Maharashtra Police Bharati 2025: वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या गृह विभागाने अखेर 15 हजार 631 पोलिस शिपायांच्या (Police Constable) मेगा पदभरतीची (Mega Recruitment) प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. उमेदवारांना उद्यापासून, म्हणजेच 29 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज भरता येणार आहेत. या भरतीमुळे राज्यात पोलिसांची रिक्त पदे भरली जाणार असून, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. (Maharashtra Police Recruitment News)
भरतीचे वेळापत्रक आणि अंतिम मुदत
राज्याच्या मंत्रिमंडळाने ऑगस्ट महिन्यात या भरतीला मान्यता दिली होती, मात्र अर्ज प्रक्रिया सुरू झाली नव्हती. आता, 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामध्ये पोलिस शिपाई, चालक शिपाई (Driver Constable), बॅण्डसमन (Bandsman), सशस्त्र पोलिस शिपाई (Armed Police Constable) आणि कारागृह शिपाई (Jail Constable), अशी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या काळात रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत. यातील सोलापूर ग्रामीणसाठी 90, सोलापूर शहर पोलिसांसाठी 96, तर राज्य राखीव पोलिस दल (SRPF) व कारागृह शिपाई यांची सुमारे 55 पदे आहेत.
Hubli Pune Vande Bharat: पुणेकरांसाठी गुडन्यूज! हुबळी–पुणे एक्स्प्रेस आणखी एका स्टेशनवर थांबणार
राज्यातील पोलिसांची रिक्तपदे
पोलिस शिपाई : 12,399
चालक शिपाई : 234
सशस्त्र पोलिस शिपाई :2,393
कारागृह शिपाई : 580
बॅण्डसमन : 25
एकूण : 15,631
'एका पदासाठी एकाच अर्जाची' अट:
उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. एका पदासाठी उमेदवारास एकाच जिल्ह्यात एकमेव अर्ज करता येणार आहे. जर उमेदवाराने एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज केल्यास, ते अर्ज बाद ठरवले जातील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹४५० आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹३५० इतके परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Govt Bank Vacancy 2025 : खुशखबर! 5 महिन्यात सरकारी नोकरी मिळणार..'या' बँकेत 18 हजार पदांसाठी होणार बंपर भरती)
अशी असेल निवड प्रक्रिया
- मैदानी चाचणी (Physical Test): उमेदवारांना मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- लेखी परीक्षा (Written Exam): मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी दहा जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाईल.
- अंतिम निवड: लेखी परीक्षेतील गुणांच्या मेरिटनुसार उमेदवारांची पोलिस पदांसाठी निवड होणार आहे.
'या' संकेतस्थळावर करा ऑनलाइन अर्ज: पोलिस भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन (Online) अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी गृह विभागाने ➡️ policerecruitment2025.mahait.org हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world