जाहिरात

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! महिला आमदार भाजपच्या वाटेवर, उद्या राजीनामा देणार?

काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव राजीनामा या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! महिला आमदार भाजपच्या वाटेवर, उद्या राजीनामा देणार?

Congress MLA Pradnya Satav: राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे निवडणुकांचा रणसंग्राम सुरु असतानाच काँग्रेसला सर्वात मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव राजीनामा या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर?

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.  काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षा प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून पाठबळ मिळत नसल्याची मागील काही दिवसांपासून चर्चा होती.

Akola News: अकोला महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी; बंडखोरांची नवी आघाडी पक्षासाठी ठरणार डोकेदुखी

हिंगोलीत काँग्रेसला धक्का

त्याचबरोबर आमदार प्रज्ञा सातव्या काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय दिसत नसल्याने चर्चांना उधाण आलं होते, मात्र आज आमदार प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. 

(नक्की वाचा-  Crime News: अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com