Maharashtra Police: मुंबईला मिळाले नवे DCP, तर जिल्ह्यांचे SP बदलले; वाचा सर्व 21 अधिकाऱ्यांची नावे, नवी पदं

Maharashtra Police Transfer List: राज्य सरकारच्या गृह विभागाने 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Maharashtra Police Transfer List: राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.
मुंबई:

Maharashtra Police Transfer List: महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या गृह विभागाने 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय पोलीस सेवा अर्थात आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आगामी काळातील आव्हाने आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन ही मोठी फेरबदल करण्यात आली असून अनेक जिल्ह्यांना आता नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.

राजकीय आणि प्रशासकीय निकड लक्षात घेऊन गृह विभागाने ही पावले उचलली आहेत. या बदली प्रक्रियेत मुंबईला नवीन पोलीस उपआयुक्त मिळाले असून धुळे, अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण आणि चंद्रपूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या कमान बदलण्यात आली आहे. विशेष म्हणजे सायबर सुरक्षा आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्येही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Congress News: लढण्याआधीच शस्त्र टाकली! 2 महिन्यात तीनदा मानली हार; ठाकरेंच्या चक्रव्यूहात 'हात' कसा अडकला? )

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची पूर्ण यादी

पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार बदली झालेल्या 21 अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

अजय के. बन्सल - पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य
सिंगुरी विशाल आनंद - पोलीस अधीक्षक, धुळे
बाळासाहेब पाटील - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
सोमनाथ घार्गे - सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय
रविंद्रसिंह एस. परदेशी - उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
संदीप घुगे - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
श्रवण दत्त - स्टाफ ऑफिसर, अपर पोलीस महासंचालक - विशेष कृती
मुम्मका सुदर्शन - पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
धोंडोपंत एस. स्वामी - पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
अनुज मिलिंद तारे - पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
अनुराग जैन - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
अश्विनी सानप - पोलीस अधीक्षक, नंदुरबार
तेगबीर सिंह संधु - पोलीस अधीक्षक, जालना
राजकुमार शिंदे - पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे
निकेश खाटमोडे - पोलीस अधीक्षक, वाशिम
आयुष नोपानी - पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
पंकज कुमावत - पोलीस अधीक्षक, परभणी
निकेतन कदम - पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण
सूरज गुंजाळ - अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव
गजानन राजमाने - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
दत्ता लक्ष्मण तोटेवाड - अपर पोलीस अधीक्षक, अमरावती

निवडणूक आयोगाचे निकष आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांची नवीन पदे त्वरित स्वीकारण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत. या बदल्यांमुळे राज्याच्या पोलीस दलात आता नवीन ऊर्जा आणि कामाची नवी पद्धत पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Topics mentioned in this article