Maharashtra Live Updates: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.
दुसरीकडे, दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रेला आज पहाटे पासून सुरुवात झाली आहे नऊ ठिकाणी भक्तांच्या रांगा लागल्या असून राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भक्तगण दाखल झाले आहेत आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले असून. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरत आहे.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव -2 पदावर नियुक्ती
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव -2 पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासले
पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात हे केले आहे. कर्नाटकात एसटी बसच्या कंडक्टरला कन्नड बोलता येत नाही म्हणून मारहाण केली होती. त्याचा निषेध म्हणून कर्नाटकच्या बसला पुण्यात काळे फासण्यात आले.
पुण्यातील 5 पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू
पुण्यातील 5 पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले आहेत. त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पाचही तरुण पुण्यातील हडपसर येथे राहणारे आहेत. शुभम सोनवणे आणि रोहित कोळी असं निधन झालेल्या तरुणांचे नाव आहे.
Nashik News: गाडीच्या डिक्कीतून 1 लाख 80 हजाराची रोकड लंपास
नाशिकच्या सिडको परिसरातील भर दिवसा चोरीची घटना घडली असून एका चोरट्याने सिडकोच्या मुथुट फायनान्सच्या ऑफिस बाहेर असलेल्या एका एक्टिवातून तब्बल 2 लाख 30 हजार रुपये 1 लाख 80 हजार रोकड लंपास केली
मोटर सायकल मालकाने आपले गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी काढलेली लोनची अदा करण्या करिता बाहेर गाडी लावली होती आणि तो ते सोने सोडवण्याकरता मुथूट फायनान्स मध्ये गेला असता हा प्रकार घडला
चोरी झालेल्या इसमाचे नाव अँथनी फर्मानडो असे असून हा एका कंपनीत कामगार म्हणून काम करीत आहे
याप्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे..
Live Updates: कर्नाटकला जाणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद! मारहाण प्रकरणानंतर मोठा निर्णय
मराठी वाहकाला कन्नड कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणींनंतर एसटी चालकांकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित कन्नड कार्यकर्त्यांविरोधात अधिकाऱ्यांनी तक्रार दिली असून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी देखील तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. एसटी प्रशासनकडून आवश्यक त्या खबरदारी घेण्यात आल्या आहेत.
Parli News: सुरेश धस यांच्या परळी दौऱ्याला मुंडे समर्थकांकडून विरोध
परळी शहरात भाजप आमदार सुरेश धस यांना मुंडे समर्थकांकडून विरोध करण्यात आला आहे. काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे. देशमुख हत्याप्रकरणात मुंडे आणि परळीची जी बदनामी सुरेश धस यांच्या माध्यमातून केली जाते आहे. ती थांबवली जावी अशी आग्रही भूमिका या ठिकाणी मुंडे समर्थकांनी घेतलेली आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता या ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला. परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीनंतर एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना सुरेश धस यांना हा विरोध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर झाली आहे.
Pune News: काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसणार? रविंद्र धंगेकरांच्या स्टेटसने चर्चा
'गळ्यात भगवा गाणं शाह का रुतबा', धंगेकरांच्या व्हाट्सअप स्टेटस ची जोरदार चर्चा
तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी
जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी
तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही हे गाणं स्टेट्स ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी दिला स्वकीयांना सूचित इशारा
काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावल्यानंतर रवींद्र धंगेकर यांचं स्वकीयांना डिवचणारं स्टेट्स
नुकतच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आलेल्या रवींद्र धंगेकर यांनी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटस मुळे धंगेकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव, मेट्रो सिनेमाजवळील इमारतीत आग
मुंबईमध्ये नरीमन चेंबर्स इमारतीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशनजवळ ही आग लागली असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Pune News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पश्चिम विभागाच्या गृह खात्याची बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पश्चिम विभागाच्या गृह खात्याची बैठक सुरू
बैठकीला तीन राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
यासह गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची देखील उपस्थिती
अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाच्य बैठकीला सुरुवात
Nagpur Accident: चारचाकीने दुचाकीला उडवले; तिघांचा जागीच मृत्यू
नागपूर मार्गावर भोसे जवळ चारचाकीने दुचाकीला उडवले
दुचाकीवरील तिघांचा मृत्यू... मयतामध्ये नवरा बायको आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश..
मयत हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ऊस तोड कामगार
ऊस तोड हंगाम संपल्याने दुचाकीवरून जात होते गावी
Nashik News: नाशिकमध्ये अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात
- अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात
- पालिका प्रशासनाकडून हिंदू संघटनांच्या आंदोलना पूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात
- पोलीस बंदोबस्तात महापालिकेची कारवाई
- संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्ताने सिल
- 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर आज कारवाई सुरू
- 11 वाजता सकल हिंदू समाजाकडून काढण्यात येणार मोर्चा
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात! 22 वर्षांचा तरुण जागीच ठार
पुण्यातील महंमदवाडी मध्ये भीषण अपघात
अपघातात 22 वर्षांचा तरुण जागीच ठार
कात्रज ते मंतरवाडी रस्तावर आज पहाटे घडला अपघात
वाहन चालकाचा चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने घडला अपघात
अपघातात चारचाकी कार शेजारी असलेल्या कठड्याला जोरात धडकली
रचत रोहित कपूर (२२)अस अपघातात मृत झालेल्या तरुणाचं नाव
Marathi Bhasha Din: प्रत्येक जिल्ह्यात उभारणार पुस्तकाचे गाव, राज्य सरकारचा मोठा निर्णय
मराठी भाषा दिनी प्रत्येक जिल्ह्यात उभारणार पुस्तकांचे गाव
मराठी साहित्य वाढवण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
२७ फेब्रुवारीपासून पुस्तकांचे गाव प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणार
Uday Samant Raj Thackeray: उदय सामंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला
मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला
मराठी साहित्य वाढवण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
मराठी भाषा दिनी प्रत्येक जिल्ह्यात उभारणार पुस्तकांचे गाव
२७ फेब्रुवारीपासून पुस्तकांचे गाव प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणार राज्य सरकार अभियान
२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त शासनाचा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याची माहिती
Mumbai News: शिवाजी पार्कवर गुंजणार मराठी आवाज! राज ठाकरे, विकी कौशल एकाच मंचावर
राज ठाकरे, अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर मराठी कविता वाचन करणार; शिवाजी पार्कवर गुंजणार मराठी आवाज
शिवाजी पार्कवर येत्या मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कविता वाचन करणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
यावेळी अभिनेता विकी कौशल, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, प्रख्यात लेखक जावेद अख्तर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सोनाली बेंद्रे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिवसभर पुण्यात
गृहमंत्री अमित शहा यांच्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. पुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ
सकाळी आकरा वाजता कोरेगाव पार्क परीसरातील हॅाटेल वेस्टीन येथे पश्चिम विभागीय परीषदच्या बैठकीला राहणार उपस्थित. गुजरात, गोवा, महाराष्ट्र या राज्यांच्या आणि दादरा नगरहवेली तसेच दिव दमन या केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींची बैठक. सुरक्षा विषयक बैठक
दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार.
त्यानंतर पाच वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम आणि निधीचे वितरण कार्यक्रम शहा यांच्या हस्ते होणार
Amravati News: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी आणि मदतनीस सेविकांचे उपोषण
- अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी आणि मदतनीस सेविकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन..
- सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी..
- आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी..
- मानधन नको वेतनश्रेणी द्यावी.. सेविकांची मागणी..
- अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू व्हायला पाहिजे..
- यासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं आंदोलन..
Anganewadi Yatra: आई भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात, भाविकांची अलोट गर्दी
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवसाला पावणारी भराडी देवी अश्या या देवीची ख्याती आहे यावेळी नऊ रांगांमध्ये भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ज्या दिवशी देव दीपवाळी ला सुरवात होते तेव्हा आमचा धार्मिक कार्यक्रम सुरू होतो