11 hours ago

Maharashtra LIVE Blog: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा दर्शवला आहे. भारतासोबत आम्ही आहोत” आणि “स्वत:चा बचाव करण्याच्या भारताच्या अधिकाराला अमेरिका पुर्ण पाठिंबा देते.. असे आश्वासन अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिले आहे. 

May 02, 2025 20:10 (IST)

Live Update : पुण्यात भर रस्त्यावर कोयत्यानं तुफान हाणामारी

पुण्यातील गुन्हेगारी काही थांबत नाही. शहरातील भर रस्त्यावर कोयत्याने तुफान हाणामारी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.  सराईत गुन्हेगार सुरज भिसे, सुमित भिसे आदित्य पवार सतीश पवार यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी देखील भिसे आणि पवार यांनी दहशत माजवण्यासाठी कोयत्याने मारहाण केली होती. 

बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. 17 एप्रिल रोजी हा सर्व प्रकार घडला होता.  सीटीव्ही फुटेज समोर आल्याने हल्ल्याची भीषणता समोर आली. पुणे पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं. कोर्टानं या प्रकरणात भिसे आणि पवारसह सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

May 02, 2025 18:27 (IST)

Live Update : APMC फळ बाजारात अंमली पदार्थांची तस्करी? पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात परदेशातून आयात होणाऱ्या फळांच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. या आरोपानंतर आज (2 मे) पोलिसांनी मोठी तपास मोहीम राबवून 150 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील नागरिकत्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

तसेच नागरिकांनी पोलिसांना संशयास्पद व्यक्तींविषयी माहिती देण्याचे आवाहन देखील केले आहे. या तपास मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एपीएमसी बाजारातील 8 कोल्ड स्टोरेज, गोदामे, संपूर्ण बाजार आवार पिंजून काढला आहे.

May 02, 2025 16:39 (IST)

Live Update : भारत आणि चीनमधील प्रेक्षकांच्या भावना सारख्या - आमिर खान

मुंबईच्या BKC परिसरात सुरु असलेल्या पहिल्या-वहिल्या Waves शिखर परिषदेमध्ये NDTV समुहाचे संपादक संजय पुगलिया यांनी चित्रपट अभिनेता आमिर खान, फिल्ममेकर पिटर हो सुन चान, दिग्दर्शक स्टेनली टाँग आणि निर्माते प्रसाद शेट्टी यांच्याशी संवाद साधत आहेत. 

यामध्ये बोलताना आमिर खान याने भारत आणि चीनमधील प्रेक्षकांच्या भावना सारख्याच आहेत, असं वक्तव्य केलं. मला गेल्या 10 वर्षांत चीनला जाण्याची अनेकदा संधी मिळाली. भारत आणि चीनमधल्या प्रेक्षकांच्या भावना या सारख्याच आहेत, असे मला वाटते, असं आमिर म्हणाला. 

May 02, 2025 16:24 (IST)

Live Update : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया, राहुल गांधी यांना नोटीस

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि इतर काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.ईडीच्या आरोपपत्रातील बाजू जाणून घेण्यासाठी नोटीस बजावली

राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नोटीस बजावली आहे. हे तिघेही चार्जशीटमध्ये आरोपी ठरवण्यात आले आहेत. पण, न्यायालयीन प्रक्रियेत ते अद्याप आरोपी नाहीत. 

Advertisement
May 02, 2025 14:28 (IST)

Jitendra Awhad Threat: जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

May 02, 2025 14:05 (IST)

LIVE Updates: सचिन कुर्मींच्या हत्येतील आका कोण? कुटुंबियांनी बड्या नेत्यांची नावे घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी कुटुंबाने केली आकांची नाव जाहीर.

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची नावे घेत आरोप

भाजप आमदार मंत्री आशिष शेलार, माजी आमदार यामिनी जाधव, यशवंत जाधव यांची आका म्हणून नाव. 

आरोपींनी याच आकांच्या सांगण्यावरून खून केल्याचा आरोप

मुख्यमंत्री व गृहराज्य मंत्री यांनी प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची कुटुंबाची मागणी

कुर्मी कुटुंबियांच गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू

Advertisement
May 02, 2025 14:04 (IST)

LIVE Updates: मुंबई - गोवा महामार्गावर गँस टँकर पलटी

मुंबई - गोवा महामार्गावर गँस टँकर पलटी

महामार्गावर निवळी घाटात सीएनजी टँकर झाला पलटी

 जयगड वरुन मुंबईच्या दिशेने जात होता टँकर

महामार्गाच्या कडेला झाला टँकर पलटी

टँकर पलटल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु

खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांकडून विशेष काळजी

May 02, 2025 14:01 (IST)

Waves Summit: पनवेलमध्ये स्वतंत्र फिल्मसिटी उभारणार: CM देवेंद्र फडणवीस

वेव्हज परिषदेमध्ये आठ हजार कोटींचे करार झालेत. यामध्ये दोन विद्यापीठ करार झालेत. त्यासोबतच गोदरेजसोबत पनवेलमध्ये फिल्मसिटी उभारणार आहे, ज्यामध्ये 3 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून 10 हजार अप्रत्यक्ष रोजगार मिळतील: CM देवेंद्र फडणवीस 

Advertisement
May 02, 2025 12:41 (IST)

LIVE Updates: हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांचे स्मारक बांधा: रवींद्र चव्हाण यांची मागणी

काश्मीर अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिघांचे शहीद स्मारक उभारा

डोंबिवलीचे भाजप आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मागणी 

डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात शहीद स्मारक बांधण्याची मागणी

 केडीएमसी आयुक्तांकडे केली मागणी

May 02, 2025 12:31 (IST)

Sharad Pawar Tweet: माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन! शरद पवार भावुक

May 02, 2025 12:29 (IST)

Ulhasnagar Crime: तरुणाचा झाडावर लटकलेला मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की आत्महत्या?

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात एका तरुणाचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळून आलाय. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला. सौरभ गायसमुद्रे असं या तरुणाचं नाव होतं. प्रेमनगर टेकडी भागातील पाण्याच्या टाकीच्या बाजूला जंगलात त्याचा झाडाला लटकलेला मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आलाय

May 02, 2025 12:27 (IST)

Jalgaon News: जळगाव शहरातील इलेक्ट्रिक दुकानाला आग

जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर इलेक्ट्रिकल या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती घटनेची माहिती मिळतात महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टाळली असली तरी मात्र टीव्ही फ्रिज एसी वॉशिंग मशीन यासह इतर इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाले असून लाखो रुपयांची नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवल्या जात आहे. तर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

May 02, 2025 11:05 (IST)

Pune News: हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

पुण्याच्या दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दहिटणे गावात बापूजी बुवा वस्तीवर अकरा महिन्याच्या अनवित भिसे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यानंतर या बिबट्याचा वन खात्याकडून शोध घेतला जातोय.दरम्यान काल रात्रीच्या सुमारास बापूजी बुवा वस्ती येथे बिबट्याचा वावर स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.

हा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या चा व्हिडिओ दहिटणे गावातील बापूजी बुवा वस्ती परिसरातील असल्याचे बोलले जातेय.

May 02, 2025 10:40 (IST)

LIVE Updates: दिल्लीत पावसाचा कहर, वाहतूक ठप्प

दिल्लीत पावसाचा कहर... पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प.. झाड कोसळून एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाल्याचीही दुर्दैवी घटना समोर आली आहे. 

May 02, 2025 10:33 (IST)

LIVE Updates: रामराजे निंबाळकरांना धक्का! जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात पोलिसांकडून नोटीस

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलीस यांच्याकडून चौकशीसाठी समजपत्र

 जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर समन्स 

उद्या सकाळी 11 वाजता वडूज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश.

या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या

May 02, 2025 10:30 (IST)

LIVE Updates: बनावट प्रमाणपत्र प्रकरण: पूजा खेडकरची दिल्ली क्राईम ब्रँचकडून चौकशी होणार

 वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेड़कर हिला आज दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

आज पहिल्यांदाच पूजा खेड़कर दिल्ली पोलिसांच्या समोर चौकशीसाठी हजर होणार आहे.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं तिला सकाळी १० वाजल्यानंतर चौकशीसाठी बोलावलं आहे.

पूजा खेड़करवर बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे UPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याचा गंभीर आरोप आहे.

 हा संपूर्ण प्रकरण सध्या दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या तपासाअंतर्गत आहे.

May 02, 2025 10:13 (IST)

LIVE Updates: शेअर बाजारात तेजी वाढली, सेन्सेक्स 800 अंकांनी उसळला

तेजी आणखी वाढली.. सेन्सेक्स 800 अंकांनी उसळून 81 हजारच्या पलीकडे तर निफ्टी 200 अंकांनी वधारुन 24566 च्या जवळ...अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये दमदार खरेदी

May 02, 2025 10:10 (IST)

Parabhani News: परभणी शहरातील जवाहर कॉलनी येथे अज्ञात चोरट्याने केली घरफोडी

परभणी शहरातील जव्हार कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना काल समोर आली आहे, संबंधित कुटुंब बाहेर गावी गेले होते ते काल परत आल्यावर ही घटना समोर आली असता घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घर लुटले आहे त्यात एक लाख 34 हजार अशी रोख रक्कम, तीन तोळे सोने आणि काही चांदी देखील या चोरट्याने लंपास केल्याची माहिती घरमालकाने दिली आहे, या घटनेनंतर पोलीस दलाच्या श्वान पथकाने घराची पाहणी केली तर छापा विभागाने हाताच्या ठस्यांची पाहणी करून कारवाही केली आहे, अज्ञात चोट्यांवर उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाही नानलपेठ पोलीस करत आहेत....

May 02, 2025 10:09 (IST)

Virar Accident: विरारमध्ये भरधाव टँकरच्या धडकेत ३४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

विरार पूर्वेला एका भरधाव टँकरच्या धडकेत ३४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजना संदिप राणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या विरारच्या कोपरी नित्यानंदनगर येथील साईपवन भक्ति को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहत होत्या.. संजना राणे आपल्या भाऊ आणि मुलीसोबत जात असताना भरधाव धडक दिली, अपघाताच्या आरोपी टँकर चालकाने मदत न करताच घटना स्थळावरून पळ काढला.  वसई विरार नालासोपारा परिसरात टँकर चालक अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत असून अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. 

May 02, 2025 09:53 (IST)

LIVE Updates: दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या फक्त अफवाच, शरद पवारांच्या नेत्याने थेट सांगितलं

दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या फक्त अफवाचं, राष्ट्रवादी(sp) च्या प्रवक्त्याने सगळ्या चर्चेतील हवाच काढली 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याची सुतराम शक्यता नसल्याचं म्हटलं आहे 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या जाणीवपूर्वक बातम्या बरेच दिवसापासून पेरल्या जात आहेत.

वास्तविक असे काहीही होण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ अफवा आहेत

दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा अजित पवार आणि मित्र मंडळी प्रतिगामी विचाराच्या भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडतील.

May 02, 2025 09:22 (IST)

LIVE Updates: भारत पाकिस्तानची टपाल सेवा आणि IP ऍड्रेस बंद करण्याच्या विचारात

भारत पाकिस्तानची टपाल सेवा आणि IP ऍड्रेस बंद करण्याच्या विचारात

पाकिस्तानविरोधातील व्यापक राजनयिक मोहिमेचा भाग म्हणून भारत पाकिस्तानातील वेबसाइट्स आणि सेवांवरील प्रवेश रोखण्याचा विचार करत आहे. यात टपाल सेवा आणि IP ऍड्रेसवर बंदी घालण्याचाही समावेश आहे.

May 02, 2025 09:21 (IST)

LIVE Updates: हिंगोली जिल्ह्यात 1 लाख 88 शिधापत्रिका केवायसी अपूर्ण

हिंगोली जिल्ह्यात  8 लाख 8 हजार 757 एवढी शिधापत्रिका धारकांची संख्या असून यापैकी 4 लाख 7 हजार लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण केली असून 1 लाख 88 हजार लाभार्थ्यांची केवायसी अजूनही बाकी आहे, केवायसी करण्यासाठीची मुदत देखील संपली आहे. त्यामुळे आत्ता बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची केवायसी कशी पूर्ण होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.. तर केवायसी करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शिधापत्रिका धारकांकडून केली जात आहे...

May 02, 2025 09:20 (IST)

LIVE Updates: राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीनं गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीने गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. ही संस्था महाराष्ट्रात 32 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिन्यातील एक रविवार महाराजांच्या प्रत्येक गडकिल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवण्यात येते..राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून यशवंत गड , जयगड ,जयगड , रत्नदुर्ग, पुर्णगड, आंबोळगड, गोविंदगड, सुवर्णदुर्ग ,  किल्ले सिंधुदूर्ग अशा विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती. मोहीमेसाठी जयगड, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, लांजा, सांगली, गोवा, सावंतवाडी येथून परिवाराचे सदस्य दाखल झाले होते.

May 02, 2025 08:50 (IST)

Nashik News: नाशिकरोड परिसरात युवकाची हत्या

- नाशिकरोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हितेश डोईफोडे नामक युवकाची हत्या

- दोघांवर करण्यात आला होता प्राणघातक हल्ला, एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

- जून्या भांडणाची कुरापत काढून हत्या केल्याची प्राथमिक माहिती

- हल्ला करून संशयित स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर

- नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अधिक तपास सुरू

May 02, 2025 08:17 (IST)

LIVE Updates: वैजापूरच्या पानगव्हाण येथे उष्माघातामुळे वृद्धाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या पानगव्हाण येथे उष्माघाताने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. वसंत कटारे असे मयताचे नाव असून कटारे हे सकाळी 11 वाजेच्या सुमारास अर्धा किलोमीटर अंतरावरील चुलत भावाच्या शेतातील घरी गप्पा मारायला गेले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास ते घरी येत असताना उन्हाच्या कडाक्यामुळे अचानक चक्कर येऊन शेतात पडले. जवळपास 2 तास त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. त्यामुळे यांचा जागीच मृत्यू झाला.अति उष्णतेमुळे त्यांच्या संपूर्ण अंगावर फोड आले होते. तसेच त्यांची त्वचा काळी पडली होती. दोन तासांनंतर ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आली. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

May 02, 2025 07:17 (IST)

LIVE Updates: आमदार संग्राम जगताप यांना पितृशोक! माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

माजी आमदार अरुण काका जगताप यांचे पुणे येथे निधन... गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते..

May 02, 2025 07:16 (IST)

LIVE Updates: भारत जगाला ताकद दाखवणार! 2 मे रोजी गंगा एक्सप्रेसवेवर एअरशो

भारतीय हवाई दल २ मे रोजी गंगा एक्सप्रेसवेवर एअरशो आयोजित करणार, ताकद दाखवणार

राफेल, जॅग्वार आणि मिराज सारखी लढाऊ विमाने या एअरशोमध्ये सहभागी होणार

शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवरील ३.५ कि.मी. लांबीच्या रनवेवर होणार एअरशो

पहिल्यांदाच इतक्या अत्याधुनिक लढाऊ विमानांची उड्डाणे आणि लँडिंग महामार्गावर

युद्धजन्य किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील तयारीची चाचणी या एअरशोमध्ये होणार

गंगा एक्सप्रेसवेवरील पहिल्या नाईट लँडिंग रनवेची चाचणी होणार

सध्याच्या तनावाच्या स्थितीत हे महत्त्वाचे

May 02, 2025 07:15 (IST)

LIVE Updates: सलग आठव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

सलग आठव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

कोणतीही चिथावणी न देता पाकिस्तानने एलओसीवर स्मॉल आर्म्सने गोळीबार केला

जम्मूच्या पुंछ, नौशेरा, अखनूर आणि काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला येथे पाक सैन्याने केली तोफगोळ्यांची बरसात