Dharashiv Omraje Nimbalkar News: धाराशिवचे ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. पवनराजे हत्याकांडातील निर्दोष मुक्ततेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय निर्णयावरुन घुमजाव केलं. शिंदे गटात प्रवेशाची शक्यता असतानाही त्यांनी मतदारसंघात चर्चा करण्याची भूमिका घेतली. यामुळे त्यांच्यासोबत फूटून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या 5 खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे.
ऑपरेशन टायगरचं काय होणार? आज फैसला
याच पार्श्वभूमीवर आज धाराशिवमध्ये होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे. गोवर्धनवाडीमध्ये होणाऱ्या बैठकीत प्रमुख पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मतांचा आढावा घेतल्यानंतर ओमराजे आजच आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी दुपारी चार वाजता जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या सूचना आणि मतांचा आढावा घेतल्यानंतर ओमराजे निंबाळकर आजच आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप प कुठला निर्णय झाला नाही दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी कालच स्पष्ट केले होते. यामुळे सहा खासदारांचा गट न झाल्यास इतर खासदारांची खासदारकी धोक्यात येणार का ?आणि ऑपरेशन टायगर होणार का? असे चर्चा देखील झाल्या. त्यामुळे गोवर्धनवाडी येथे होणाऱ्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून बैठकीनंतर नेमकी काय भूमिका जाहीर होते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
ठाकरेंच्या नेत्यांनी घेतली भेट
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी आज खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, "आम्ही केवळ कोर्टातील प्रकरणाच्या निकालासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो," असा दावा केला. राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच या भेटीमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, मात्र संबंधित नेत्यांनी कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचे नाकारले आहे.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world