Maharashtra Politics: महापालिका निवडणुका महायुती स्वतंत्र लढणार? सर्वात मोठी अपडेट समोर

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (महायुती) एकत्र लढणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणीही राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने आत्तापासूनच व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. अशातच आता या आगामी निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

Chandrapur News: 1 गाव 2 ग्रामपंचायती, 2 शाळा, 2 निवडणूका, महाराष्ट्रात येण्याचा 'त्यांचा' मार्ग मोकळा होणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रित लढणार का? याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (महायुती) एकत्र लढणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुंबई महापालिका वगळता महापालिका एकत्र लढणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुका महायुती एकत्रितपणे लढेल मात्र पुणे आणि ठाणे पालिका निवडणुकांना वेगवेगळे सामोरे जातील, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुती एकमेकांविरोधात रणनिती आखणार असल्याचे दिसत आहे. 

Solapur NCP Politics: अजित पवारांचं टेन्शन वाढलं; सोलापुरात पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर

दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ॲाक्टोबर - नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यामध्ये जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महापालिका अशा तीन टप्प्यात निवडणूका होणार आहेत. तर महापालिका निवडणूका सर्वात शेवटी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article