Rain News: पावसाचा जोर वाढला! पुणे घाटमाथ्याला 'रेड अलर्ट'; उर्वरित महाराष्ट्रात कशी असेल स्थिती?

Rain Update: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान खात्याने आज पुणे घाटमाथ्यासाठी अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Rain Update: राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवत हवामान खात्याने इशारे जारी केले आहेत. गुरुवारी पुणे घाटमाथ्यावर पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.

विविध जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचे 'इशारे'

अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट )

पुणे घाटमाथा अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता.

अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

(नक्की वाचा-  Salman Khan Backs CJP: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा CJP आंदोलनाला पाठिंबा! "पेपर लीक हा गंभीर विषय, पण...")

नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी धुवाधार पावसाची शक्यता.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथा, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव,  बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया.

Advertisement

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')

नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा इशारा

घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्यांच्या विसर्गात वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी, विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांनी, नदीपात्रात उतरू नये, पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाहा VIDEO