जाहिरात
8 days ago

 Maharashtra Elections 2026 Live Updates: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मुंबईकरांसाठी वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर आजपासून ठाकरे बंधु प्रचारदौरा सुरु करणार आहेत. आपल्या सभांमधून ठाकरे बंधु कोणावर निशाणा साधणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये दबावतंत्राचा वापर करुन बिनविरोध निवडणुका केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. याचसंदर्भात आज मनसे नेते कोर्टात धाव घेणार आहेत. 

BMC Election LIVE Updates: भाजपच्या प्रचारासाठी येणार सेलिब्रेटी, मनोज तिवारी ते दिनेश यादव, यादी आली समोर

भाजपात प्रचारासाठी सेलिब्रिटी राजकीय नेते मुंबईत 

माधवी लता, मनोज तिवारी, रवीकिशन, दिनेश यादव -(निरवर ) हे या आठवड्यात मुंबईत प्रचारासाठी येणार

मुंबई वसई विरार मिरा भाईंदर येथे प्रचार करणार

मुंबईत बिहार, उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मतदार प्रभाव क्षेत्रात सिलेब्रिटी राजकीय  नेते प्रचार करणार

उत्तर प्रदेश सीएम योगी आदित्यनाथ नेमकी कधी यांचा दौरा अद्याप निश्चित नाही

BMC Election LIVE Updates: महापालिका निवडणूकीसाठी मनसे ॲक्शन मोडवर, युवकांची ताकत उभी करणार

महापालिका निवडणूकीसाठी मनसे आता ॲक्शन मोडवर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता युवकांची ताकत ही महापालिका निवडणूकीसाठी सज्ज करणार आहे ..

 मनसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली ..

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचा अँक्शन प्लॅन आता पाहिला मिळणार आहे 

माहीम विधानसभा मतदार संघातील विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱी या वेळी बैठकीला उपस्थित होते .. 

महानगर पालिका निवडणुकीसाठी विध्यार्थी सेनेच्या कामा बाबत केलं मार्गदर्शन…

BMC Election 2026 LIVE Update: श्रीकांत शिंदेनी बोलवली बैठक

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना नेत्यांची डाॅ श्रीकांत शिंदेनी बोलवली बैठक

या बैठकिला शिवसेना मंत्री उदय सामंत, योगेश कदम पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शितल म्हात्रे राहणार उपस्थित

 नंदनवन बंगला येथे ४ वा ही महत्वाची बैठक होणार आहे

या बैठकित मुंबई महापालिकेच्या अनुशंगीने वचननामा संदरभात ही बैठक असेल

 याशिवाय पक्षातील उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार याबाबत नियोजन केले जाणार आहे

BMC Election 2026: उद्धव ठाकरेंचा शाखा भेटी आणि प्रचार सभांचा धडाका

उद्धव ठाकरे यांचा शाखा भेटी आणि प्रचार सभांचा पुढील सलग दहा दिवस धडाका

पहिल्या तीन ते चार दिवस शाखा भेटींवर विशेष लक्ष तर शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा तर राज ठाकरेंसोबत संयुक्त सभांचे नियोजन

 आज वरळी शिवडी भायखळा विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागांना शाखांना उद्धव ठाकरे भेटी देणार 

 सहा जानेवारीला अंधेरी पूर्व जोगेश्वरी दिंडोशी या विधानसभा क्षेत्रातील शाखांना उद्धव ठाकरे भेटी देणार... कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधणार 

 7 जानेवारीला  दादर माहीम,धारावी, चेंबूर कुर्ला या विधानसभा क्षेत्रातील शाखांना भेटी देणार 

८ जानेवारीला वर्सोवा कलिना गोरेगाव या विधानसभा क्षेत्रातील शाखांना भेटी  

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार सभांचा  नियोजन

 9 जानेवारीला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची नाशिक येथे संयुक्त सभा 

 10 जानेवारीला उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा 

 11 जानेवारी आणि 12 जानेवारी या दोन दिवशी ठाणे आणि दादर शिवाजी पार्क येथे राज ठाकरे उद्धव ठाकरे संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती 

( शिवाजी पार्क ज्या दिवशी सभेला परवानगी मिळेल त्या दिवशी 11 किंवा 12 ला सभा होईल )

LIVE Update: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुकुंदवाडी परिसरात प्रचार रॅली

ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुकुंदवाडी परिसरात प्रचार रॅली 

अंबादास दानवे पायी चालत रॅलीत सहभागी 

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचार रॅलीचा धडाका

ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील विविध ठिकाणी रॅलीचे आयोजन...

PMC Election LIVE Updates: हाच का दादाचा वादा? अजित पवारांच्या सभेआधी बॅनर झळकले

पुण्यात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे, प्रभाग क्र ९ मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा यांना प्रश्न विचारणारे बँनर्स लावण्यात आले आहेत...

हाच का दादाचा वादा????

अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये पैसे वाटणाऱ्यांच्या प्रचार करणार का ? हाच का दादाचा... वादा

अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का ? हाच का दादाचा... वादा

अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचा  प्रचार करणार का ? हाच का दादाचा... वादा

दादा तुमच्यकडून ही अपेक्षा नव्हती....

 तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे परंतु प्रचंड नाराज असणारे प्रभाग क्र ९ मधील सर्व मतदार.

आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रभाग क्र ९ मध्येच जाहीर सभा आहे.. त्यामुळे दादा याला काय उत्तर देतात याकडे सगळयांचे लक्ष असेल..

थेट अजितदादांनाच लक्ष केल्याने पुण्यात सर्वत्र या बॅनरची चर्चा सुरू आहे..

Jalna Election 2026: मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी नाराजीनाट्य, जालन्यात भाजपची बैठक

 जालना महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली विजय संकल्प सभा आज जालन्यात होत असताना महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज नाराज असलेल्या सुनील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक जाण्यात सुरू आहे.

Thane Election LIVE Updates: बालेकिल्ला वाचण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात आज रोड शो

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेना पक्षाचे उम्मीद्वारांना निवडणूक आणण्यासाठी आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी ५ वाजल्या पासून रोड शो ला सुरुवात करणार आहे..

प्रामुख्याने ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि अशातच आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून प्रचार करणार आहे, 

रोड शो मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि शिवसेना पक्षाचे इतर मुख्य नेते देखील उपस्थित राहणार....

PMC Election LIVE Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा 

पुणे शहरात आज मुख्यमंत्र्यांच्या दोन जाहीर सभा 

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आज पहिल्यांदाच पुण्यात 

येरवडा आणि कात्रज परिसरात मुख्यमंत्री घेणार उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

PMC Election LIVE UPdate: पुणे महापालिका निवडणूक: अपक्ष म्हणून लढत असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप

महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून लढत असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे  वाटप

मोबाईल,छत्री ,मेणबत्ती ,कपबशी, कपाट अशा चिन्हाचा निवडणूक चिन्हांमध्ये समावेश 

 पुणे महापालिकेत एकूण २७७ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

 खुल्या यादीतील 91 चिन्हांमधून अपक्ष उमेदवारांना चिन्हांच वाटप

BMC Election LIVE Update: ठाकरे बंधुंचा शिवडी आज विधानसभेत एकत्रित दौरा

ठाकरे बंधुंचा शिवडी आज विधानसभेत एकत्रित दौरा...

शिवडी विधानसभा ठाकरे बंधुंचा बालेकिल्ला...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा आज लालबाग - परळ, शिवडीमध्ये शाखा भेटीचा दौरा... 

लालबाग येथील प्रभाग क्र. 204 मधून करणार प्रचाराची सुरवात...

सुरवातीला उद्धव ठाकरे यांचा वरळीमध्ये शाखाभेटी दौरा होईल त्यानंतर दोन्ही भावांचा शिवडी दौरा

Chhatrapati Sambhajinagar Election LIVE Update: प्रचार रॅलीत नोटांची उधळण, छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर: 

प्रचार रॅलीत नोटांची उधळण 

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार आला समोर 

एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

रॅलीत एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण 

निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप

Listen to the latest songs, only on JioSaavn.com