Maharashtra Police Bharati 2025: वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई पदांची भरती सुरु झाली आहे. रत्नागिरीमध्ये 108 पोलीस पदाची भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून भरती प्रक्रियेत प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. (Police Bharati Kagadpatre)
रत्नागिरीत 108 पोलीस शिपाई भरती| Ratnagiri Police bharati Details
रत्नागिरी पोलीस अधीक्षक आस्थापनेवर सन २०२४-२५ या वर्षातील १०८ पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यात १०० पोलीस शिपाई व ८ चालक शिपाई आदी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज बुधवारपासून भरण्यास सुरुवात झाली. भरतीबाबत सविस्तर माहिती या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा व मार्गदर्शन या संकेतस्थळांवर देण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली आहे. तसेच पोलीस शिपाई पदासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होईल. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार एकास दहा प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतही किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य केले आहे.
जळगाव जिल्ह्यामध्येही पोलीस भरती| Jalgaon Police Bharati Details
त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्येही १७१ पदे भरली जाणार आहेत. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १७१ पदे भरण्यासाठी जिल्हा पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे.
पोलीस भरतीसाठीची आवश्यक कागदपत्रे| Police Bharati All Documents List
- ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
- दहावीची मार्कशीट
- बारावीची मार्कशीट
- पदवीधर असल्यास गुणपत्रक
- मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास गुणपत्रक
- पद्वित्तीर्ण पदवी असल्यास गुणपत्रक
- ITI/ डिप्लोमा केला असेल तर मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला TC
- शाळेत शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
- कास्ट सर्टिफिकेट
- वयाचा पुरावा
- रहिवासी प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास EWS प्रमाणपत्र
- महिलांसाठी 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
- अर्जदार खेळाडू असेल तर प्रमाणपत्र
- होमगार्ड प्रमाणपत्र
- वडील पोलीस असतील तर प्रमाणपत्र
- माजी सैनिक असतील तर डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र
- माजी सैनिक असतील तर आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र