Raj Thackeray On Matoshree: राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर निघाले असल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असतानाच आता राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Uddhav Thackeray: राज ठाकरेंशी युती करणार का ? उद्धव ठाकरेंचे कोड्यात उत्तर
शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे ((Uddhav Thackeray Birthday) यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. राज्यभरातील शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर पोहोचले असून संजय राऊत, अंबादास दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंची गळाभेट घेतली त्यानंतर मातोश्रीमध्ये गेले. मराठीच्या प्रश्नावरुन झालेल्या मनोमिलनानंतर ठाकरे बंधुंच्या या नव्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Marathi Hindi Row: राज ठाकरेंवर FIR दाखल करा, थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; प्रकरण काय?
दरम्यान, खेळात जीवनाच्या नित्यहारजीत चाले कधी होतो वर्षाव फुलांचा कधी टोचतात भाले खऱ्या शिवसेनेच्या कणखर स्वाभिमानी नेतृत्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संजय राऊत यांच्यासह, नितीन गडकरींनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.