Ola Uber Rapido Safety Rules: महाराष्ट्र शासनाने टॅक्सी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबरसारख्या एग्रीगेटर कंपन्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या धोरणात प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी 'राइड पूलिंग' सेवेबाबत कडक निकष लागू करण्यात आले आहेत. यापुढे केवळ कायदेशीर व अधिकृत प्रक्रिया पूर्ण केलेल्या प्रवाशांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
महिला प्रवाशांसाठी खूशखबर
राज्य सरकारच्या नव्या नियमांनुसार, ज्या प्रवाशांची 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण झाली असेल, त्यांनाच राइड पूलिंग सेवेचा लाभ घेण्याची परवानगी असेल. ही सुविधा अशा प्रवाशांसाठी असेल ज्यांचा प्रवासमार्ग साधारणपणे एकच आहे, जरी त्यांचे उतरण्याचे स्टॉप्स थोडेफार वेगवेगळे असले तरी चालतील.
Nashik News : नाशिकमध्ये हळहळ! नवविवाहित दाम्पत्याच्या संसाराचा झाला भयानक शेवट, शिक्षिकेसह पतीचा मृत्यू
विशेष म्हणजे, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रत्येक महिला प्रवाशाला केवळ महिला सहप्रवाशांसोबतच राइड पूलिंग करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एग्रीगेटर ॲपच्या माध्यमातून होणारा हा प्रवास करार एक कायदेशीर 'व्हर्च्युअल कॉन्ट्रैक्ट' मानला जाईल.
राइडदरम्यान मार्ग बदलण्याबाबतही (डिटूर) कडक अटी घालण्यात आल्या आहेत.
फक्त महिलांसोबतच प्रवासाचा पर्याय
ठरलेल्या मर्यादेबाहेर वाहन वळवता येणार नाही आणि याची पूर्वकल्पना सर्व प्रवाशांना देणे बंधनकारक असेल. तसेच, ज्या प्रवाशाने सर्वात आधी राइड बुक केली आहे, त्याची मंजुरी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे, चालकाने वेळेत न पोहोचल्यास किंवा प्रवाशांनी विनाकारण राइड रद्द केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे वादाचे प्रसंग टळण्यास मदत होईल.
नक्की वाचा >> Ahilyanagar News : नीट पेपरफुटीचा तणाव जीवावर बेतला, कर्जतच्या विद्यार्थीनीनं आयुष्य संपवलं, ती चिठ्ठी व्हायरल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world