मनोज सातवी, पालघर:
Western Railway: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची अन् आनंदाची बातमी समोर आली आहे. १ फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर ४ नव्या लोकल सुरु करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. या लोकल 12 डब्यांच्या असून यामुळे दहिसर, बोरिवली, वांद्रे या मार्गांवरील प्रवाशांचा रेल्वे प्रवास आरामदायी होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर चार नव्या लोकल सुरु..
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने रविवार, १ फेब्रुवारीपासून १२ डब्यांच्या चार नव्या नॉन-एसी लोकल सेवा सुरू केल्या आहेत. यामुळे मुंबई उपनगरीय विभागातील एकूण लोकल सेवांची संख्या आता १,४०६ वरून १,४१० इतकी झाली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसारकांदिवली-बोरिवली सहावी रेल्वेलाईन पूर्ण झाल्याने ही वाढ शक्य झाली आहे.
Sindhudurg Elections: 'निधी फक्त भाजप- शिवसेनेला देणार', नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य
कसं असेल वेळापत्रक..?
या सेवांपैकी दोन अप-मार्गावर आणि दोन डाऊन-मार्गावर असून सर्व लोकल स्लो मार्गावर आहेत. अप-मार्गावर भाईंदरहून एक लोकल ११.३९ वाजता वांद्रेसाठी, तर दुसरी लोकल १२.१४ वाजता चर्चगेटसाठी. त्याचप्रमाणे डाऊन-मार्गावर वांद्रेहून भाईंदरकडे जाणाऱ्या ४.३० वाजता आणि १.२१ वाजता अशा दोन अतिरिक्त लोकल सेवा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, सध्या पश्चिम रेल्वेवर एकूण 1406 लोकल ट्रेन आहेत. आता यांची संख्या वाढून 1410 इतकी होणार आहे. डिसेंबर 2025 पासून पश्चिम रेल्वेवर महिनाभर ब्लॉक सुरू होता. या ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मात्र आता नव्या चार लोकल सुरु झाल्याने प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.
काल बदलापूरमध्ये तरुणीचा मृत्यू, दुसऱ्याच दिवशी दिवा स्थानकात घडलं..'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world