9 hours ago

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असताना, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरीत भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर असून आज संत नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्यांदा पंढरपूर दौरा आहे. 
 

Jul 23, 2025 20:07 (IST)

Live Update : 24 ते 27 जुलै या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती

गुरुवार, दिनांक 24 जुलै 2025 ते रविवार, दिनांक 27 जुलै 2025 या कालावधीदरम्यान सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, दिनांक 26 जुलै 2025 रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात येत आहे. 

Jul 23, 2025 16:41 (IST)

Live Update : महाड-विन्हेरे मार्गावर एस.टी. बसला भीषण अपघात, 10 प्रवासी जखमी

महाड तालुक्यातील मांडवकर कोंड गावाच्या हद्दीत बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट झाडावर आदळली. या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 10 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

पुण्याहून महाड मधील फौजी आंबवडे गावाकडे निघालेली ही बस होती. अपघातानंतर सर्व जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jul 23, 2025 16:37 (IST)

Live Update : नागपुरात सिव्हिल लाइन्स परिसरा भर दुपारी मर्डर

नागपूरच्या पॉश सिव्हिल लाइन्स परिसरातील वेस्ट हायकोर्ट रोड परिसरात एका गॅरेज मध्ये राहणारी महिला रस्त्यावरून जात असताना अज्ञात इसमाने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून पळ काढला. मृत महिलेचे नाव माया मदन पसेरकर असून ती घटनास्थळीच मृत झाली. आसपासच्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Jul 23, 2025 14:04 (IST)

Live Update : वादग्रस्त विधान कोकाटेंना भोवण्याची शक्यता, अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

वादग्रस्त विधान कोकाटेंना भोवण्याची शक्यता, अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर टाच येण्याची शक्यता - सूत्र

Advertisement
Jul 23, 2025 13:16 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल, थोड्याच वेळात संत नामदेव पायरीकडे पोहोचणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल, थोड्याच वेळात मुख्यमंत्री संत नामदेव पायरीकडे पोहोचणार 

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पंढरपुरात दाखल

थोड्याच वेळात मुख्यमंत्री संत नामदेव पायरीकडे पोहोचणार

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल, थोड्याच वेळात संत नामदेव पायरीकडे पोहोचणार 

Jul 23, 2025 13:12 (IST)

Live Update : डोंबिवलीतील एमआयडीसीतील कापड प्रक्रिया कंपनीला आग

डोंबिवलीतील एमआयडीसीतील कापड प्रक्रिया कंपनीला आग 

कंपनीचे नाव ॲड्रोसिल 

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल 

आग विझवण्याचे काम सुरू 

आगीचे कारण अद्याप स्पष्ट

Advertisement
Jul 23, 2025 12:05 (IST)

Live Update : कोस्टल रोडवरील टनेलच्या आत नेव्हीची बस भिंतीला धडकली

कोस्टल रोडवर टनेलमध्ये अपघात झाल्याने सर्व गाड्या उलट्या दिशेने फिरत आहेत. टनेलच्या आत नेव्हीची बस भिंतीला धडकली. नेव्हीची बस वेगात होती. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने या बसचा ताबा सुटला आणि बस भिंतीला धडकली. 

Jul 23, 2025 11:40 (IST)

Live Update : कोकण किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचं तांडव, आज समुद्राला मोठी भरती

कोकण किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचं तांडव, आज समुद्राला मोठी भरती  

किनारपट्टी भागामध्ये साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा 

दोन दिवस किनारपट्टी भागामध्ये राहणार लाटांचा तडाखा

किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

मांडवी किनारी लगतच्या भागात अजस्त्र लाटा 

मांडवी जेटीलाही लाटांचा तडाखा

मांडवी येथील जोंधळ्या मारुती  मंदिरालाही लागलं समुद्राचे पाणी 

सकाळपासून आहे पावसाची संततधार

Advertisement
Jul 23, 2025 11:39 (IST)

Live Update : वसईत मिक्सर बनविणाऱ्या कंपनीला आग, सर्व सामान जळून खाक

वस‌ई पूर्वेला असलेल्या गौराईपाडा येथील शांती इंडस्ट्रियल मधील एस एल एम होम प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या मिक्सर बनविणा-या कंपनीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.  या आगीत कंपनीच्या गाळ्यांमध्ये ठेवलेले मिक्सर आणि टॉवर फॅन बनवण्याच्या मशीन्स, मोटर्स , न्यूट्री ब्लेंडर्स आणि त्यांचे पॅकिंग करण्याचे साहित्य, प्लास्टिक आणि पुठ्ठा इत्यादी कच्चामाल आगीत जळून खाक झाला आहे.  वस‌ई विरार महानगरपालिकेच्या आचोळे मुख्यअग्निशमन केंद्राला आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण  मिळवले. सदर आग शाॕकसर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Jul 23, 2025 11:38 (IST)

Live Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन

महाराष्ट्राच्या असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे,सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता करण्यास सरकार स्पष्टपणे नकार देत आहे. 

या असंवेदनशीलपणावर कळस म्हणून महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात ऑनलाईन जुगार खेळतानाचे चित्र समोर आले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रति इतके निष्काळजी असलेले कृषिमंत्री आपल्या महाराष्ट्राला नकोच... माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याच भाषेत "ओसाड गावची पाटीलकी" सोडून शेतकऱ्यांवर उपकार करावेत,मंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येतेय.

Jul 23, 2025 10:51 (IST)

Live Update : मराठवाड्यात जोरदार पाऊस, 11 मोठ्या धरणात 61.29 टक्के पाणीसाठा

गेल्या तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पाहायला मिळतोय. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा देखील वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 61.29 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी हाच पाणीसाठा 16.85 टक्के होता. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा 44 टक्के अधिक पाणीसाठा आहे. 

मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा

जायकवाडी : 78.34 टक्के

निम्न दुधना : 48.66 टक्के

येलदरी : 61.05 टक्के

सिद्धेश्‍वर : 31.89 टक्के

माजलगाव : 12.47 टक्के

मांजरा : 24.73 टक्के

पैनगंगा (ईसापूर) : 60.52 टक्के

मनार : 49.37 टक्के

निम्न तेरणा : 68.92 टक्के

विष्णुपुरी : 23.68 टक्के

सीना कोळेगाव : 50.50 टक्के

Jul 23, 2025 09:31 (IST)

Live Update : पुढील 3-4 तासांत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाचे संकेत

पुढील ३-४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही भागात वादळी वारा, मेघगर्जना अन् विजांचा कडकडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे- मंत्रालय आपत्कालीन नियंत्रण कक्ष

Jul 23, 2025 09:13 (IST)

Live Update : नाशिकमध्ये एसी बसमधील एसी बंद असल्याने प्रवाशांची घुसमट

नाशिकमध्ये एसी बसमधील एसी बंद असल्याने प्रवाशांची घुसमट

- कोल्हापूरहून नाशिककडे येणाऱ्या लबाईक या खाजगी बसमधील प्रकार 

- अनेकांना श्वास घेण्यासही त्रास झाल्याने प्रवासी संतप्त

- खाजगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची केली जाते फसवणूक 

- खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणे धोकेदायक झाल्याच्या प्रवाशांना व्यक्त केल्या भावना

Jul 23, 2025 09:09 (IST)

Live Update : कोकणकन्या एक्सप्रेसमधून तोड गेल्याने तरुण दगावला...

मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय 29) हा युवक मृत्यूमुखी पडला आहे. राहुल सावर्डेकर हा कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करत होता. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाला दिलेल्या माहितीनुसार राहून हा दरवाजाजवळ तोंड धुवत होता. त्यावेळी अचानक तोल गेल्याने तो रेल्वेच्या बाहेर पडला. एका दगडावर आपटला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच मृत्युमुखी पडला.

Jul 23, 2025 07:14 (IST)

Live Update : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

कोकणात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

गेल्या २४ तासांत सर्वत्र मुसळधार

राज्यात सोमवारी सकाळी ८:३० ते मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुरुड येथे १०८ मिमी, म्हसळा ८० मिमी, सोनपेठ १७५ मिमी, कुडाळ १०४ मिमी, सावंतवाडी ९८ मिमी, राजापूर ६६ मिमी, गुहागर ७४ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

Topics mentioned in this article