2 months ago

शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजता दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मंत्री दादा भुसे स्वतः राज ठाकरेंची हिंदी भाषेवर समजूत घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी आणि स्वतः मंत्री दादा भुसे हिंदी भाषेतल्या सक्तीवर माहिती देणार आहेत. हिंदी भाषेचा शासन निर्णय तसेच राज ठाकरे आपल्या काही तज्ज्ञ मंडळींसोबत बैठकीला बसणार आहेत. यासोबतच दादा भुसे यांच्या भेटीपूर्वी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे. यात मनसेचे शीर्ष नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे राज यांची भेट घेतील.

Jun 26, 2025 19:36 (IST)

अबुझमदच्या जंगलात मोठी चकमक, दोन महिला नक्षलवादी ठार

नारायणपूर - छत्तीसगडच्या अबुझमद भागात नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) नारायणपूर, कोंडागाव आणि एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) यांच्या संयुक्त पथकाने काल रात्रीपासून कोहकामेटा पोलिस स्टेशन परिसरातील घनदाट जंगलात माओवादी कार्यकर्त्यांविरुद्ध मोठी कारवाई केली.

माड डिव्हिजनच्या सक्रिय नक्षलवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला, त्यानंतर नक्षलवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्या.

Jun 26, 2025 19:00 (IST)

Live Update : जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल

जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती शहरात दाखल झाला आहे. बारामतीत पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार तसेच प्रशासनाच्या वतीने या सोहळ्याचं स्वागत करण्यात आले. आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा बारामती मध्ये मुक्काम असेल. उद्या जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार असून तत्पूर्वी काटेवाडी येथे मेंढ्यांच गोल रिंगण पार पडणार आहे.

Jun 26, 2025 17:53 (IST)

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू होणार आहे. सकाळी 11 वाजता परंपरेप्रमाणे विठ्ठलाचा पलंग काढून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ मुलायम लोड देण्यात येईल. यानंतर विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद होतील. आणि पूर्ण 24 तास विठ्ठल हा भक्तांना दर्शन देण्यासाठी अविरत उभा असेल.

Jun 26, 2025 17:52 (IST)

रेणुकादेवी मंदिराची संरक्षक भिंत पडली

देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री रेणुका देवी मंदिराची संरक्षण भिंत आज दिनाक २६ रोजी कोसळली. भाविकांसाठी लिफ्ट स्काय वॉक चे सध्या काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदाराणे मंदिर परिसरातील संरक्षण भिंत व इमारती खालचा भाग पोखरल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.   पुरातत्व विभागा सह मंदिर प्रशासनाने कामाकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. माहूर गड हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे किमान यापुढे तरी मंदिराचे नुकसान होऊ नये अशी भाविकांची अपेक्षा आहे.

Advertisement
Jun 26, 2025 17:10 (IST)

Live Update : मनसेचा हिंदी सक्ती विरोधी मोर्चाची तारीख बदलली

मनसेचा हिंदी सक्ती विरोधी मोर्चाची तारीख बदलली आहे. आता हा मोर्चा पाच जुलैला निघणार आहे. आधी तो सहा तारखेला निघणार होता. त्याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे तारीख बदलण्यात आली आहे.

Jun 26, 2025 16:22 (IST)

Live Update : हिंदी भाषा सक्तीबाबत राज ठाकरेंसोबत चर्चा करणार, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

हिंदी भाषा सक्तीबाबत राज ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. काही समज असतील ते दुर केले जातील.  हिंदी भाषा सक्तीची नाही. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याचं ही शिंदे यांनी सांगितलं. 

 

Advertisement
Jun 26, 2025 15:50 (IST)

Live Update : 'पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणात आमदार हेमंत रासने यांनाही सहआरोपी करा'

भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरे याने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला.. या प्रकाराचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा संपूर्ण प्रकार कसल्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला.. त्याचवेळी हेमंत रासने यांनी प्रमोद कोंढरे याला समज देणे आवश्यक होते. मात्र असे काहीही घडले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे..

Jun 26, 2025 12:14 (IST)

Live Update : मुंबईत होणार पावसाळी अधिवेशन, पुढच्या आठवड्यापासूनच होणार सुरुवात

पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलैला असणार 

मुंबईत होणार पावसाळी अधिवेशन

Advertisement
Jun 26, 2025 12:13 (IST)

Live Update : नीटच्या सराव गुणांवरुन लेकीची हत्या करणाऱ्या बापाला 15 दिवस न्यायालयीन कोठडी

नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून आपल्याच मुलीची हत्या करणाऱ्या बापाला सांगली न्यायालयाकडून 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तालुक्यातल्या नेलकरंजी येथे धोंडीराम भोसले हा शिक्षक बापाने मुलगी साधना हिला नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या रागातून बेदम मारहाण केली होती. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी साधनाच्या आईने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आटपाडी पोलिसांनी धोंडीराम भोसले याला अटक केली होती,24 जून पर्यंत त्याचे पोलीस कोठडी होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर धोंडीराम भोसले याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून धोंडीराम भोसले याची सांगलीच्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून धोंडीराम भोसले यांनी आपली मुलगी साधना हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली होती,या मारहाणी वेळी साधनाकडून पुढच्या वेळी चांगला अभ्यास करेन ,एक संधी द्या, अशी विनवणी देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Jun 26, 2025 11:22 (IST)

Live Update : मराठवाड्यात गेल्या 24 तासात 65 मंडळात अतिवृष्टीची नोंद

मराठवाड्यात गेल्या 24 तासात 65 मंडळात अतिवृष्टीची नोंद 

सर्वाधिक नांदेड जिल्ह्यातील 33 मंडळात अतिवृष्टीची नोंद 

छत्रपती संभाजीनगर, जालना नांदेड , हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 मंडळात अतिवृष्टी

जालना जिल्ह्यातील 3 मंडळात, नांदेड 33, हिंगोली 10 मंडळात अतिवृष्टी

Jun 26, 2025 11:21 (IST)

Live Update : ब्रह्मगिरी पर्वतावर दगड कोसळून 3 भाविक जखमी

पावसाळ्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर भाविक, पर्यटक मोठ्यां संख्येने दाखल होत असतात मात्र मंगळवारी पर्वतावर चढतांना शेजारील डोंगरावरून दगड  पडल्याने तीन भाविक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यात विशाल प्रतापसिंह गिरासे आणि जयश्री विशाल गिरासेया नवविवाहित दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली. जयश्रीच्या हातावर दगड पडल्याने त्यांचा हात फॅक्चर झाला आहे विशाल यांच्या डोक्याला आणि हाताला ईजा पोहोचली आहे तर तिसऱ्या भाविक नेहा डावरी यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.   पर्वतावर यापुर्वी अंगावर दगड पडल्याने एका भाविकाचा जीवही गेला होता. दरम्यान ब्रह्मगिरी यासोबतच इतर पर्यटन स्थळी देखील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात येईल असं जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्पष्ट केल आहे..

Jun 26, 2025 08:54 (IST)

Live Update : पावसामुळे आंब्यांचं मोठं नुकसान, भरपाईसाठी आंबा बागायतदारांचं सरकारला निवेदन

रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्याच्या पाच तारीख पासून नुकसानकारक सुरू झालेल्या पावसामुळे आंबा बागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे बागायतदार हवालदिल झाले असून, सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जिल्हा रत्नागिरी, कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी, पावस परिसर आंबा उत्पादक संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ व करबुडे रवळनाथ संघ तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आंबा नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देण्यात आलं.

Jun 26, 2025 07:57 (IST)

Live Update : आजीला कचऱ्यात फेकल्याप्रकरणी नातवाला अटक

यशोदा गायकवाड हिला कचऱ्याच्या ढिगार्‍यात फेकल्याबद्दल आरे पोलिसांनी तिच्या नातवाला अटक केली आहे

या घटने संदर्भात 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले

सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून झाल्यावरच तिच्या नातवाला अटक करण्यात आली आहे

यामध्ये एक रिक्षाचालक आणि त्याच्या अजून एका सहकार्याला अटक करण्यात आली आहे

Jun 26, 2025 07:57 (IST)

Live Update : राकेश पाटील खून प्रकरणातील आरोपी डी मोहन दासीचा राष्ट्रवादीत प्रवेश

राकेश पाटील खून प्रकरणातील नुकताच जामीनावर सुटलेला प्रमुख आरोपी डी मोहन दासी याला एनसीपी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत काल पक्षात प्रवेश दिला.  राजकीय पक्षात गुंडांचा प्रवेश का असा सवाल विचारला जात आहे.  राकेश पाटील यांची पत्नी पूनम पाटील यांनी जामीनावर सुटलेल्या या प्रमुख आरोपीमुळे आपल्या कुटुंबाला धोका असल्याचे पत्र ही पोलिसांना लिहिले आहे.

Topics mentioned in this article