
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लिहलेले नरकातला स्वर्ग हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे. संजय राऊत यांच्या 100 दिवसांच्या जेलवरील तसेच मविआच्या स्थापनेपासून शिंदेंच्या बंडांमुळे सरकार कोसळेपर्यंतच्या अनेक नाटयमय घडामोडींबाबत यामध्ये मोठे गौप्यस्फोट करण्यात आलेत. एकीकडे या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक भेट म्हणून दिले आहे. एक्स माध्यमावर ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली असून त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे संजय राऊत यांची पोस्ट?
'श्री. एकनाथ शिंदे, जय महाराष्ट्र ! 'नरकातील स्वर्ग' या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. श्री. जावेद अख्तर, श्री. शरद पवार, श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात १०० दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. 'ईडी'सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो.
शुभ प्रभात,
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 30, 2025
माझे एकेकाळचे मित्र व त्याच काळातील शिवसेनेतील सहकारी एकनाथ शिंदे यांना “ नरकातला स्वर्ग “ या पुस्तकाची प्रत पाठवली.
शिंदे व सुरत गौहाटी ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी हे पुस्तक जरूर वाचावे…
जय महाराष्ट्र pic.twitter.com/AhYWDI0OPF
या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. 'ईडी', 'सीबीआय' वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल ! कळावे.. असे संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
( नक्की वाचा- Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)
दरम्यान, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या पुस्तकाची प्रत वाचणासाठी पाठवली आहे. राऊतांच्या या पुस्तक भेटीवर एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world