राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरु असतानाच आता उद्धव ठाकरेही दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा होणार आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
LIVE Update: पुणे खंडपीठाची गरज, सुप्रिया सुळेंचे CM फडणवीस यांना पत्र
जिल्ह्याच्या इंदापूरसारख्या तालुक्यातील दूर अंतरावरील गावाचा विचार केला तर मुंबईपासून ते अंतर तब्बल तीनशे ते साडेतीनशे किलोमिटर अंतरावर आहे. याचा विचार करता कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यावश्यक आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
LIVE Updates: महादेवी हत्ती प्रकरणी बैठकीला सुरुवात.
महादेवी हत्ती प्रकरणी बैठकीला सुरुवात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात.
नांदणी मठाचे महंत त्यासोबतच कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर
तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठकीला सुरुवात
Crime News: डिजिटल अटक झाल्याची भीती दाखवत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा ऑनलाइन गंडा
- डिजिटल अटक झाल्याची भीती दाखवत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा ऑनलाइन गंडा
- शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ऑनलाइन गंडा
- तुमच्या नावाने बनावट खाते खोलून त्यात दहशतवाद साठी फंडिंग सुरू असल्याचे सांगत दाखवली भीती
- विडिओ कॉल करून तुम्हला डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याची दाखवली भीती
- फसवणूक झालेल्या मध्ये एका महिलेचा देखील समावेश
- एका प्रकरणात 50 लाख,दुसऱ्या प्रकरणात 36 लाख तिसऱ्या प्रकरणात 33 लाख तर चौथ्या प्रकरणात 9 लाख रुपयांना घातला गंडा
- नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अधिक तपास सुरू
LIVE Updates: पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी
पवित्र श्रावण महिन्यातील आजच्या पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विठ्ठलाच्या दर्शना रांगेत आज पन्नास हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी उभे आहेत. त्यामुळे एकादशीच्या निमित्ताने मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शन रांगेत गर्दी जरी झाली असली तरी दर्शन व्यवस्था मात्र पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कुठल्याही प्रकारची ठोस व्यवस्था एकादशीच्या निमित्ताने दर्शन रांगेत करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोपाळपूर रोडवरील फुटपाथवर दर्शन रांग जाऊन पोहोचलेली दिसून येते. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान आठ ते दहा तासांचा कालावधी पंढरपुरात लागत आहे.
LIVE Updates: चंद्रपुरात भीषण अपघात : एक ठार तीन गंभीर जखमी
चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी शहरात आज भीषण अपघाताची घटना पुढे आली आहे. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहे. अजय मंडल असे मृतकाचे नाव आहे. केदार मंडल, मनोजकुमार मंडल, साईनाथ कोहपरे हे तिघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात गोंडपिपरी शहरातील घडला. मार्गांवर उभे असलेल्या चौघाना भरधाव येणाऱ्या ट्रक धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. जखमीना उपचरासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
LIVE Updates: परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
शरद पवारांची साथ सोडत राहुल मोटे अजितदादांचे घड्याळ हाती घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणार पक्षप्रवेश सोहळा
पक्षप्रवेशासाठी शेकडो वाहनांच्या ताब्यात कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
राहुल मोटे यांनी आतापर्यंत पाच वेळा लढवली विधानसभेची निवडणूक तर तीन वेळा राहिलेत आमदार
राहुल मोटे यांच्या प्रवेशाने धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार
LIVE Updates: पुण्यात गाव गुंडांचा पुन्हा राडा, कोयता गँगचा धुडगूस
पुण्यात गाव गुंडांचा पुन्हा राडा
पुण्यातील हडपसर परिसरात कोयता गँगचा धुडगूस
हडपसर मधील साडेसतरा नळी येथे टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
वाहनांसह अनेक दुकानात जात आरोपींनी केली तोडफोड
हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवण्यासाठी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड
घटनेचा CCTV व्हायरल
हडपसर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
LIVE Updates: काँग्रेस पक्षात लवकरच इन्कमिंग सुरु होणार
काँग्रेस पक्षात लवकरच इन्कमिंग सुरु होणार आहे
काँग्रेस पक्षाला सर्व वरिष्ठ नेते सोडचिट्ठी देत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षात इन्कमिंगचे दिवस आले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते येत्या काही दिवसात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत
भाजप कडून सांगण्यात आलं होत की मराठवाडा आणि विदर्भात काँग्रेस रिकामं केलं जाईल
LIVE Blog: एकाच दिवशी 10 हजार वृक्षांची भव्य आणि नियोजनबद्ध लागवड
धुळे शहराच्या पर्यावरणीय इतिहासात प्रथमच म्हाडा नाशिक मंडळ आणि धुळे जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून 'म्हाडा वन महोत्सव 2025' अंतर्गत देवपूर येथील सर्वे नं. 46 या विस्तीर्ण परिसरात एकाच दिवशी 10 हजार वृक्षांची भव्य आणि नियोजनबद्ध लागवड करण्यात आली. मात्र ही लागवड केवळ औपचारिकतेपुरती न थांबता, त्यांचे संगोपन पुढील दोन वर्षे म्हाडाकडूनच केले जाणार असल्याची अधिकृत ग्वाही यावेळी देण्यात आली, हे या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले... या कार्यक्रमाचे नियोजन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले तर उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते पार पडले
LIVE Updates: शहादा-शिरपूर मार्गावरील चोरीचा नंदुरबार पोलिसांनी लावला छडा
शहाद्याहून शिरपुरकडे जात असतांना 18 तोळे लंपास झालेल्या प्रकरणाचा नंदुरबार पोलीसांनी छडा लावला असून यातील आरोपीकडून 17 तोळे सोन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे मुंबई येथील एक इसम सोन विक्रीसाठी कालीपीली जीपने शहाद्याहून शिरपूरकडे जात असतांना एप्रिल महीन्यात त्याच्या पिशवीतील जवळपास 18 तोळे सोन लंपास झाले होते. याप्रकरणी सारंगखेडा पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी धडगाव येथील रहिवाशी असलेल्या मगन चिमा वसावे या 24 वर्षीय आरोपीला अटक करुन त्याच्याकडून जवळपास 17 लाख किमतीचे 17 तोळे सोन हस्तगत केले आहे.
LIVE Updates: ५०० रुपयांची लाच घेतांना पोलिस अटकेत
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई होऊ नये यासाठी ५०० रुपयांची लाच घेतांना मोलगी पोलिस ठाण्याचे कर्मचारी मिलाप शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. मोलगी पोलिस ठाण्याअंतर्गत जामली येथील जामली ते मोलगी अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाकडून त्याच्या वाहनावर कारवाई करू नये यासाठी शिंदे याने हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५०० रुपयांची लाच घेताना शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईमुळे मोलगी पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
LIVE Updates: तुकाराम बाबा महाराजांकडून अन्न त्याग करत पाचव्या दिवशीही उपोषण सुरू
सांगली मध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे.तुकाराम बाबा महाराजांकडून अन्न त्याग करत पाचव्या दिवशीही उपोषण सुरू आहे.मानधनावर कामावर घ्याव, यासह विविध मागण्यांसाठी तुकाराम महाराज यांनी गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.या पाचव्या दिवशी तुकाराम महाराज यांची प्रकृती बिघडली असून साखरेची पातळी ढासळली आहे.या मुळे शरीरातील त्राण निगुण गेला आहे.इतरांचा आधार घेत उठ बस करावी लागत आहे.गेल्या पाच दिवसापासून हे आंदोलक रस्त्यावरच झोपत असल्याचे चित्र आहे.
LIVE Updates: माधुरी हत्ती परत येणारचं- प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
माधुरी उर्फ महादेवी हत्तीच्या बाबतीत जनभावनात तीव्र आहेत,आणि महादेवांनी परत येणारचं,असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.तसेचं माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ,त्याचा खर्चही कार्यकर्ते करतील,त्याच बरोबर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माधुरी हत्तीनीच्या बाबतीत बैठक देखील होणार आहे,असं
देखील मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलय, ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने आयोजित युवा संवाद मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
Pune News: दौंड तालुक्यातील यवत मधील जमाबंदी शिथिल..
दौंड तालुक्यातील यवत मधील जमाबंदी शिथिल करण्यात आलेली आहे.सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू नसेल 11 नंतर मात्र पुन्हा एकदा जमावबंदी यवत गावांमध्ये असेल. पुणे जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.पुढील आदेश येईपर्यंत सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे.1 ऑगस्ट रोजी यवत गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी जमाबंदीचे आदेश काढले होते.
LIVE Updates: उबाठाच्या वतीने १३ ऑगस्टला महामार्गावर चक्का जाम आंदोलन
सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी गेल्या गणेश चतुर्थीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे सांगितले होते. पण रस्ता पूर्ण होणे सोडाच अस्तित्वात असलेल्या मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अकरा वर्षातच रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने येत्या १३ ऑगस्टला हुमरमळा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
LIVE Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावर
गाठीभेटी दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे
मराठा समाज आणि लोकप्रतिनिधींशी करणार चर्चा
मुंबईतील आंदोलनाच्या तयारीचा घेणार आढावा
रात्री धाराशिव मध्येच मुक्कामी तर उद्या सकाळी सोलापूरकडे रवाना होणार
LIVE Update: अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही शिवारात अपघातात बिबट्याच्या मृत्यू....
अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही येथील संजय वळवी यांच्या गुरांच्या झोपडी शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावरून झोपडीवर उडी घेतली असता खाली पडल्याने बिबट्या मृत झाल्याची घटना घडली आहे. मात्र आंब्याच्या झाडावरून पडल्याने बिबट्याच्या मृत्यू न होता बिबट्याला शॉक लागून बिबट्याच्या मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे, वनविभागाला माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदन नंतर या मृत बिबट्याची नियमाप्रमाणे लाकडांमध्ये पेटवून विल्हेवाट लावण्यात आली आहे.
LIVE Update: बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणारी वृद्ध महिला जागीच ठार
जळगाव जिल्ह्यातील देवगाव शिवारात शेतात काम करत असलेल्या 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला असून या हल्ल्यात इंदुबाई वसंत पाटील ही वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी वृद्ध महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेला मृत घोषित केले.
LIVE Update: शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमानिया यांच्याविरुद्ध न्यायालया उपस्थित राहण्याचे वॉरंट जारी
माजी महसूल मंत्री तथा तात्कालिक भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याविरोधात सन २०१६ मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर न्यायालयाने हजर राहण्याचे वॉरंट जारी केले आहे.
LIVE Updates: अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत गप्प बसायचं नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत आपण गप्प बसायचं नाही,असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे, जी युती मध्ये असून देखील छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही,असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने आयोजित युवा संवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते