जाहिरात

Local Body Election Reservation : तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण होणार? आरक्षणाची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Local Body Election Reservation Draw Full List: नगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यात अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे.

Local Body Election Reservation : तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण होणार? आरक्षणाची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Nagarpanchayat Mayor Reservation Draw: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका (Municipal Councils) आणि १४७ नगरपंचायतींच्या (Nagar Panchayats) नगराध्यक्षपदाचे आरक्षण बुधवारी (Wednesday) जाहीर करण्यात आले आहे. नगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यात अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे.

मंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal)  यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरक्षणामुळे अनेक विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांना आता पुढील राजकीय वाटचाल निश्चित करावी लागणार आहे. आरक्षण सोडतीनुसार, नगराध्यक्षपदासाठी विविध प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आहे.

Akola News: '...तर सरकारला कर्जमुक्ती करावीच लागेल', रविकांत तुपकरांचा निर्वाणीचा इशारा

नगरपंचायतींसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण (३७ जागा): नगरपंचायतींमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी (Open Women) खालील जागा आरक्षित झाल्या आहेत:
मोहाडी, बार्शी टाकळी, वाशी, नाडगाव, गुहागर, राळेगाव, लाखादूर, वैराग, सोयगाव, महादूला, अनगर, कडेगाव, पेठ, पाटण, औंढा नागनाथ, लाखणी, रेणापूर, नातेपुते, महसला, सडक अर्जुनी, दिडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, शिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवणी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताई नगर, बाभुळगाव.

नगरपरिषदांसाठी खुला महिला प्रवर्ग आरक्षण (६४ जागा):
राज्यातील महत्त्वाच्या ६४ नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामध्ये परळी वैजनाथ, मुखेड, आंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर (कोल्हापूर), मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदुरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनुरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगूड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदुररेल्वे, चांदुरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलूस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदिरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगांव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग या प्रमुख शहरांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती (SC) महिलांसाठी आरक्षण:
३३ नगरपरिषदांपैकी १७ जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ या नगरपरिषदांचा समावेश आहे.

ओबीसी महिलांसाठी आरक्षण:
६७ नगरपरिषदांपैकी ३४ जागा ओबीसी (OBC) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. यात भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवादी, धामणगावरेल्वे, वरोरा या नगरपरिषदांचा समावेश आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com