मंगेश जोशी, जळगाव: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत, अशातच एक मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव विमानतळावर संजय राऊत जळगाव मधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट झाली आहे. भेटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर 15 मिनिटे बंददाराआड चर्चा झाली असून यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
राजकीय अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आता आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी जळगावत आलेल्या संजय राऊतांची भेट झाल्यामुळे व बंदद्वार चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वर्तवले जात आहेत.
( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
मात्र या भेटीनंतर संजय राऊत हे आमचे जुने मित्र असून झालेली भेट ही सदिच्छा भेट असून राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण सुरेश जैन यांनी दिले आहे. तर सुरेश दादा जैन हे आमचे नेते व मार्गदर्शक असून सुरेश दादा अजून थकलेले नाहीत अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊतानी या भेटीनंतर दिली आहे. तर भेटीदरम्यान आगामी निवडणुकांबाबत काही चर्चा झाली का या प्रश्नावर उत्तर देताना पाहूया तुम्हाला कळेल असे म्हणत राजकीय चर्चेबाबत संजयरावतांकडून मात्र सस्पेन्स कायम आहे.
Akola Crime: कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्त