
Maharashtra Politics: भारतीय जनता पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 13, 2025
सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!#BJP #Maharashtra pic.twitter.com/zrOIyo1ZPr
भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या यादीत नवे चेहरे:
भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नियुक्यांमध्ये महत्त्वाचे बदलही केले आहेत. साताऱ्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष मंत्री जयकुमार गोरे यांच्याऐवजी अतुल भोसले यांना संधी देण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये धीरज घाटे यांचे नाव कायम आहे. तर मावळमध्ये प्रदिम कंद यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world