गुरु दळवी, सिंधुदुर्ग: राज्याचे मत्सउद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका अड्ड्यावर धडक कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेत असलेल्या मटका बुकीच्या घरीच नितेश राणे यांनी ही कारवाई केली. याचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाईचे आदेश देवूनही पोलीस विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आला होता. शेवटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका बुकी असलेला मटका किंग महादेव रमाकांत घेवारी याच्या कणकवली बाजारपेठेतील गोडावूनमध्ये मटका कलेक्शन सुरु असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वत: गुरुवारी दुपारी 4 वाजता धाड टाकली.
Kalyan News : कल्याण काँग्रेसमध्ये ‘डायनासोर'ची एन्ट्री! मत चोरीच्या चर्चेतच 'पक्ष चोरी'चा आरोप
या धाडीनंतर कणकवली पोलीस निरिक्षक अतुल जाधव यांना कळवण्यात आले. या कारवाईत संशयित आरोपी महादेव घेवारी सह 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या मटका जुगाराचे 2 लाख 73 हजार 725रोख रक्कमेसह लॅपटॉप व मटका जुगाराच्या पावत्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीसांचे लक्तरे वेशीवर निघाली आहेत.
थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी नितेश राणे यांनी त्या बुक्की वाल्याना धारेवर धरले असता आम्ही तुमचीच माणसं आहोत हे शेवट च परत अस करणार नाही असे सांगताच मंत्री नितेश राणे आक्रमक होत मी जर आज आलो नसतो तर तू हे शेवट करणार होतास का? असे सांगितले अखेर सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.