Maharashtra February rain forecast : मुंबईतील तापमानाचा (Mumbai weather) पारा हळूहळू वाढत आहे. दुसरीकडे मुंबईतील प्रदूषणाची (Mumbai pollution) पातळी मात्र वाईट स्तरापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात नागरिकांना हवामानाच्या बदलाला सामोरं जावं लागेल. त्यातच हवामान विभागाकडून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात नागरिकांना पावसाचा अनुभव घेता येणार आहे. उद्यापासून पावसाला पोषक वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज 30 जानेवारी रोजी दुपारी आणि सायंकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे आणि उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
आज (30 जानेवारी) राज्यात आकाश अंशतः ढगाळ (Rain forecast) राहण्याची आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला (February rain forecast) पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांबरोबरच वायव्य भारतात 12.6 किलोमीटर उंचीपर्यंत 145 नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून काल 29 जानेवारी रोजी हरियाणातील नर्नूल येथे देशाच्या सपाट भूभागावर नीचांकी 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात पहाटे धुक्याची चादर कायम आहे. किमान तापमान कमी-अधिक होत आहे. काल निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील किमान तापमान 13 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे.
नक्की वाचा - SIP calculator: रोज 100 रुपये गुंतवा अन् करोडपती बना, विश्वास होत नाही तर ही बातमी नक्की वाचा
दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा...
काल 29 जानेवारी रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांत रत्नागिरी येथे 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर, सोलापूर, अकोला, ब्रह्मपुरी येथे पारा 35 अंशांपार आहे. तसेच बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 32 अंशांच्या वर गेला. आज राज्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किमान तापमानात काहीशी घट होण्याची तर उर्वरित राज्यात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.