Jayakwadi Dam : मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला! जायकवाडी धरण 96 टक्क्यांवर; धरणाचे 18 दरवाजे दुसऱ्यांदा उघडले

102 टीएमसी क्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणारे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 9 हजार 432 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

निम्म्या मराठवाड्याची तहान भागवणारं आणि आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचं धरण समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातून आज पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, जालना, बीड या पाच जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. अखेर जायकवाडी धरण फुल्ल झालं असून धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 102 टीएमसी क्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणारे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 9 हजार 432 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून विसर्ग झाल्यानंतर मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांसह विदर्भ, तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना लाभ होईल. नांदेडचा बाभळी बंधारा पूर्णक्षमतेने भरेल. त्यामुळे तेलंगणातही पाणी सोडले जाईल. तसेच भूजलपातळी वाढीला यामुळे चालना मिळेल.

जायकवाडी धरणाची वैशिष्ट्य

  • ९६ टक्के धरण भरलं
  • मराठवाड्यातील पिण्याचा, शेतीचा प्रश्न मिटतो
  • २ लाख ४० हजार हेक्टर शेती ओलीताखाली येते
  • ४०० गावं धरणामुळे पाणीपुरवठा
  • मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा
  • छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, जालना, बीड या पाच जिल्ह्यांना पाणीपुरवठा

Advertisement

नक्की वाचा - Sangli News: 21 वर्षांनी मूल झालं अन् कृष्णेच्या पुराच्या पाण्यात सोडलं; शेकडो वर्षांची प्रथा नेमकी काय आहे?

मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे छोट्या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मराठवाड्यातील अकरा मोठ्या धरणांमध्ये 90.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच 167.46 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील आज होणार पाऊस पाहता गोदावरी नदीत नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणीसाठा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जायकवाडीमधून पुन्हा दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.

जायकवाडी : 96 टक्के
निम्न दुधना : 72.03 टक्के
येलदरी : 93.83 टक्के
सिद्धेश्‍वर : 86.80 टक्के
माजलगाव : 60.06 टक्के
मांजरा : 95.54 टक्के
पैनगंगा (ईसापूर) : 98.81 टक्के
मनार : 100 टक्के
निम्न तेरणा : 95.10 टक्के
विष्णुपुरी : 70.00 टक्के
सीना कोळेगांव : 93.73

Advertisement
Topics mentioned in this article