जाहिरात

Uddhav Thackeray: राज ठाकरेंशी युती करणार का ? उद्धव ठाकरेंचे कोड्यात उत्तर

Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Uddhav Thackeray: राज ठाकरेंशी युती करणार का ? उद्धव ठाकरेंचे कोड्यात उत्तर

Uddhav Thackeray Sanjay Raut Interview: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. मुंबईमध्ये ठाकरे बंधुंची एकत्रित सभा झाल्यानंतर लवकरच ठाकरे बंधु एकत्रित येतील अशी चर्चा सुरु आहे. राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांवर आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सामना वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू, असं म्हणत बंधुमिलन होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रोब्लेम आहे का? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करु. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. मी आतासुद्धा फोन उचलून त्याला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो, आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय आहे? बाकीचे लोक एकमेकांना चोरूनमारून भेटतात. आम्ही चोरूनमारून भेटणाऱ्यातले नाहीत. मुलाखतीच्या सुरुवातीलाच बोललात ना की 'ठाकरे बॅण्ड' वेगळा आहे. ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Marathi Hindi Row: राज ठाकरेंवर FIR दाखल करा, थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; प्रकरण काय?

विजयोत्सवात एकत्र आल्याने सर्वांना आनंद..

तसेच "आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, 'अच्छा किया आपने'. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो," असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल याचा अर्थ नेमका काय? याबाबतही महत्त्वाचे विधान केले.  "लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू असाच याचा अर्थ आहे. मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणं हे ठीक आहे. ते होणार. आम्ही एकत्र आलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठीच. लोकांचा रेटा आहे की, राजकीयदृष्ट्या एकत्र यावं," असं ते म्हणाले.

Navneet Rana: 'राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठीचा वाद..', नवनीत राणांनी ठाकरे बंधुंवर डिवचलं

दरम्यान,  "आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे. यासंदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे का? चर्चाही होईल.. पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. हेही नसे थोडके! हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.. असे संकेत दिलेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com