Uddhav Thackeray Vidarbha Tour Live Updates: ऑपरेशन टायगरच्या धक्क्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आजपासून उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा सुरु होत असून विदर्भामध्ये ते बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.
आज सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यवतमाळ येथे कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय़ देशमुख यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचा पहिलाच दौऱ्यावर असणार आहेत. संजय देशमुख यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यवतमाळच्या सभेनंतर उद्धव ठाकरे वाशिम येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळावा घेणार आहेत.
Uddhav Thackeray Sabha LIVE: "पक्ष चोरला चिन्ह चोरला, पण ठाकरे उभा आहे: उद्धव ठाकरेंचा एल्गार
"आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असतील तर आईला काय वाटत असेल. याने आधीच आपल्याशी गद्दारी केली होती तरी पण ते पुन्हा आले. माझी काळजी करू नकोस, पक्ष चोरला चिन्ह चोरला...पण ठाकरे उभा आहे. मोदींची लाट असताना यांच्या छाताडावर बसून मवीआ चे 31 खासदार निवडून आले" उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: यवमाळमध्ये उद्धव ठाकरेंची सभा, संजय देशमुखांवर निशाणा
"पावसाळ्याची सुरुवात होतेय...आपण ग्रामीण भागातील सर्व शेतकरी आहेत...तुमचे धन्यवाद तुम्ही शेती टाकून आलाय. कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे, पावसाळ्यात झाडाला नवे कोंब येतात. माझ्या सांगण्यावरून तुम्हाला मी जे बुजगावणे दिलं होतं...तुम्ही त्याला निवडून दिलं त्याबद्दल क्षमा मागतो. तुम्ही केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझ्या शब्दावर निवडून दिलं, त्याने गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळे फासले.
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: काही लोक सरड्याच्या अवलादी: अरविंद सावंत यांचे टिकास्त्र
"२७ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन आहे, तुम्ही या दिवशी यवतमाळमध्ये आलात. इथे संजय राऊत आलेत ज्यांनी जेल भोगली, काही लोक सरड्याच्या अवलादी निघालीत. तुम्ही रंग बदलत रहा पण भगवा फडकणार, माणसे खोटी किती बोलू शकतात तुम्ही आईशी प्रतारणा केली आहे.
शिवसेना आपली आई आहे ना, देशमुख म्हणाले होते साहेब घाबरू नका कुठे जाणार नाही. आजच्या काळात दिल्लीला आव्हान देणारे असतील तर ते उद्धवजी ठाकरे आहेत" अरविंद सावंत
Uddhav Thackeray Sabha LIVE: नेते गेले, खरा शिवसैनिक माझ्यासोबत: उद्धव ठाकरे
शिवसैनिक माझा सोबत आहेत, या सगळ्यांची वागणूक आपण पाहता आहात. मला आता लाज वाटत आहे की हे सगळे आपल्या सोबत राहिले कसे? मला आठवता आहे की बैल पोळ्यादरम्यान बैलावर सुद्धा लिहिले होते, निधी बाबत सगळ्याना माहिती आहे. माझा शब्दावर हे खासदार निवडून आले होते. आता दौरा करून फायदा नाही म्हणत आहेत तेव माझ्या दौऱ्यामुळे निवडून आले होते . शेतकऱ्याला हमीभाव नाही पण या खासदाराना उपट सुंभ याना हमीभाव आहे: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: यवतमाळ वाशिम मतदार संघातील विविध कामांसाठी नऊ कोटी चाळीस लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर
एकीकडे उद्धव ठाकरे यांचा फुटलेले खासदार संजय देशमुख यांच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात दौरा
तर दुसरीकडे यवतमाळ वाशिम मतदार संघातील विविध कामांसाठी नऊ कोटी चाळीस लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर
फुटलेल्या खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासामध्ये निधी मिळत नसल्यास कारण समोर देत ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला
शिंदे शिवसेनेत प्रवेश करताच आठवड्याभराच्या आत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी नऊ कोटी 40 लाख रुपयांचा या मतदारसंघातील विविध नगरपरिषदांसाठी निधी मंजूर करण्यात आल्याची पोस्ट संजय देशमुख यांनी केली आहे
हा निधी मंजूर केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच महायुती सरकारच्या आभार मानले आहे
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: साहेब काळजी करू नका, हजार फुटले तरीही यापुढे मशालीचा भगवाच हिंगोली जिल्ह्यावर फडकणार
ठाकरे शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, या फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला असून ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, उद्धव ठाकरे हिंगोली जात असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून येत असून मेळाव्याची जीत तयारी करण्यात आली आहे, दरम्यान लोकप्रतिनिधी, नेते सोडून गेलेत शिवसेनेचा मतदार आजही मातोश्री सोबत आहे.. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मशालीचा भगवा फडकवणार आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करणार असल्याचा विश्वास स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: खासदार आष्टीकरांनी बंडखोरी करून आमच्या सोबत विश्वासघात केला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केलाय, खासदारांच्या बंडखोरीनंतर सर्वसामान्य नागरिकांनी खासदार आष्टीकरांनी आमच्या सोबत विश्वासघात केलाय, खासदार राष्ट्रीयक्रांची कुठलीही ओळख नसताना केवळ पंधरा दिवसांमध्ये आम्ही त्यांना निवडून दिलं.. उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडून अनेक नेते लोकप्रतिनिधी फुटले मात्र आम्ही मरेपर्यंत उद्धव ठाकरे सोबत राहणार अशी प्रतिक्रिया हिंगोलीतील सर्वसामान्य नागरिकांनी दिली आहे..
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: कुठेही शेण खायला जा, पण राजीनामा द्या: अरविंद सावंत यांचा इशारा
जनतेने आम्हाला निवडून दिलं त्यामुळे हा आमचा बालेकिल्ला आहे. बंडखोर खासदारांनी उद्धव ठाकरे आणि लोकांच्या मताचा अपमान केला. जी गेलीत ते लाचार लोक कोणाच्याही शय्येवर जातील. हे लोक विकाऊ लोकं आहेत. ढोंगी लोकं आहेत, माध्यमांचे आभार तुम्ही निधी बाबत माहिती समोर आणली
या गद्दारांना गाडलं पाहिजे. महाराष्ट्राला कलंक लागला आहे. तुम्ही कुठेही जा शेण खायला पण राजीनामा द्या, असे म्हणत अरविंद सावंत यांनी बंडखोरांवर टीका केली आहे.
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: बंडानंतर उद्धव ठाकरे यांचा आज वाशिम दौरा, कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मैदानात उतरत आजपासून यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.आज दुपारी ते वाशिम शहरातील जैन भवन येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून जैन भवन परिसरात उत्साहाचे वातावरण आहे
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: जो गरजते है वो बरसते नही;मंत्री संजय राठोड
जो गरजते है वो बरसते नही अशा शब्दात मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्याबाबत आणि ऑपरेशन तुडवा बाबत टीका केली. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिपणी केली तरी त्याचे उत्तर आम्ही कामाने देऊ.आम्ही 40 आमदारांनी उठाव केला होता, त्याचे 60 आमदार झालो अजूनही संख्या वाढत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक जण यायला तयार आहेत. आगामी काळात अनेक प्रवेश शिवसेनेत बघायला मिळतील त्यामुळे कुणाच्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करत राहू असे संजय राठोड यांनी सांगितले.
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: ठाकरेंच्या दौऱ्यावर शिंदे गटाची टीका
कुंकू-टिळा, डोहाळजेवणाचे कार्यक्रम जिथे होतात, त्याच सभागृहात उद्धव ठाकरेंना मेळावा घेण्याची वेळ आली अशी बोचरी टीका करत युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य ॲड. अविनाश खापे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे उद्या धाराशिव दौऱ्यावर येणार असून शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. यावर बोलताना देताना खापे पाटील यांनी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुले मैदानावर सभा घेत पक्ष मजबूत करत असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे खासदार आणि आमदार पक्ष सोडत असल्यामुळेच उद्धव ठाकरे दौरे करत असल्याची टीका त्यांनी केली.
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: उद्धव ठाकरे यांची रात्री दरम्यान अचानक वर्ध्यात भेट
उद्धव ठाकरे यांची रात्री दरम्यान अचानक वर्ध्यात भेट
वर्ध्याच्या देवळी येथील विश्रामगृहात थांबत कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी
यवतमाळ येथे जात असतांना वर्ध्याच्या देवळी येथे थांबत उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतले शिवसैनिकांचे मत
देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे केले स्वागत
Uddhav Thackeray Vidarbha Tour LIVE Update: यवतमाळातून उद्धव ठाकरे यांचे शक्तिप्रदर्शन; निष्ठावंत शिवसैनिक संवाद मेळावा
खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांच्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून पक्ष संघटन मजबूत करण्यासह आगामी राजकीय रणनीतीबाबत महत्त्वाचा संदेश देण्याची शक्यता आहे. या सभेकडे विदर्भातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.