BJP District President: भाजपमध्ये मोठे बदल! राज्यभरात नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या; पाहा संपूर्ण यादी

यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

Maharashtra Politics: भारतीय जनता पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत.

भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या यादीत नवे चेहरे:

भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नियुक्यांमध्ये महत्त्वाचे बदलही केले आहेत. साताऱ्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष मंत्री जयकुमार गोरे यांच्याऐवजी अतुल भोसले यांना संधी देण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये धीरज घाटे यांचे नाव कायम आहे. तर मावळमध्ये प्रदिम कंद यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.