6 hours ago

Maharashtra Live Blog:  शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिंदेंचे धनुष्यबाण हाती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे आज शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन शिंंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. आज तीन वाजता ठाण्यातील टेंभी नाका येथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश पार पडेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना हा सर्वात मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना नवे आयकर विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केली होती.  अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार नवे आयकर विधेयक गुरुवारी (13 फेब्रुवारी) संसदेत सादर केलं जाईल. या विधेयकामध्ये कोणत्या खास गोष्टी असतील?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Feb 13, 2025 22:27 (IST)

अरुण गवळीच्या मुलीच्या लग्नाला ठाकरे गटाचे आमदार

अरुण गवळी यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा... विवाह सोहळ्याला ठाकरे गटाच्या आमदारांची उपस्थिती. ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांची देखील विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली.  शिवाय आमदार अजय चौधरी, आमदार सचिन अहिर यांची देखील विवाह सोहळ्याला उपस्थिती होती.  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गँगस्टर अरुण गवळी याला 28 दिवसाची संचित रजा मंजूर केली आहे.  त्यानंतर अरुण गवळी मागच्या आठवड्यात मुंबई येथील भायखळा येथील दगडी चाळ येथे दाखल झाले आहेत.

Feb 13, 2025 21:46 (IST)

खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले

खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले आहेत.  आरोपी सुदर्शन घुलेचे आवाजाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे.  खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.  यामध्ये सुदर्शन घुलेची चौकशी करून आज त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत.  उद्या सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी संपत असल्याने सुदर्शन घुलेला केज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Feb 13, 2025 21:38 (IST)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 फेब्रुवारीला दुपारी 3.30 वाजता उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 3 दिवसांच्या साहित्य संमेलनात अनेक परिसंवाद, मुलाखती यांचा समावेश आहे. तर साहित्य संमेलनाच्या समारोपाला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी असेल. 

Feb 13, 2025 19:19 (IST)

माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा वाहन अपघातात दुर्दैवी मृत्यू

अकोल्याचे मुर्तीजापुर विधानसभेचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे वाहन अपघातात निधन झाले आहे.  अकोल्यातील एचपी पेट्रोल पंप विमानतळ समोर हा अपघात झाला.  या अपघातामध्ये माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा दुर्दैवी निधन झालं आहे. तुकाराम बिडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते होते.  ते विदर्भ वैज्ञानिक महामंडळाचे अध्यक्ष सुद्धा राहिले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा अकोल्यात अपघात झाला होता. त्यात ते बचावले होते. 

Advertisement
Feb 13, 2025 19:03 (IST)

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  सकपाळ हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. ते राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. नाना पटोले यांच्या जागी सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. शिवाय विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्ष नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Feb 13, 2025 16:32 (IST)

राजन साळवी यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राजन साळवी यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राजन साळवी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्या बरोबर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजन साळवी यांनी कालच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 

Advertisement
Feb 13, 2025 16:09 (IST)

राजन साळवी यांचा पक्षप्रवेशावेळी मोठं शक्तीप्रदर्शन

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. ठाण्यात हा पक्षप्रवेश होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत हे उपस्थित आहेत.  

Feb 13, 2025 14:21 (IST)

Live Updates: कोकणात ठाकरेंना आणखी एक धक्का! माजी आमदार शिंदे गटात जाणार

कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का सत्र सुरू आहे. संगमेश्वर - चिपळूण या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बने 15 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यावेळी त्यांचा मुलगा, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. संगमेश्वर, चिपळूण आणि लांजामध्ये सुभाष बने यांची ताकद आहे. यावेळी बोलताना विकासकामांसाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याची प्रतिक्रिया सुभाष बने यांनी दिली आहे. राजन साळवी, सुभाष बने यांच्यासारखे जुने नेते पक्ष सोडत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापक्षात सध्या चलबिचल सुरू झाली आहे. 

Advertisement
Feb 13, 2025 14:08 (IST)

Kalyan News: कल्याणचे महेश गायकवाड पुन्हा शिवसेनेत? एकनाथ शिंदेंसोबत एकत्र दिसल्याने चर्चा

कल्याण पूर्वेचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड हे पुन्हा शिवसेनेत आलेत का? अशी चर्चा सुरू झालीये. कारण बुधवारी मलंगगड यात्रेदरम्यान महेश गायकवाड हे एकनाथ शिंदेंच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं, इतकंच नव्हे, तर एकनाथ शिंदेंच्या बाजूला उभं राहून त्यांनी मलंगगडावर आरतीही केली. एकनाथ शिंदे हे माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही महेश गायकवाड त्यांच्या बाजूलाच उभे होते, पण महेश गायकवाड हे तुमच्या सोबत आलेत का? या प्रश्नाला मात्र शिंदेंनी उत्तर दिलं नाही.

Feb 13, 2025 14:04 (IST)

Manoj Jarange Patil: शिंदे समितीला मुदतवाढ दिली, आता मनुष्यबळही द्या: मनोज जरांगे

 राज्य सरकारने न्या.संदीप शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे या निर्णयाबद्दल सरकारचं कौतुक करतो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनो दिली आहे.शिंदे समितीला मुदतवाढ दिली आता मनुष्यबळ देखील द्या अशीही मागणी  जरांगे यांनी केली आहे.ठरलेल्या चारही मागण्या तातडीनं लागू करा.15 तारखेपासुन साखळी उपोषण करायचं की नाही हे उद्या अंतर वालीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचं जरांगे यांनी संगीतल आहे.उदय सामंत यांचा सल्ला मि ऐकला आहे असा टोलाही जरांगे यांनी उदय सामंत यांना हाणला आहे.

Feb 13, 2025 13:26 (IST)

Kolhapur Crime: कोल्हापुरात गांजा अमली पदार्थांविरोधात पोलीस अँक्शन मोडवर

तरुण वर्गाला व्यसनापासून दूर करण्यासाठी गांजा विक्रीविरोधात कोल्हापुरात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिल्यानंतर तीन दिवसांत 77 गुन्हे दाखल झालेत. यामध्ये 108 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर 123 किलो गांजा जप्त करत कडक कारवाई सुरु केलीये. गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांची शहरातून धींड काढत पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

Feb 13, 2025 12:26 (IST)

Live Updates: धिंगाणा घालणाऱ्या युवक- युवतींना दणका! 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

गंगापूररोड परिसरात रविवारी रात्री मद्यधुंद युवती व युवकांनी धिंगाणा घालत पोलिसांना अरेरावी केल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी त्या युतीस सह हॉटेल चालक बाउन्सरसह 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणावरून मध्यधुंद युवकांचा व्हायरल व्हिडिओने शहर पोलिसांची चांगलीच बदनामी झाल्याने  गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची तडका फडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये  दोन युवती आणि हॉटेल चालक व  बाऊन्सर सह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला 

Feb 13, 2025 12:22 (IST)

Live Updates: यापुढे स्नेहभोजनाला जाऊ नका... आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना

एकनाथ शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला जाण्यास मनाई 

आदित्य ठाकरेंनी आपल्या खासदारांचा दिल्या सूचना 

शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका.” आदित्य ठाकरेंनी खासदारांना सुनावलं

Feb 13, 2025 10:52 (IST)

Beed Bews: महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट, तपासासाठी पथक स्थापन

महादेव मुंडे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक स्थापन 

मुंडे कुटुंबियांनी घेतली होती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट 

प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटी कडे देण्याची केली होती मागणी

पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश, पथकात असणार एकूण पाच सदस्य

एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल करणार महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास 

Feb 13, 2025 10:47 (IST)

Maharashtra Politcs: प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजन सोहळ्याला ठाकरे गटाचे खासदार

शिवसेना शिंदे गटाचे खासदार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.  काल रात्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्व खासदारांना स्नेहभोजन ठेवण्यात आले होते.  खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार भाऊसाहेब वाघचौरे,, हे नेते उपस्थित होते. 

Feb 13, 2025 10:44 (IST)

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट, अरविंद केजरीवाल यांच्याशीही चर्चा

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट: काल रात्री दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास भेट झाली. आज अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार, त्यानंतर  दुपारी दीड वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांशी आदित्य ठाकरे चर्चा करणार

Feb 13, 2025 09:43 (IST)

Prabhakar Karekar Passed Away: शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर यांचे निधन, संगीत जगतावर शोककळा

लोकप्रिय  शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे काल (12 फेब्रुवारी) रात्री निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रभाकर कारेकर हे गेल्या तीन वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते.  त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Feb 13, 2025 08:55 (IST)

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! तरुणावर जीवघेणा हल्ला

पुण्यातील हवेलीत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ 

एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला 

हल्यात तरुण वाचला मात्र हवेली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर केला कोयत्याने हल्ला 

सिंहगड परिसरातील घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Feb 13, 2025 08:54 (IST)

अशोक धोडी हत्या प्रकरण! सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण

घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचल बांगडी

अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी घोलवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन झाला होता प्रसार

मृत अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केले होते गंभीर आरोप

API गजानन पडळकर यांची पालघर पोलिस जिल्हा मुख्यालयात बदली

अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील अद्याप मुख्य आरोपी अविनाश धोडी सह 3 आरोपी फरार

Feb 13, 2025 08:53 (IST)

Washim News: वाशिम जिल्ह्यातील पाणी साठा घटला, पाणी टंचाईची शक्यता

वाशिम जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि इतर आवश्यक गरजांवर होण्याची शक्यता आहे.नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, जलसंवर्धनासाठी विशेष पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. जर योग्य नियोजन झाले नाही, तर आगामी काळात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Feb 13, 2025 08:52 (IST)

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावातील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागला आहे. पालघरमधील हालोली गावाच्या हद्दीतील कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालाय, सुभाष अमृत वड (वय 25) आणि स्वप्नील परब (वय 20) अशी मयत दुचाकीस्वारांची नावे आहेत. तर येथून तीन किलोमिटर अंतरावर चार  सातीवली येथे झालेल्या अपघातात एका दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दोन्ही ठिकाणी महामार्गावर व्हाईट टॉपिंग आणि उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. शिवाय याबाबत अनेक तक्रारी करून देखील महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून देखील या गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात नसल्याने  स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

Feb 13, 2025 07:19 (IST)

Jalgaon News: स्त्याच्या कामामुळे दोन एसटी बसचा किरकोळ अपघात

 जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातून चोपड्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामामुळे मात्र दोन एसटी बसचा किरकोळ अपघात झाला आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी मात्र दोन्ही बस रस्त्यावर अडकल्याने चोपड्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दोन्ही बस अडकल्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Feb 13, 2025 07:19 (IST)

Shirdi News: साईंच्या शिर्डी परिक्रमेत भाविकांची अलोट गर्दी

 साई बाबांच्या शिर्डीत महापरिक्रमेचा जागर पाहायला मिळतोय, प्रत्येक वर्षी तेरा फेब्रुवारीला खंडोबा मंदिरातून चौदा किलोमीटरची परिक्रमा सुरु होत असते, यंदा देखिल आज पहाटेपासूनच भाविकांचा मेळा शिर्डीत परिक्रमेत पाहायला मिळालय.. साईंच्या रथाची महाआरती होवून परिक्रमेला प्रस्थान झाले .. लाखभर भाविक या परिक्रमेत पायी निघाले असून मोठ्या भक्तीमय वातावरणात देशविदेशातून आलेले भाविक साईंच्या शिर्डीची परिक्रमा करत आहेत. 

Feb 13, 2025 07:18 (IST)

Washim News: आरोग्य विभागाचा सोनोग्राफी सेंटरवर छापा, लिंग चाचणी करताना 5 महिला आढळल्या

वाशिमच्या कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान केलं जात असल्याच्या माहिती वरून आरोग्य विभागाच्या पथकानं रात्री छापा टाकला असता ५ गर्भावती महिला गर्भलिंग निदान करताना आढळून आल्या. त्यामुळं आरोग्य विभागानं हे सोनोग्राफी मशीन सील केली.तर गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Feb 13, 2025 07:17 (IST)

Gadchiroli News: भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही.. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला. आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन आढावा सभा पार पडली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

Feb 13, 2025 07:16 (IST)

Live Updates: व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाचे दर दुपटीने वाढले

प्रेमाचा गुलाब महागला गेला आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त पंढरपुरात एरव्ही दहा - पंधरा रुपयांना मिळणारी गुलाबाची पेंडी आता तब्बल 40  ते पन्नास रुपयावर जाऊन पोहोचली आहे. तरीही पंढरपूरचा गुलाबांच्या फुलांचा बाजार गच्च भरलेला दिसून येत आहेत.