Maharashtra Live Blog: पुणे शहरात सध्या गुइलेन बॅरेच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेनचे नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र मंगळवारी दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकूण रुग्णांमध्ये 0 ते 9 आणि 10 ते 19 वयोगटातील मुलांची संख्या अधिक 37 इतकी तर 60 ते 69 वयाचे 8 जण आहेत.
दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांचा ते प्रचार करणार असून फडणवीस यांच्या रॅली आणि जाहीर सभा होणार आहेत.
Mahakumbh Stampede : 'महाकुंभमधील मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत, घटनेची न्यायालयीन चौकशी होणार'
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये (Prayagraj Mahakumbh) बुधवारी मौनी अमावस्याच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
योगी सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना 25-25 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमधील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण;2 महिला आणि एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु सतर्क राहण्याचं अधिष्ठात्यांनी आवाहन केलं आहे. मागील वर्षभरात जीबी सिंड्रोमच्या 90 रुग्णांवर उपचारही केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
प्रयागराजमधील कुंभमेळा चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 30 वर पोहोचली
प्रयागराजमधील कुंभमेळा चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 30 वर पोहोचली आहे. याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज इथं कोट्यवधी भावीक जमा झाले आहेत.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गणेश नाईक यांची दांडी
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गणेश नाईक यांची दांडी मारली. त्यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान आजच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीला एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक समोरासमोर येतात का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. मात्र गणेश नाईक यांनी या बैठकीला दांडी मारली आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच आहेत. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर करत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा आहे. दरम्यान न्यायमूर्ती किल्लोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
Latur GBS Patient: लातूरमध्ये GBSचे दोन संशयित रुग्ण
लातुरात GBS चें दोन संशयित रुग्ण आढळले आहेत.. त्यांच्यावर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत..लातूर शहरातील दोन जण असल्याची माहिती आहे त्यात एक महिला आणि पुरुष असल्याचे सांगण्यात येत आहे... गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत...GBS हा संसर्गजन्य आजार नाही .नागरिकांनी शारीरिक स्वच्छ्ता करावी आणि पिण्याचे पाणी उकळून प्यावे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयाचे डीन डॉ उदय मोहिते यांनी दि
Pune News: मनोज जरांगे यांच्या समर्थनात पुण्यात मराठा समाजाचे उपोषण
मराठा आरक्षणासाठी आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी ते 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. आंदोलन सुरू करून पाच दिवस झाले तरी सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पुण्यात देखील मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे. या आंदोलनात 10 दिवस माराठा आंदोलनकर्ते आंदोलन उपोषण करणार असून त्याचबरोबर येत्या दोन दिवसात जर सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. तर राज्यभर मराठा समाजाचा आक्रमक आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
Ajit Pawar: पालकमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधाने करु नका.. अजित पवारांचा रायगडच्या शिवसेना नेत्यांना इशारा
रायगड पालकमंत्री विषयी सार्वजनिक वादग्रस्त विधान करू नका - अजित पवार यांची शिवसेना आमदार यांना सूचना
रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी भेट अजित पवार यांची घेतली
तटकरे यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य थोरवे दळवी यांनी केले त्यावरून अजित पवारांनी लोकप्रतिनिधीनी वादग्रस्त विधान करु नका अशा सूचना केल्या.
सीएम आणि डीसीएम दोघे ठरवून पालकमंत्री विषय सोडवतील ते पर्यंत वाद नको सरकारची प्रतिमा खराब करु नका - अजित पवार यांच्या सूचना -
पालकमंत्री पद यावरुन अडीच - अडीच वर्ष तोडगा काढला जावा अथवा रायगड पालकमंत्री एनसीपीकडे आणि सहपालकमंत्री पद शिवेसना घ्यावे असा सूत्र ठेवाव असा सल्ला दिल्याचा चर्चा - सूत्र
Pune Crime: पुण्यात तब्बल 1 लाख 40 हजारांची चोरीची वाहने जप्त
पुण्यात तब्बल 1 लाख 40 हजारांची चोरीची वाहने जप्त
पुण्यातील लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई
गेल्या अनेक दिवसापासून लोणी परिसरात वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक
आरोपी गेल्या दीड वर्षांपासून करत होता परिसरात वाहनांची चोरी
सागर प्रकाश जाधव असं अटक करण्यात आलेल्या सराईत चोराच नाव
आरोपीकडून चोरीची अनेक वाहने पोलिसांनी केली जप्त
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण! धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांच्या भेटीला
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 51 दिवस झाले आहेत. जो पर्यंत शेवटचा श्वास असेल तो पर्यंत त्यांची आठवण कायम राहील अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. मी त्यांच्या सोबत सावली सारखा काम करायचो. धनंजय देशमुख यांच्याकडून आठवणींना उजाळा
Beed News: बीड जिल्हा बँकेच्या बैठकीत धनंजय मुंडेंची ऑनलाईन हजेरी
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे हे ऑनलाईन द्वारे दिल्ली मधून सहभागी झाले. बीड जिल्हा बँकेला तीनशे कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Ashok Dhodi Case: अशोक धोडी अपहरण प्रकरण; चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अशोक धोडी अपहरण प्रकरण:
अपहरण प्रकरणातील चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
संध्याकाळपर्यंत प्रकरणाचा उलगडा होणार
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची माहिती
काल पोलिसांच्या ताब्यातील मुख्य संशयित आरोपी अविनाश धोडी झाला आहे फरार
तपासासाठी पोलिसांची आठ पथकं कार्यरत
अविनाश धोडी हाच खरा आरोपी असून तो पोलिसांच्या ताब्यातून पळालाच कसा..?
पोलिसांच्या तपासावर अशोक धोडी यांच्या पत्नीचा सवाल
PM Narendra Modi: 'महाकुंभ' सोहळ्यातील दुर्घटना दुर्दैवी: PM नरेंद्र मोदी
प्रयागराज महाकुंभ सोहळ्यात घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात व्यक्त आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आबे.
Maharashtra Politics: रणजितसिंह मोहितेंच्या अडचणी वाढल्या, भाजपकडून कारवाई होण्याची शक्यता?
भाजपा विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच होणार पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षाने रणजितसिंह मोहिते यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती, त्यानंतर मोहितेंकडून यासंदर्भात उत्तर दिले गेले
पक्ष विरोधी भूमिका मांडली नाही असा खुलासा या कारणे दाखवा नोटीस मध्ये मोहिते यांनी केल्याचा दावा मोहिते यांनी भलेही दावा केला तरी त्यांच्या विरोधात सबळ पुरावे पक्षाकडे असल्याने पुढील कालावधीत मोहिते यावर कारवाई होण्याची शक्याता आहे.
Pune News: पुण्यात कोयता गँगचा धुडगूस, 8-10 वाहनांची तोडफोड
पुण्यातल्या जनता वसाहत मध्ये कोयता गॅंगची दहशद, वाहन तोडफोडी सत्र सुरूच
पर्वती पोलीस स्टेशनच्या हाद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड
आज 8 ते 10 वाहन फोडली या मध्ये रिक्षा, छोटा हत्ती, चार चाकीच मोठं नुकसान
घटने मुळे परिसरात भीतच वातावरण, नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर
पक्ष आणि अजित दादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल: धनंजय मुंडेंनी मांडली भूमिका
एनसीपी आमदार समोर धनंजय मुंडे मांडली भूमिका
पक्ष आणि अजित दादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल, तेच ठरवतील माझ्या विषयी काय करायचे - मुंडे
काल रात्री अजित पवार समोरच मुंडे यांनी भूमिका मांडताना होत असेलेल्या आरोप संदर्भात सर्व एनसीपी आमदार समोर भूमिका मांडली
मुंडे यांच्या विषयी आरोप केलेले दमानिया भेटी विषयी माहिती अजित पवार यांनी सर्व पार्टी आमदार यांना दिली. दमानिया दिलेले सर्व कागदपत्रे सीएम यांच्याकडे दिल्याचे अजित पवार यांनी सर्व आमदारांना बैठकीत सांगितले.
धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक काहीजण राग ठेवत आरोप करत असल्याचा खुलासा बैठकीत केला.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर आज उपचार सुरु
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे.रात्री आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा,उपचार घ्या अशी विनंती केली होती.उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय
Jalna Accident: जालन्यात दुचाकी कंटेनगरचा भीषण अपघात, 2 ठार
जालन्यातून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांची दुचाकी कंटनेर खाली येऊन चिरडल्याने दोन जण ठार झाल्याची दुर्दवी घटना जालना शहरातील औद्योगिक वसाहती जवळ असलेल्या हॉटेल संराईज हॉटेल जवळ घडलीय.छत्रपती संभाजीनगर कडून येणारा कंटनेर औद्योगिक वसाहतीकडे वळण घेत असताना भरधाव येणारी दुचाकी कंटेनेरवर धडकल्याने हा अपघात झालाय. कंटेनेरच्या चाकाखाली दुचाकी स्वार आल्याने या अपघातात बबन पठाडे आणि बाळू गव्हाड या दोघांचा जागीच चिरडून मृत्यु झालाय .घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे...
live Updates: वाल्मिक कराडला CID कार्यालयात पोहोचवणाऱ्या शिवलिंग मोराळेच्या वडिलांवर गुन्हा
वाल्मिक कराडला CID कार्यालयात पोहोचवणाऱ्या शिवलिंग मोराळेच्या वडिल पांडुरंग मोराळे यांनी ड्राय डेच्या दिवशी देशी दारू विक्री केल्याचे उघड झाले आहे. नेकनूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. वाल्मिक कराडला CID कार्यालयात पोहोचवणाऱ्या शिवलिंग मोराळेचे नाव आधीच चर्चेत आहे. आता त्याच्या वडिल पांडुरंग मोराळे यांनी ड्राय डे दिवशी दारू विक्री केल्याचे समोर आले आहे.. 26 जानेवारी, ड्राय डेच्या दिवशी निवडुंगवाडी परिसरातील बिअर बारच्या मागे पांडुरंग मोराळे आणि सचिन बुकतुरे हे दारू विक्री करताना आढलुन आले.. या प्रकरणी दोघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
MNS News: मनसेच्या दणक्यानंतर स्टार इंडियाचे राज ठाकरेंना पत्र, मराठीत समालोचन करण्याचे आश्वासन
स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र:
पत्रात खालील उल्लेख आम्ही, स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डिजिटल/ऑनलाइन ऑडिओ-व्हिज्युअल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे मालक आहोत आणि ऑपरेट करतो, जे सध्या Disney+ Hotstar म्हणून ओळखले जाते
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ("चॅम्पियन्स ट्रॉफी") च्या संदर्भात डिस्ने + हॉटस्टार वर 19 फेब्रुवारी 2025 ते 9 मार्च 2025 पर्यंत प्रसारित होणार आहे, सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत. यानुसार, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचे भारताचे सामने Disney+ Hotstar वर मराठी कॉमेंट्रीमध्ये उपलब्ध करून देऊ. पत्रात आम्ही मराठी मध्ये कॉमेंट्री उपलब्ध करू अशी माहिती देण्यात आली आहे
Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह धनंजय मुंडेही दिल्लीत
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न धान्य पुरवठा मंत्री धनंजय मुंडे दोघे ही दिल्लीत राहणार आहेत. फडणवीस दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार तर मुंडे प्रशासकीय कामकाजासाठी दिल्लीमध्ये आहेत. मुंडे आणि फडणवीस यांच्या दिल्लीतील इतर नेत्या सोबत गाठीभेटी होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Manmad Accident: मनमाड- नगर महामार्गावर अपघात! एक जण जखमी
मनमाड - नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून रात्रीच्या सुमारास नवीन चेसी वाहन मनमाडकडून येवला दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चेसी चालक रोशन सिंग गंभीर जखमी झाला आहे ,दरम्यान या अपघातमुळे महामार्गवर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केलीअ
Amravati News: एसटी भाडेवाढविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीट दरात 15% केलेल्या वाढीचे निषेधार्थ अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन..
अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन...
अमरावती बस स्थानकामधून जाणाऱ्या एसटी बस रोखल्या..
राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी..
एसटी बस रोखल्याने अमरावती बस स्थानकात मोठी गर्दी...
Akola News: कारवाई न टाळण्यासाठी 8 हजाराची लाच मागितली, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
अकोल्यात दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीत एन सी प्रकरणांत प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी तक्रार करणाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याने 8 हजार रुपयांची लाच मागितली होती.. परंतु तक्रार करणाऱ्या फिर्यादीनीं एसीबीकडे तक्रार केली.. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी कारवाईत पंचासमक्ष लाचेची मागणी सिद्ध झाल्याने दहीहांडा पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल प्रफुल्ल दिंडोकार आणि एक खाजगी इसम शंकर जानराव तरोळे हे जाळ्यात अडकले आहेत, ही कारवाई अकोल्याच्या एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या पथकाने केली.
Bhandara News: भंडाऱ्यात शरद पवार गटाच मोठे बदल, माजी आमदार चरण वाघमारे नवे जिल्हाध्यक्ष
भंडाऱ्याच्या राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षात मोठा फेरबदल झाला असून जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांना बदलवत आता माजी आमदार चरण वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावतीने चरण वाघमारे यांना अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहेत.
Jalgaon News: स्विमिंग पूलमध्ये बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील जामनेर मधील सोनबर्डी परिसरात असलेल्या स्विमिंग पूल मध्ये 15 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून संकेत पाटील असे मृत मुलाचे नाव आहे. सोनबर्डी परिसरात नगर परिषदेच्या वतीने स्विमिंग पूलचे काम सुरू असून स्विमिंग पूल पाहण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या संकेतचा तोल गेल्याने स्विमिंग पूलच्या पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे जामनेर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.