Maharashtra LIVE Updates: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्याचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे हे मुख्य आरोपी असून ते सध्या फरार आहेत. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे याला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
राजेंद्र हगवणेला कोर्टात हजर केले गेले
राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांना शिवाजीनगर न्यायालयात आता हजर केले गेले आहे. थोड्याच वेळात न्यायमूर्तींसमोर त्यांची पेशी होईल आणि त्यावर न्यायालय काय निर्णय घेते हे थोड्याच वेळात समजू शकेल.
पनवेल शहरात 28 आणि 29 मे रोजी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद
पनवेल महानगरपालिकेच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखभाल कामांमुळे पनवेल शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवार, 28 मे सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवार, 29 मे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच 36 तास टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे.
रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली
अवकाळी पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली
रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथील काल संध्याकाळची घटना
पाच झोपड्यांवरती संरक्षक भिंत कोसळली
संरक्षक भिंत कोसळल्याने तिघेजण जखमी
आशा राठोड , रोहन जाधव आणि मोहन राठोड
यात मोहन या दोन वर्षीय बालकाचा समावेश
सुदैवाने मोठी घटना टळली
जखमींना जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल
हगवणे बाप-लेकाला थोड्याच वेळात कोर्टात केलं जाणार हजर
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात प्रमुख आरोपी तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याच्या पोराला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांना पहाटे अटक करण्यात आली होती. कोर्ट परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Nagpur News: नागपुरात दोन ठिकाणी ED चे छापे
नागपूरच्या इतवारी परिसरात सागर ज्वेलर्स येथे ई डी ची रेड. सराफा असोसिएशन चे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांच्या सागर ज्वेलर्स येथे ई डी ची टीम सकाळपासून हजर. विदेशातून 18 कोटी रुपयांचे सोने तस्करी प्रकरणात याआधी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स कडून आधीच प्रकरण दाखल असून फेमा अंतर्गत चौकशी सुरू आहे. कावळे यांना अलीकडे काही महिने तुरुंगात जावे लागले होते.
Palghar Rain News: पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
सफाळे परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात
हवामान विभागाने आज आणि उद्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा दिला आहे इशारा
अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ, शेतकऱ्यांचे नुकसान
LIVE Updates: कराड तासवडे एमआयडीसीत 6 कोटीचे कोकन पकडले
कराड तासवडे एमआयडीसीत 6 कोटीचे कोकन पकडले
सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीत सापडले 1370 ग्रॅम कोकेन
कंपनीत बेकायदेशीर कोकेन लपवले असल्याच्या माहितीवरून पोलिसांचा छापा
पाच संशयितांना घेतले ताब्यात
तळबीड पोलीसांनी केली कारवाई
गेले चार वर्ष रॅकेट सुरु असल्याचे समोर
तेलगंणामध्ये कोकेनची विक्री केली जात होती.
Amravati News:दीड लाखाची लाच घेताना वीज अभियंता,इलेक्ट्रिशन ताब्यात
अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे लाचलुचपत विभागाची कारवाई..
महावितरणच्या कंत्राटदाराला मागितली होती लाच.
महेश दुपारे, आणि शरद बेलसरे अशी आरोपींची नावं आहेत..
महेश दुपारे याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे..
या संदर्भात वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे..
अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत
Parbhani News: शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर शेतकरी संगठना आक्रमक
परभणी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे खाते होल्डवर ठेवले आहे, त्यातच रामेश्वर दुधाते या शेतकऱ्याने घरात लग्न आहे, पीक पेरणीसाठी बँकला खाते चालू करण्यासाठी निवेदन दिले होते, परंतु बँके तर्फे कुठलाच प्रतिसाद ना भेटल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे,
Nashik News: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे जिंदाल कंपनीत दाखल
- नाशिकचे शिवसेना नेते, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे जिंदाल कंपनीत दाखल
- जिंदाल कंपनीतील आगीच्या नुकसानीची भूसे करतायत पाहणी
- आग आटोक्यात आल्यानंतर भूसे दौरा करत असल्याने चर्चेचा विषय
- 55 तासानंतर जिंदाल कंपनीची आग आली आहे आटोक्यात
Amit Shah Tour: अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
25 मे पासून 27 मे पर्यंत महाराष्ट्र दौरा
नागपूर, नांदेड, मुंबईत अमित शाह
नांदेड मध्ये सिंदूर यांत्रा तसंच मुंबई विद्यापीठ येथे वीर सावरकर यांवरील कार्यक्रम सहभागी होणार शाह
LIVE Updates: IMF कडून पाकिस्तानला दिलेल्या मदतीचा मुद्दा भारत काढणार
जूनमध्ये जागतिक बँकेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
यात भारत जागतिक बँकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीविरुद्ध आपले मत मांडणार
यापूर्वी पाकिस्तानला निधी देण्यासाठी भारताने विरोध दर्शविला होता.
भारताच्या विरोधाला न जुमानता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल भारत संतापला आहे.
LIVE Updates: छगन भुजबळांकडे अन्न पुरवठा विभागाचा पदभार
मंत्री छगन भुजबळ यांचेकडे अन्न पुरवठा विभागाचा पदभार
शासकीय आदेश काढले
भुजबळ यांच्याकडे धनंजय मुंडे राजीनामा नंतर अजित पवार यांच्याकडे दिलेल्या विभागाचा चार्ज
LIVE Updates: नाशिकच्या सातपूर परिसरात समाज कंटकांकडून वाहनांची तोडफोड
- नाशिकच्या सातपूर परिसरात समाज कंटकांकडून वाहनांची तोडफोड
- अज्ञात व्यक्तींकडून वाहनांच्या काचा फोडत दहशद माजवण्याचा प्रयत्न
- नाशिकच्या सातपूर श्रमिक नगर परिसरातील घटना
- घटनेत 5 वाहनांचे नुकसान
LIVE Updates: अखेर जिंदाल कंपनीची आग विझली
आशिया खंडातील जिंदाल कंपनीच्या सर्वात मोठ्या युनिटमध्ये अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा भीषण अग्नितांडव बघायला मिळत असून कंपनीतील एक - दोन नाही तर 13 लाईनमध्ये आग पसरली होती. आता तब्बल तीन दिवसांनी ही आग विझली आहे. त्यामुळे मोठा धोका टळला आहे.
Baramati News: भर पावसात अजित पवारांकडून बारामतीत विकास कामांची पाहणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात बारामतीमधील विविध विकास कामांची सकाळपासून पाहणी केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून बारामती दौऱ्यावर ...
बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार हे कोल्हापूरसाठी मार्गस्थ झालेत.
LIVE Updates: अवकाळीचा फटका, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात मागील सहा ते सात दिवसांपासून मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असून यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच मात्र नुकसान झालं आहे, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बोडखा येथील शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली होती.. काही दिवसांमध्ये हे टोमॅटो तोडणीला येणार होते मात्र अवकाळी पावसाने संपूर्ण टोमॅटोच्या बागेच नुकसान केला आहे, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे..
LIVE Updates: कराड चिपळूण महामार्गांवर वाहतूक ठप्प
कराड चिपळूण महामार्गांवर वाहतूक ठप्प
पाटण तालुक्यातील वाजेगाव गावाजवळ ट्रक चिखलात अडकला
रस्त्याचे काम सुरु असल्याने घडली घटना
पाच किलोमिटरच्या रांगा
रस्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी चुकिच्या पध्दतीने खोदकाम केल्याचा आरोप
LIVE Updates: जिंदाल कंपनीला लागलेली आग अजून धुमसतीच
- जिंदाल कंपनीला लागलेली आग अजून धुमसतीच
- तब्बल 54 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश नाही
- NDRF सह CBRN च्या टिमकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू मात्र तरी देखिल आग थांबेना
- ठाणे, पुणे यासह इतर जिल्ह्यातूनही अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी
- कच्चे पेट्रोलियम पदार्थ असल्याने पाणी मारल्यास ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार होऊन आग अधिकच भडकत असल्याने अग्निशमन दलाला फोमचा करावा लागतो आहे मारा
- कंपनी परिसरातच असलेल्या प्रोपेन गॅस टाकीला आगीची झळ पोहचू नये म्हणून घेतली जाते आहे सर्व खबरदारी, कूलिंग ऑपरेशन सुरूच
LIVE Updates: निलेश रामचंद्र चव्हाणवर गुन्हा दाखल
वारजे पोलिस ठाण्यात निलेश रामचंद्र चव्हाण, रा. कर्वेनगर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 19 मे रोजी चव्हाण यांच्या राहत्या घरी मुलाच्या ताब्यासाठी गेलेल्या कासपटे कुटुंबाला त्यांनी धमकी दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
LIVE Updates: आंदोलनानंतर लोहारा भुसावळ एस टी बस सेवा सुरू
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर लोहारा भुसावळ ही बस सेवा सुरू करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षापासून ही बस सेवा बंद असल्याने ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना हाल सहन करावे लागत होते. अरे एकदा मागणी करून देखील मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर ग्रामस्थांनी लोहारा भुसावळ बस सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते या आंदोलनाला यश आली असून लोहारा भुसावळ ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
LIVE Updates: वैशाली हगवणे प्रकरणात शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही: गुलाबराव पाटील
पुण्याच्या वैशाली हगवणे हुंडाबळी प्रकरणात कारवाई करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात असून या प्रकरणात दोषींना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, जे कोणी अन्याय अत्याचार करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे
LIVE Updates: मोठी बातमी! आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएचे निलंबन
धुळे कोट्यवधींचे घबाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी SIT ची घोषणा करत नाही तोच अर्जुन खोतकरांच्या पीएचे निलंबन झाले आणि रात्री उशिरा पोलीसांकडून पीएची कसून चौकशीही करण्यात आली आहे.