मासेमारीसाठी जाऊ नये, नितेश राणेंचे आवाहन
तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातू वाहणाऱ्या कर्ली नदीच्या उगमा जवळील तीन ते चार पूल पाण्याखाली गेली. आंबोली मधील मुख्य धबधब्याचे रौद्ररूप धारण केलं. जिल्हाला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर विजयदुर्ग ते तेरेखोल पर्यंत उंच लाटांचा इशारा आज दुपार नंतर ते उद्या दुपारी २:३० या वेळेत ३.५-३.७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी देखील सोशल मीडियावरून केलं आहे.
Mumbai Rain LIVE Updates: गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं
मुंबईमधील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले..
Mumbai Rain LIVE Updates: खडकवासला धरणातून विसर्ग वाढणार, नागरिकांनी सतर्क राहावे!
खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या अतिपर्जन्यमुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आज सकाळी 8 वाजता धरणातून 2178 क्युसेक तर सकाळी 9 वाजता 4170 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, पुणे यांनी दिली आहे.
पुढील काळात पावसाचे प्रमाण आणि धरणातील येव्या नुसार विसर्गाचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.
प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Rain LIVE Updates: दादर टीटी परिसर, अंधेरी सवबे परिसरात पाणी साचलं
मुंबईमध्ये पावसाचे धुमशान सुरु असून दादर टीटी सर्कलला पाणी साचलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचल आहे, त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करायला लागत आहे.
Maharashtra Rain: अकरावी प्रवेशाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे
त्यामुळे अकरावीला प्रवेश घेणान्या विद्यार्थयाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने विद्यर्थयाना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश् घेण्याठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे
त्यानुसार ११ ते २० ऑगस्टपर्यत असलेली मुदत २२ ऑगस्टपर्यत वाढविण्यात आली आहे
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईत सलग पाचव्या दिवशी पावसाचे तुफान
मुंबईत सलग चौथ्या दिवशी पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे
मुंबईत आज रेड अलर्ट जाहीर केलं आहे
पुढचे काही तास पाऊस असाच सुरु राहिला तर काल सारखी परिस्थिती होऊ शकते
Mumbai Rain LIVE Updates: पुढील 3 तास महत्त्वाचे... मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा
पुढील ३ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.
Mumbai Rain LIVE Updates: कल्याण, बदलापूरमध्ये रस्त्यांवर पाणी...
कल्याण -बदलापूर रोडवर वीमको नाका परिसरात रस्त्यावर साचले पाणी.. या पाण्यातून मार्ग काढताना मुंबईकरांची मोठी कसरत पाहायला मिळत आहे.
Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे माती खचून झाडे पडली
लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आल्याचे पहायला मिळत आहे तर शेती पीकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी माती खचुन झाडं आडवी पडली असल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. शेतीतला उस आडवा पडला आहे तर हाता तोंडाशी आलेली उडीद आणि मुगाची पिकं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईत पावसाची बॅटिंग सुरुच
मुंबईमध्ये सोमवारपासून सुरु झालेला पाऊस आजही सुरु आहे. शहरातील ठाणे, कळवा, नवी मुंबई, घाटकोपर, साकीनाका परिसरात तुफान पाऊस कोसळत आहे. हवामान खात्यानेही आज रेड अलर्ट जारी केला आहे.