जाहिरात

Sangli Politics: एकट्या गोपीचंद पडळकरांविरोधात 5 पक्ष एकत्र, झेडपी निवडणुकीत राजकारण तापणार

स्वतंत्र लढल्यामुळे सत्तेचे गणित जुळले नव्हतं, आता सत्तेसाठी भाजप विरोधी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सर्वपक्ष एकत्र आले आहेत.

Sangli Politics: एकट्या गोपीचंद पडळकरांविरोधात 5 पक्ष एकत्र, झेडपी निवडणुकीत राजकारण तापणार

 शरद सातपुते, सांगली:

Sangli Politics:  काहीच दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठे यश मिळवले. या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडकळर यांनी एक हाती सत्ता मिळवली. यावेळी जतमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र लढले तर ठाकरे गट अजित पवार गट हे स्वतंत्र लढले, यामुळे सत्तेपासून दूर राहावे लागले होते, मात्र आगामी जिल्हा परिषद - पंचायत निवडणुकीत त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

गोपीचंद पडळकरांविरोधात विरोधकांची एकजूट..

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपविरोधी मूठ बांधून आजी-माजी आमदार एकत्र येत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष, तसेच शिवसेना ठाकरे गटाने येत गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गट स्थापन केला आहे. जतचे माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी या आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. या युतीच्या जागावाटपसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज जत येथे भाजपविरोधी आघाडीची बैठक पार पडली आहे यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

BMC Election 2026: मुंबईत ठाकरेंचा महापौर होऊ शकतो? शिंदेंच्या एका निर्णयामुळे सुरू झालीय चर्चा

यावेळी माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी या आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा या बैठकीत केला.  गुंडशाही धनशक्तीचे विरोधात जनशक्ती उभारणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. या निवडणुकीत 9 जिल्हापरिषद आणि 18 पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. होऊन गेलेल्या नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या चुकांमुळे आपला पराभव झाला आहे. स्वतंत्र लढल्यामुळे सत्तेचे गणित जुळले नव्हतं, आता सत्तेसाठी भाजप विरोधी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सर्वपक्ष एकत्र आले आहेत.

झेडपीचे राजकारण रंगणार..

 महत्त्वाचं म्हणजे जतचे दोन्ही माजी आमदार जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहेत.  जत तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद पंचायत समितीचे 18 गण असून या आघाडीमुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समोर मोठा आव्हान निर्माण झालं आहे. आता या आघाडीला किती यश मिळेल? गोपीचंद पडळकर यांच्यासमोर किती मोठं आव्हान असेल? हे येणारा काळच ठरवेल. 

PMC Result 2026: पुणेकरांचा धक्का! फायरब्रँड नेत्यांचा बँड वाजला; तात्या, भाऊ, ताई पडले... 5 हादरवणारे निकाल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com