मुंबई: गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट नेते आहेत, त्यांच्या मंत्रालयातील प्रत्येक फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
'भाजप आणि शिवसेनेमधील काही नेते दलाल आहेत. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचे काम ते करतात. गिरीश महाजन आपापल्या मंत्रालयातील कामे करतात का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. गिरीश महाजन यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासही विरोध होता अशी माझी माहिती आहे,' असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच 'गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय गिरीश महाजन कोणत्याही फाईलवर सही करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या कार्यालयात पडून आहेत त्याचे व्यवहार अजून व्हायचे आहेत. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट नेते आहेत.याबाबत पुरावे हवे असल्यास मी द्यायला तयार आहे. मात्र कोणतीही कारवाई होणार नाही,' असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
RCB Captains : 18 वर्षात दिग्गजांना जमलं नाही ते पाटीदारने करुन दाखवलं; RCB चे आतापर्यंतचे 8 कर्णधार
दरम्यान, 'नाशिकमधून शिवसेनेबद्दल येणाऱ्या बातम्या खऱ्या नाहीत. एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. लोकांना लाभ हवे आहेत त्या लाभासाठी ते पक्ष बदलत आहेत. नाराजीचे म्हणाल तर एकनाथ शिंदे शिवसेनेतही नाराज होते आता महायुतीमध्येही नाराज आहेत. अशा व्यक्तींच्या आजारपणावर काही औषध नसते. राजकारणात नाराज नसणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार. ते त्यांचे कौतुकास्पद स्किल आहे,' असंही संजय राऊत म्हणाले.