SBI PO Vacancy 2025 : भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये एसबीआयमध्ये 3500 पदांसाठी वॅकेन्सी निघणार आहे. एसबीआयचे मुख्य विकास अधिकारी (CDO) यांनी पीटीआयला दिलेल्या मुलखतीत म्हटलंय की,जूनमध्ये बँकेत 505 पीओ पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु आहे. 3000 सर्कल बेस्ट ऑफिसर भरतीसाठी विचार केला जात आहे. ही प्रक्रिया चालू आर्थिक वर्षात पूर्ण झाली पाहिजे.
18 हजार पदांसाठी होणार भरती
येणारा पुढचा नवीन वर्ष रोजगारासाठी चांगला राहणार आहे. कारण एसबीआयचे अध्यक्ष सी.एस शेट्टी यांनी 18 हजार पदांसाठी नोकरीची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलंय की, वेगवेगळ्या कॅटेगरीत 18 हजार व्हेकेन्सी भरती होणार आहे. यामध्ये जवळपास 13500 लिपिक पदासाठी आणि इतर राहिलेले अधिकारी लेव्हल आणि स्थानिक लेव्हल आधारित भरती होणार आहे. एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2.4 लाखांहून अधिक आहे. देशातील कोणत्याही संघटनेत सर्वात जास्त आणि बँकिंग उद्योगात सर्वात जास्त प्रमाण आहे. कामाचं कौशल्य वाढवण्यासाठी एसबीआयमध्ये बंपर भरती येणार आहे. बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी करायची असेल, त्यांनी अभ्यासाठी तयारी लवकर सुरु करा.
नक्की वाचा >> Instagram Video: ट्यूशनला न पाठवताच मुलांना कसं शिकवाल? या 5 गोष्टी रोजच करा, क्लासमध्ये मुलं नेहमीच करतील टॉप
तुम्हीही वापरता SBI क्रेडिट कार्ड?
तुम्ही एसबीआय बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 1 नोव्हेंबरपासून 'अनसिक्योर्ड' कार्ड्सवर 3.75% शुल्क लागू केले जाईल. तसेच, क्रेड (CRED), चे क्यू (CheQ) किंवा मोबीक्विकसारख्या थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे स्कूल किंवा कॉलेजची फी भरल्यास, त्यावर एक टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. परंतु, जर तुम्ही शाळेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा पीओएस (POS) मशीनद्वारे पैसे भरले,तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसच 1000 रुपयांपेक्षा जास्तचा वॉलेट लोड केल्यास 1% शुल्क आणि कार्डद्वारे चेक पेमेंट केल्यास 200 रुपयांचा चार्ज लागेल.
नक्की वाचा >> ट्रेनमध्ये चढली बँकॉकची परदेशी महिला,गर्दीत आला सर्वात घाणेरडा अनुभव, थेट रेल्वेमंत्र्यांना Video टॅग केला अन्
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world