विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस. अधिवेशनामध्ये बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण परभणी हिंसाचाराचे पडसाद उमटत आहेत. या दोन्ही घटनांवर विरोधक आक्रमक झाले असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर उत्तर देतील. दुसरीकडे संसदेत काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये राडा पाहायला मिळत असून राहुल गांधींविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही घटनांचे आज राज्यभरात पडसाद उमटतील.
Live Update : लाडक्या बहिणीसारख्या योजनांवरून RBIने व्यक्त केली चिंता
लाडक्या बहिणीसारख्या योजनांवरून RBIने व्यक्त केली चिंता
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेती कर्जमाफी, मोफत वीज यांसारख्या सवलतीवरून चिंता व्यक्त केली
योजनांवरील खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेला बाधा येऊ शकते : आरबीआय
मोफत योजनांच्या खर्चामुळे तिजोरीवर ताण येऊ शकतो : आरबीआय
मोफत योजना देण्यावर नियंत्रण ठेवण्यास आरबीआयने आपल्या अहवालात राज्यांना दिला सल्ला
Live Update : दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या - धनंजय मुंडे
दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या - धनंजय मुंडे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य..
ज्याने कोणी हत्या केली त्याला फाशी द्या...
व्यवहाराच्या प्रकरणातून संतोष देशमुखांचा हत्या...
Live Update : बीडमध्ये शिवभोजन केंद्रावर दिव्यांगाला मारहाण
बीडच्या परळीतील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका शिवभोजन केंद्रावर एक दिव्यांग जेवण करण्यासाठी गेला होता. परंतु या शिवभोजन केंद्राचे चालक व त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण तयार नाही असे म्हणत या दिव्यांगाला बाहेर काढले व त्याला मारहाण केली. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला असून आता तो व्हायरल झाल्यानंतर या सर्व प्रकारावर संतापाची लाट उसळी आहे...
Live Update : नागपुरात पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला, जुन्या वादावरून सूड उगवला..
नागपुरात पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला, जुन्या वादावरून सूड उगवला..
सावरकर पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती.
सावरकर फर्निचरचे मालक आणि त्यांचा मुलगा यांच्यावर आरोपी शुभम याने जीवघेणा हल्ला केला.
मृतकांनी काल रात्री आरोपी शुभम याला मारहाण केल्याची माहिती. त्यानंतर आज दुपारी सुद्धा त्याचा मोठा भाऊ बादल याचा मृतकांनी मारहाण करून पाय तोडल्याची घटना घडली अशी माहिती. त्यानंतर आरोपीने मृतकांवर जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती.
Live Update : परभणीत आंदोलकांच्या मृत्यूनंतर कारवाईच्या मागणीसाठी उद्या जालना बंद...
परभणीत आंदोलकांच्या मृत्यूनंतर कारवाई करावी या मागणीसाठी उद्या जालना बंदची हाक देण्यात आली आहे. बहुजन समाजाच्या विविध संघटनाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे.
Live Update : कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणात फरार आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणात फरार आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
शहाड टिटवाळा दरम्यान लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोशल मीडियावर अखिलेश याने व्हिडियो व्हायरल केल्यानंतर पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली होती.
अखिलेश शुक्ला याला शहाड टिटवाळा दरम्यान ताब्यात घेण्यात आलं आहे
जखमी अभिजित देशमुख याचा जबाब आणि डॉक्टरांचा रिपोर्टनुसार कलमे वाढवण्यात येणार आहे
Live Update : आरोपी अखिलेश शुक्ला याला खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले...
आरोपी अखिलेश शुक्ला याला खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले...
Live Update : काँग्रेसच्या आंदोलनानंतर आता ठाकरे गट आंदोलन पुकारणार...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर देशभरात आंदोलनाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे. मुंबईत काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर आता ठाकरे गटाकडूनदेखील मंत्रालयाजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जाणार आहे.
Live Update : वाशी येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने घेतला पेट
नवी मुंबई : वाशी येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने घेतला पेट
वाशी पुलाखालील घटना
घटनेमध्ये दुचाकी जळून खाक
कोणतीही जीविहानी नाही.
Live Update : मीरा भाईंदर महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई, मंदिराचं बांधकाम पाडलं
मीरारोडच्या जय श्री गोपाललाल मंदिराच्या अतिक्रमणावर कारवाई
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई
मंदिरावर कारवाई असल्याने घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त
कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १०० पेक्षा अधिक पोलीस बल तैनात
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू
कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या 8 ते 10 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Live Update : कल्याण हाय प्रोफाईल साेसायटी राडा प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
कल्याणमध्ये हाय प्रोफाईल साेसायटी राडा प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक करण्यात आली आहे. अटकेच्या आधी अखिलेश शुक्ला याने दावा केला होता की, हा वाद परप्रांतीय विरुद्ध मराठी नाही. वर्षभरापासून हा वाद एका चप्पल स्ट’ण्ड्वरुन सुरु होता. शेजाऱ्याचे म्हणणे आहे की, धूप जाळल्यामुळे धुराचा त्रास झाला होता शुक्ला कुटुंबीय मराठी माणसांना सातत्याने त्रास देते. त्यातून हा वाद झाला. नक्की हे भांडण काय आहे. याचा तपास आत्ता खडकपाडा पोलिस करणार आहेत.
Om Prakash Choutala Death: हरियाणाचे मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री, इनेलोचे नेते ओम प्रकाश चौटाला यांचे निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सात वेळा आमदार आणि पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते. ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाने हरियाणाच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.
Nilesh Lanke Protest: कांद्यावरील निर्यात शुल्क काढा.. निलेश लंकेंचे संसदेत आंदोलन
कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढावे या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी संसदेत आंदोलन केले. तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले आहे.
कांदा वरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने 20 टक्क्याने वाढवल्यामुळे कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे कांद्याच्या किमती घसरल्या आणि परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले. कांद्यावरील निर्यात शुल्क हे सरकारने पूर्णपणे काढले पाहिजे यासाठी खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या इतर खासदारांसोबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. गोयल यांना निवेदनाचे पत्र दिले. त्याचप्रमाणे लोकसभेच्या मकरद्वारावर उपोषण करण्यात आले.
CM Devendra Fadnavis: बीड सरपंच हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार: CM फडणवीसांची घोषणा
बीड जिल्ह्यामध्ये एक मोहिम हातात घेऊन सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होईल. आयजी लेव्हल अधिकारी अंतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. तीन ते सहा महिन्यात याप्रकरणाची चौकशी करुन संतोष देशमुख यांच्यासारखा युवा सरपंच त्यांच्या कुटुंबाला 10 लाखाची मदत होईल. तसेच बीडच्या एसपींची बदली करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
Mahayuti Cabinet: महायुतीचे खातेवाटप उद्या जाहीर होणार, दिल्लीत फॉर्म्युला ठरला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महायुती सरकारच्या खाते वाटपाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उद्या खाते वाटप जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. खाते वाटपाचा अंतिम यादी दिल्लीला दिला असून आज मंजूरी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Witer Session Live Updates: विधान भवन परिसरात भाजपचे आंदोलन, मविआकडूनही निषेध
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे संसदेत पडसाद उमटले. काँग्रेसने यावर आक्रमक भूमिका घेत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे काल संसदेत राहुल गांंधी यांच्याकडून धक्काबुक्की झाल्याचाही प्रकार घडला आहे.
या घटनांचे राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही पडसाद उमटत असून भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरु केले आहे. दोन वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणाऱ्या ढोंगी काँग्रेसचा निषेध असो, असे म्हणत भाजप आमदारांनी निदर्शने केली आहेत.
दुसरीकडे विधानभवन परिसरात महाविकास आघाडीनेही आंदोलन सुरु केले आहे. मुंबई कार्यालयाच्या तोडफोडीचा निषेध करत विरोधकांकडून आंदोलन केले जात आहे. काँँग्रेस शिवसेना- ठाकरे गटाचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Latur Farmer Death: कर्जाचा डोंगर अन् 3 लेकरांच्या शिक्षणाचं टेन्शन; हतबल शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
लातूरच्या देवणी तालुक्यातील इस्मालवाडी येथील एका 33 वर्षीय तरुण शेतकऱ्यांने सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन गळफास घेउन गुरुवारी आत्महत्या केली आहे. इस्मालवाडी येथील सोमेश्वर खंडु मुगळे (वय 33) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सोयाबीनचे घटलेले बाजारभाव, गेल्या तीन वर्षापासुनची दुष्काळी स्थीती, सततची नापीकी, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, खर्च अन उत्पन्नाचा न बसत असलेला मेळ, कर्जाचे वाढत चाललेले चक्र यामुळे इस्मालवाडी गावातील तरुण शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
गेल्या अनेक दिवसापासुन ते अस्वस्थ अवस्थेत होते. दोन एकर शेतीत कुंटुबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा अन तीन लेकरांचे शिक्षण त्यांच्या गरजा पुरेशा करण्यात येत असलेल्या अडचणी, कर्जाचा वाढता डोंगर याला कटांळत दोन दिवसापुर्वी ते अचानक निघुन गेल्याने कुंटुबीय व ग्रामस्थांना त्यांचा शोध घेतला.
गुरुवारी भांतब्रा (ता. भालकी, जिल्हा बिदर) येथे त्यांनी गळफास घेउन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पार्थिवाचे भालकी येथील शासकीय रुग्नालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन भालकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी
जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी
संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील सोमपुरी गावातील जागेच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
बिडकीन गावातील कल्याणनगर परिसरात तलवार व कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण..
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल..
बिडकीन पोलिस ठाणे येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
Chhatrapati Sambhajinagar Crime: लाकूड गोदामाला भीषण आग
लाकूड गोदामाला लागली भीषण आग!
मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास लागली आग, आगीमध्ये लाकूड गोदाम जळून भस्मसात,जीवित हानी नाही. शहरातील नारेगाव येथील दानिश पार्क, कौसर पार्क, ममता कॉलनी येथे लागली आग. अग्निशामक विभागाच्या चार बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश. भीषण आगीत लाखोंच साहित्य जळून खाक
Pune News: राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी, पुण्यातील त्या बॅनरची चर्चा
पुण्यात राठोड चा डाग शिंदेंच्या कपाळी अशा प्रकारचे मजकूर लिहून कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती क्रॉसफुली मारून निषेध बॅनर लावण्यात आले आहेत. एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण तर दुसरीकडे एका निष्पाप महिलेच्या हत्येचा आरोप असणारे आमदारास कॅबिनेट मंत्रीपद असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. हे बॅनर कोणी लावले याचं नाव मात्र यावर नाही. महायुती सरकार हाच का तुमचा न्याय? अशा प्रकारचे बॅनर रस्त्याच्या मधोमध पुण्यात लावण्यात आलेले आहेत. या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Rahul Gandhi News: राहुल गांधींचे निलंबन करा... भाजप खासदाराची मागणी
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना निलंंबित करा, अशी मागणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात आली.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अपमान केल्याची नोटीस दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नोटीस पाठवली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा विपर्यास करून ते एक्स प्लॅटफॉर्मवर चालवल्याबद्दल विशेषाधिकाराचा भंग दाखल करण्यात आला आहे.
हा विषय विशेषाधिकार समितीकडे पाठवा, असे अध्यक्षांना सांगितले जोपर्यंत समिती याप्रकरणी निर्णय घेत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांना लोकसभेतून निलंबित करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Suhas Kande Meet Ajit Pawar: शिवसेनेचे आमदार सुहास कांदे अजित पवारांच्या भेटीला
शिवसेना शिंदे गटाचे नेते, नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. एकीकडे छगन भुजबळ यांचे नाराजीनाट्य सुरु असतानाच कांदे अजित पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Rohit Patil Meet DCM Ajit Pawar: राजकीय वर्तुळात मोठी घडामोड, रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते,विधानसभेचे मुख्य प्रतोद तासगावचे आमदार रोहित आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार यांच्या नागपूरमधील निवासस्थानी ही भेट होत आहे.
Nagpur News: आज 25 हजार विदयार्थी सादर करणार मनाचे श्लोक
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज शुक्रवारी, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ चे पठण एकाचवेळी 25 हजार हून अधिक विद्यार्थी करणार आहेत.
हा एक जागतिक विक्रम ठरणार असून त्याची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया’मध्ये नोंद केली जाणार आहे. याशिवाय, ‘वंदेमातरम् ‘ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने यावेळी हे विद्यार्थी ‘वंदेमातरम् गीताचे सामूहिक गायन’ देखील करणार आहेत. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Live Updates: तलाठ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठी संघाच्या वतीने काम बंद आंदोलन
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या चांदसर शिवारात गिरणा नदीत अवैध वाळू प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात तलाठी संघाच्या वतीने काम बंद आंदोलन करून काळ्याफिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच तलाठ्यावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी तलाठी संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
Dharashiv News: गहू-हरभरा पिके जोमात, हाडं गोठवणारी थंडी पिकासाठी ठरतेय लाभदायक
धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या आठ-दहा दिवसापासून थंडीची लाट आहे. यंदाच्या हंगामातील निश्चांकी 10°c पर्यंत येऊन ठेपले आहे, हाडं उठवणारी थंडी असली तरी रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिके ही अत्यंत जोमात आली आहेत. दुसऱ्या थंडीचा धाराशिवरांना सामना करावा लागत आहे. यंदा हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ ही झालेली आहे. थंड वातावरण हे गहू व हरभरा पिकासाठी लाभदायक ठरत आहे.
Dharashiv News: नळदुर्ग नगरपरिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा, मानव अधिकार संरक्षण संघटना आक्रमक
नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे त्यांना तत्काळ निलंबित करून सेवेतून कायमचे बडतर्फ करावे अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आझाद मैदानावर उपोषण केले जाईल असा इशाराही मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक अली यांनी दिला आहे.
Dombivli News: डोंबिवलीत बांगलादेशी नागरिकांचे अटक सत्र
डोंबिवलीत बांग्लादेशी नागरीकांचे अटक सत्र सुरुच आहे. काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन बांग्लादेशींना अटक केली होती. पुन्हा एकदा मानपाडा पोलिसांनी सहा बांग्लादेशींना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये बिसू शेख, रुमान पोकिर, दिलावर हुसेन, आरीफ मुल्ला आणि आरीफ मोफिजून यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे. अटक आरोपींना पुन्हा बांग्लादेशात पाठविण्याची प्रक्रिया मानपाडा पोलिसांनी सुरु केली आहे.