Maharashtra Rain : यंदाचा नवरात्रौत्सव पावसात? गरबा प्रेमींची चिंता वाढली; राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

पुढील चार ते पाच दिवस कुठल्या भागात असेल पाऊस? हवामान विभागाकडून कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

जाहिरात
Read Time: 1 min

Maharashtra Rain Update : अद्यापही महाराष्ट्रातील पावसाची रिमझिम थांबलेली नाही. 15 तारखेनंतर भारतातील परतीचा पावसाला सुरुवात झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभाकाडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यभरातील काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. 

सोमवार, 22 सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. सोमवारपासून गरबा, दांडियाला सुरुवात होईल. मात्र यादरम्यान हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आल्याने गरबा प्रेमींची चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी पाऊस पडला तर गरबा खेळण्यावर अडथळा येईल.  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Lonar Lake: लोणार सरोवराचा ऐतिहासिक वारसा धोक्यात; 12 मंदिरे पाण्याखाली, नवरात्रीच्या मुहूर्तावर मोठा धोका

रविवार, 21 सप्टेंबरलाही राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमघ्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article