जाहिरात

Sangli ZP Elections: 'काटे फिरले, थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये...', बड्या नेत्याचा मोठा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

Sangli ZP Elections: 'काटे फिरले, थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये...', बड्या नेत्याचा मोठा दावा

शरद सातपुते, सांगली:

Sadabhau Khot On Jayant Patil Join BJP:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेषत: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा, भाजप नेत्याने केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा भाजप नेते, आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

Ajit Pawar Death : अजित दादांच्या खुर्चीला घट्ट मिठी मारली; पार्थ पवारांना अश्रू अनावर, Video

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत? 

"आता काटा उलटा फिरायला लागलाय,लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत,थोडया दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले आहे. भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही,ते बघावे, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही, कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे,असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. 

दरम्यान, या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वाचे विधान केले. मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे, असं ते म्हणाले.  सांगलीची माणसं फक्त चांगली नाहीत तर देव माणस आहेत आणि चांगल्या माणसांसाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं, असा शब्दही त्यांनी सांगलीकरांना दिला.

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठं गिफ्ट! 4 नव्या लोकल फेऱ्या सुरू, कसं असेल वेळापत्रक?

दरम्यान, वाळवा ग्रामपंचायतचे नगरपंचायत करण्याबाबत प्रस्तावावर आचारसंहिता संपल्यावर नक्कीच विचार केला जाईल असा आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी वाळवेकरांना दिले, या सभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत,वाळव्याचे माजी सरपंच गौरव नायकवडी यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com