जाहिरात
2 hours ago

Maharashtra LIVE Blog:  आज महाराष्ट्रातील विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.  दुपारी 12.30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार असून यानंतर त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, कॉ. अजित नवले, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुभाष लांडे, जयंत पाटील, त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील असणार आहेत. त्याआधी सर्व नेते शिवालय येथे जमून निवडणूक आयुक्तांना दिल्या जाणाऱ्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करतील.

LIVE Update: महाराष्ट्रातील बारा हजार महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

महाराष्ट्रातील बारा हजार महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

राज्यातील 12 हजार महसूल सेवकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. महसूल मंत्री बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी, 16 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक, समाधान होईल असा तोडगा काढण्याचे आश्वासन

चतुर्थ श्रेणी मिळावी या मागणी साठी महसूल सेवक आंदोलनावर होते.

नागपुरात त्यांच्या संघटनेचे दोन नेते 4 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणावर होते. 

नवव्या दिवशी महसूल मंत्र्यांची शिष्टाई आली फळाला.

महसूल मंत्री रात्री अकरा वाजता थेट नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनस्थळी दाखल झाले.

LIVE Update: झेडपी, पंचायत समिती आरक्षण जाहीर होताच अनेकांची न्यायालयात धाव

जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची प्रभाग रचना तसेच आरक्षण त्याचप्रमाणे नगरपालिकांच्या प्रभाग रचना व आरक्षण आणि मतदार यादी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर खंडपीठामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.

सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेणे बाबत मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे शासनाने अर्ज सादर केला आहे. त्यामुळे सर्व सुनावणी एकत्र होणार

LIVE Updates: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास खेर्डी ग्रामपंचायत वसुल करणार दंड

चिपळूण शहरालगतच्या खेर्डी ग्रामपंचायतीच्यावतीने घंटागाडीद्वारे गावातील कचरा संकलीत केला जातो. तरीदेखिल सार्वजनिक ठिकाणी काही नागरिकांकडून कचरा टाकला जातो. याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास १ हजाराचा दंड केला जाणार आहे. तर कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढून दिल्यास ५०० रूपयाचे बक्षीस देण्याचा निर्णय खेर्डी ग्रामपंचायतीने घेतल्याने कचरा करणाऱ्यांचे धाबे दणादणले आहेत. 

LIVE Updates: महायुतीतील आमदाराने उघडपणे युती न करण्याचा निर्णय केला जाहीर

 जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार असे जरी नेते म्हणत असले तरी मात्र किशोर पाटील हे राज्यातले पहिले असे आमदार आहेत की ज्यांनी थेट युती न करण्याचा निर्णय जाहीरपणे बोलून दाखवला आहे.

LIVE Update: सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत फसवी: एकनाथ खडसे यांची टीका

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून मात्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली ही फसवी मदत असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. किमान हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती मात्र तीन मिळाल्याने शेतकरी समाधानी नसून जोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभा राहणं शक्य नसल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com