40 minutes ago

Maharashtra LIVE Blog:  आज महाराष्ट्रातील विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.  दुपारी 12.30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार असून यानंतर त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, कॉ. अजित नवले, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुभाष लांडे, जयंत पाटील, त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील असणार आहेत. त्याआधी सर्व नेते शिवालय येथे जमून निवडणूक आयुक्तांना दिल्या जाणाऱ्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करतील.

Oct 14, 2025 13:40 (IST)

LIVE Update: मविआचे नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात, कोणते प्रश्न विचारले?

३१ जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? - राज ठाकरे

आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिले होते, आयोग म्हणतं की पत्रच आले नाही आमच्याकडे पुरावे आहेत:

अनेक घरं अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार आहे - जयंतराव पाटील

दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापर करून काढा - जयंतराव पाटील

याद्या दुरुस्ती करून फेअर मतदान घ्या - जयंतराव पाटील

आम्ही तुम्हाला पुरावे काही दिवसांत देतो - जयंतराव पाटील

राज्यांची जबाबदारी आपली आहे - जयंतराव पाटील

खोटे मतदार हे लाखांच्या घरात आहे - जयंतराव पाटील

Oct 14, 2025 13:01 (IST)

LIVE Update: मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ: राज ठाकरे

जे आज १८ वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ? - राज ठाकरे

एकाच मतदाराचे दोन दोन ठिकाणी नाव कसे? राज ठाकरे

वडिलांच्या वयापेक्षा मुलांचे वय जास्त कसे?: राज ठाकरे

Oct 14, 2025 12:59 (IST)

LIVE Update: मविआच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट, शरद पवारांसह ठाकरे बंधुंची उपस्थिती

Oct 14, 2025 12:52 (IST)

LIVE Update: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगात दाखल

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल: शरद पवार यांच्यासह राज ठाकरे उद्धव ठाकरे जयंत पाटील आदित्य ठाकरे महाविकास आघाडीतील नेते दाखल..

Advertisement
Oct 14, 2025 12:07 (IST)

LIVE Update: मविआचे नेते शिवालय कार्यालयात दाखल

उद्धव ठाकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर शिवालयला हजर झाले आहेत

अरविंद सावंत, शेकापचे जयंत पाटील शिवालयला दाखल

अंबादास दानवे दाखल

अनिल देसाई शिवालयला दाखल

Oct 14, 2025 12:06 (IST)

LIVE Update: शरद पवारांसह ठाकरे बंधु शिवालय कार्यालयात दाखल

ज्येष्ठ नेते शरद पवारही शिवालय कार्यालयामध्ये दाखल होणार, विरोधकांचे शिष्टमंडळ घेणार निवडणूक अधिकाऱ्यांची भेट 

Advertisement
Oct 14, 2025 11:25 (IST)

LIVE Update: मविआचे शिष्टमंडळ घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मंत्रालयातील सातव्या माळ्यावर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकल्लिंगम यांच्या दालनात भेटणार आहेत. ती भेट झाल्यावर प्रशासकीय भावनात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर शिवालयला दाखल झाले आहेत

Oct 14, 2025 11:24 (IST)

LIVE Update: ठाकरे बंधु घेणार निवडणूक आयुक्तांची भेट

ठाकरे बंधु मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला जाणार.. मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे निघाले, राज ठाकरेही शिवालय कार्यालयाकडे रवाना

Advertisement
Oct 14, 2025 11:23 (IST)

LIVE Update: मनसेच्या एन्ट्रीने काँग्रेसची एक्झिट

निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांची अनुपस्थिती काँग्रेस अध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर

अनेक काँग्रेसचे नेते हे मुंबई बाहेर असल्याने काँग्रेसचे मोजके नेते सहभागी होणार

वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात शिष्टमंडळमध्ये सहभागी होणार

Oct 14, 2025 07:48 (IST)

LIVE Update: महाराष्ट्रातील बारा हजार महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

महाराष्ट्रातील बारा हजार महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

राज्यातील 12 हजार महसूल सेवकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. महसूल मंत्री बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी, 16 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक, समाधान होईल असा तोडगा काढण्याचे आश्वासन

चतुर्थ श्रेणी मिळावी या मागणी साठी महसूल सेवक आंदोलनावर होते.

नागपुरात त्यांच्या संघटनेचे दोन नेते 4 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणावर होते. 

नवव्या दिवशी महसूल मंत्र्यांची शिष्टाई आली फळाला.

महसूल मंत्री रात्री अकरा वाजता थेट नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनस्थळी दाखल झाले.

Oct 14, 2025 06:57 (IST)

LIVE Update: झेडपी, पंचायत समिती आरक्षण जाहीर होताच अनेकांची न्यायालयात धाव

जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची प्रभाग रचना तसेच आरक्षण त्याचप्रमाणे नगरपालिकांच्या प्रभाग रचना व आरक्षण आणि मतदार यादी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर खंडपीठामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.

सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेणे बाबत मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे शासनाने अर्ज सादर केला आहे. त्यामुळे सर्व सुनावणी एकत्र होणार

Oct 14, 2025 06:32 (IST)

LIVE Updates: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास खेर्डी ग्रामपंचायत वसुल करणार दंड

चिपळूण शहरालगतच्या खेर्डी ग्रामपंचायतीच्यावतीने घंटागाडीद्वारे गावातील कचरा संकलीत केला जातो. तरीदेखिल सार्वजनिक ठिकाणी काही नागरिकांकडून कचरा टाकला जातो. याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास १ हजाराचा दंड केला जाणार आहे. तर कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढून दिल्यास ५०० रूपयाचे बक्षीस देण्याचा निर्णय खेर्डी ग्रामपंचायतीने घेतल्याने कचरा करणाऱ्यांचे धाबे दणादणले आहेत. 

Oct 14, 2025 06:32 (IST)

LIVE Updates: महायुतीतील आमदाराने उघडपणे युती न करण्याचा निर्णय केला जाहीर

 जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार असे जरी नेते म्हणत असले तरी मात्र किशोर पाटील हे राज्यातले पहिले असे आमदार आहेत की ज्यांनी थेट युती न करण्याचा निर्णय जाहीरपणे बोलून दाखवला आहे.

Oct 14, 2025 06:31 (IST)

LIVE Update: सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत फसवी: एकनाथ खडसे यांची टीका

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून मात्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली ही फसवी मदत असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. किमान हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती मात्र तीन मिळाल्याने शेतकरी समाधानी नसून जोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभा राहणं शक्य नसल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

Topics mentioned in this article