
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीनंतर नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून निवडणुकांच्या दृष्टीने बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती सोपवल्यावर नवाब मलिक अॅक्शन मोडवर आले असून व्यवस्थापन समितीची पहिलीच बैठक आज सायंकाळी एमआयजी क्लब बांद्रा येथे पार पडली. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईची जबाबदारी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर मंगळवारी सोपवली.
Rahul Gandhi : 'राहुल गांधींच्या जीवाला धोका', 24 तासांमध्ये ट्विस्ट, याचिका मागे! कारण काय?
ही निवड होऊन एक दिवस संपताच मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक अॅक्शन मोडवर येत पहिलीच बैठक घेतली. या बैठकीला नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक - शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित होते.
त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, निमंत्रित सदस्य दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव, मुंबई सरचिटणीस राजू घुगे आदी उपस्थित होते.
( नक्की वाचा : Rahul Gandhi : 'माझ्या जीवाला गंभीर धोका', राहुल गांधी यांचा पुणे कोर्टात खळबळजनक दावा )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world