1 hour ago

 मुंबई, पुण्यासह राज्यभर कोसळत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. 

Aug 23, 2025 11:33 (IST)

Live Update : बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

शासकीय सेवेत असणाऱ्या  राज्यातील 1183 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या 145 शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आढळून आला आहे. आणि याच महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अमलात आणली. 

राज्यातील लाखो महिलांना याचा मोठा फायदा झाल्याच देखील समोर आले.. आर्थिक निकषावर आणि अटीवर महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.. परंतु शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी देखील प्रशासनाची दिशाभूल करत या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल आहे. याबाबतचे पत्र बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून त्यानुसार संबंधित महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सिओंनी दिली आहे.

Aug 23, 2025 11:31 (IST)

Live Update : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा शहरात पाहणी दौरा

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा शहरात पाहणी दौरा 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार शहरातल्या मुख्य गणेश मंडळांची करणार पाहणी 

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती पासून अमितेश कुमार करणार मंडळांची पाहणी 

मंडळाने भेट देत मंडप, शहरातील वाहतूक आणि शहरातील पोलीस बंदोबस्ताची अमितेश कुमार घेणार आढावा

पोलीस आयुक्त सोबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाहणी साठी दाखल

Aug 23, 2025 11:30 (IST)

Live Update : नागपुरातील प्रसिद्ध मारबत मिरवणुकीला सुरुवात...

नागपुरातील प्रसिद्ध मारबत मिरवणुकीला सुरुवात...

Aug 23, 2025 10:24 (IST)

Live Update : शनी अमावस्येनिमित्त शनिदर्शनासाठी भाविकांची श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात मोठी गर्दी

अहिल्यानगर जिल्ह्यासह देश-विदेशामध्ये प्रसिद्ध असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर या ठिकाणी आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि तोही शनी अमावस्या आल्याने या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून शनी अमावस्या निमित्त शनिदर्शनासाठी भाविकांनी शनि मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे... अमावस्या निमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलं होतं... होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता सर्व शनी भक्तांना शनीदेवाचे दर्शन घेता यावे यासाठी शनी चौथऱ्यावरील बंद ठेवण्यात आले आहे... येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व सोयी करण्यात आल्या आहेत... पाच ते सात लाख भाविक येण्याचा अंदाज विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी बोलून दाखवला आहे...

Advertisement
Aug 23, 2025 09:58 (IST)

Live Update :अमित ठाकरे पोहोचले आशिष शेलारांच्या भेटीला, वांद्रेतील कार्यालयात दोघांची चर्चा

अमित ठाकरे पोहोचले आशिष शेलारांच्या घरी, वांद्रेतील कार्यालयात दोघांची चर्चा

गणेशोत्सवातील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Aug 23, 2025 09:06 (IST)

Live Update : जिल्हा परिषद सेवेत असलेल्या 199 महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या 199 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी या सर्व महिलांना अपात्र ठरवून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी दिला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisement
Aug 23, 2025 09:05 (IST)

Live Update : पंढरपुरात पुराचा धोका टळला, पुराचे पाणी ओसरायला झाली सुरुवात...

पंढरपूर मध्ये सलग दोन दिवस पाणी पातळीत मोठी वाढ झाली. त्यानंतर आता आज तिसऱ्या दिवसानंतर पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. 24 तासात तब्बल 40 हजार क्युसेक पाणी कमी झाले आहे. त्यामुळे आता पुराचा धोका पूर्णपणे तळलेला दिसून येतो. 

Aug 23, 2025 08:54 (IST)

Live Update : दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या

बीडच्या आहेर धानोरा गावातील महिलांनी दारू विक्रीविरोधात आक्रोश करत थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर ठिय्या दिला आहे. दारूमुळे गावातील सामाजिक वातावरण ढासळत असून महिला व तरुणींना त्रास सहन करावा लागत असल्याचा महिलांचा आरोप आहे. याआधी जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन मागणी केली होती, मात्र दारूबंदीवर काहीच हालचाल न झाल्याने महिलांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टीमेटम देत, दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, 15 ऑगस्टला पालकमंत्री अजित पवारांकडेही महिलांनी थेट दारूबंदीची मागणी केली होती.

Advertisement
Aug 23, 2025 08:24 (IST)

Live Update : पोळ्याच्या सणाला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू गंगापूर तालुक्यातील घटना

 छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन रोडवर असणाऱ्या धरणात ऐन पोळ्याच्या सरांच्या दिवशी पोहण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की लासुर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेतील शिकणारे काही विद्यार्थी हे काल होण्यासाठी गेले होते त्यात 13 वर्षाचा कार्तिक संकोड हा देखील पुण्यासाठी मित्रासोबत गेला होता. मात्र पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी कार्तिक बुडत असल्याचे दिसतात सोबतच्या मित्रांनी त्या ठिकाणावरून धूम ठोकली. त्यावेळी तेथे जनावरे चारत असणाऱ्या एका गोराख्याला पळणाऱ्या मित्रांनी सांगितले व त्याचा मोबाईल वरून कार्तिकच्या कुटुंबियांना कळवले त्यामुळे कार्तिकच्या कुटुंबियांनी तात्काळ घटनांसाठी दाखल होत हंबरडा फोडला.  यानंतर शिल्लेगाव पोलीस हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि धरणात शोधमोहीम केली दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर कार्तिकचा मृतदेह अग्निशामक दलाला आढळून आला. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Aug 23, 2025 08:08 (IST)

Live Update : जतमध्ये वर्गणीच्या नावाखाली होणाऱ्या त्रासाला कंटाळून व्यापार बंद ठेवत व्यापाऱ्यांनी काढला मोर्चा..

सांगलीच्या जत मध्ये वर्गणीला कंटाळलेल्या व्यापाऱ्यांनी थेट दुकान बंद ठेवत मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जत शहरामधील व्यापाऱ्यांना वर्गणीच्या नावाखाली दमदाटी करून वर्गणी वसुली करण्यात येत असल्याचा आरोप करत जत शहरातल्या व्यापाऱ्यांनी आंदोलन केले आहे.यावेळी शहरातील व्यापार बंद ठेवत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत, पोलीस प्रशासनाने तातडीने सुरू असलेल्या वर्गणीच्या नावाखालील व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा अन्यथा व्यापाऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.

Aug 23, 2025 07:57 (IST)

Live Update : कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने

गणेशोत्सवाच्या जादा रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे कोलमडलं वेळापत्रक

कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिरा, तुतारी एक्स्प्रेस एक तास 30 मिनिटे, राजधानी एक्सप्रेस 4 तास उशिरा, पनवेल सावंतवाडी तब्बल साडेतीन तास उशिरा, CSTM  गणपती स्पेशल दोन तास, LTT सावंतवाडी गणपती स्पेशल दोन तास  उशिराने

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 325 हून अधिक फेऱ्या

Aug 23, 2025 07:33 (IST)

Live Update : पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीला वेग आला, अखेर प्रारुप प्रभाग रचना जाहीर

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रक्रियेला अखेर वेग आलाय. महापालिकेने आज शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर केली. चार सदस्यांचा एक प्रभाग असल्यानं एकूण 128 जागांसाठी ही प्रारुप प्रभाग रचना आहे. यावर 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. सुनावणी पार पडल्यावर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील. तिथून पुढं 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे ही प्रभाग रचना सादर होईल. मग राज्य निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देतील. त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोंबरच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेच्या आधारावर महापालिका निवडणूक पार पडणार आहे.