सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बानगंगा नदीने पूर रेषा ओलांडल्याने नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय नदी ओढे नाल्याद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेणे सतर्कता म्हणून 10 ठिकाणचे रस्ते बंद करण्याचे लेखी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी काही ठिकाची जाऊन स्वतः पाहणी केली. .
लातूरच्या अहमदपूरमध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा इथ वीज पडून दोघाजणांचा दुर्दैवी मृत्यू; सहा जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू... सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट
पुणे जिल्ह्यात पावसाने अजून एकाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यात पावसाने अजून एकाचा मृत्यू झाला आहे. भर पावसात झाड पडल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात ही घटना घडली आहे. पुण्यातील अलंकार पोलीस चौकीच्या जवळ झाड पडल्याने दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल श्रीकांत जोशी असं मृत तरुणाचं नाव आहे.
दौंडमध्ये जोरदार पावसामुळे भिंत कोसळली, महिलेचा मृत्यू
संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने कहर केला आहे. त्यातच दौंड शहरातही मुसळधार पाऊस झाला असून, पावसामुळे एका जुन्या इमारतीची भिंत कोसळून ती थेट एका वृद्ध महिलेच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सरकारी कर्मचाऱ्यांना चार वाजता घरी जाण्याचे आहेश
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुपारी चार वाजता सोडण्याचे आदेश. मुंबई ठाणे रायगडमध्ये रेड अलर्ट जारी केला असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केला आदेश.
मुसळधार पावसाचा खेड दापोली मार्गाला फटका
फुरुसमध्ये पुलाचं काम सुरू असल्याने जो पर्यायी मार्ग गेला नदीच्या प्रवाहात गेला वाहून
त्यामुळे खेड दापोली मुख्य मार्ग ठप्प, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली
अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ आल्याचं मनसेचा आरोप
संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मनसे नेते वैभव खेडेकर यांची मागणी
या जिल्ह्यांना दिला गेला आहे रेड अलर्ट
आज दिनांक 26/05/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मंडणगडमध्ये 24 तासांत 211.25 मिलिमीटर पावसाची नोंद, घर कोसळलं
मंडणगड तालुक्यात गेल्या 24 तासांत 211.25 मिलिमीटर पावसाची नोंद
मंडणगड तालुक्यातील वेसवी - वाल्मिकीनगर मधील एका घराच्या बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने काही घरांना धोका सुदैवाने जीवितहानी नाही. मात्र काही घरांना गेलेत तडे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
मंडणगड आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळाकडे रवाना. तर वेसवीमध्ये रस्त्यावर आलेल्या पाण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल.
Live Update : 27 मे सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुंबईला रेड अलर्ट, हवामान विभागाची माहिती
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी उद्या दिनांक - २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
Live Update : बेलापूरमध्ये मुसळधार पाऊस, विजांच्या गडगडांसह जोरदार पाऊस
बेलापूरमध्ये मुसळधार पाऊस, विजांच्या गडगडांसह जोरदार पाऊस
बेलापूरमधील रायगड भवन परिसर जलमय
रायगड भवनाच्या गेट समोर पाणीच पाणी
वाहनचालकांना पाण्यातून काढावा लागतो रस्ता
पावसामुळे वाहनचालकांचे हाल
Live Update : मुंबईसह 'या' 3 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
Live Update : मुंबईसह 'या' 3 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
Live Update : मेट्रो स्थानकातही पाणी शिरले
मेट्रो ३ प्रकल्प पाण्यात गेला
आरे ते वरळी मेट्रो सेवा सुरु
आचार्य अत्रे स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा बंद
मेट्रो स्थानकातही पाणी शिरले
Live Update : मुंबईतील नरिमन पॉइंट भागात सर्वाधिक पाऊस
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून व सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२ मिमी
ए विभाग कार्यालय २१६ मिमी
महानगरपालिका मुख्यालय २१४ मिमी
कुलाबा उदंचन केंद्र २०७ मिमी
नेत्र रूग्णालय, दोन टाकी २०२
सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाईन्स) १८०
मेमनवाडा अग्निशमन केंद्र १८३
ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी १७१
नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ १०३
सुपारी टँक, वांद्रे १०१
जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर ८२
एल विभाग कार्यालय, कुर्ला ७६
Live Update : एनसीपी उद्या सर्व आमदार जिल्हाध्यक्ष बैठक रद्द
एनसीपी उद्या सर्व आमदार जिल्हाध्यक्ष बैठक रद्द
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस यामुळे बैठक रद्द
अजित पवार यांनी बैठक रद्द केली
सर्व आमदार आणि जिल्हा अध्यक्ष यांना केल्या सूचना, मतदारसंघात नुकसान माहिती घ्यावी आणि कळवावी. मदत जिथ तिथ तात्काळ करा
Live Update : म्हसळा ते श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरकडे जाणारा मार्ग बंद
काल पासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून श्रीवर्धन तालुक्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. आणि या मुळेच नदी नाल्याच्या पाण्याला अडथळा आल्याने तालुक्यातील सखल भागात पाणी साचून जलजीवन विस्कळीत होते, अनेक मार्गाची वाहतूक ठप्प होते.
माणगाव ते श्रीवर्धन जाणाऱ्या मार्गांवरील म्हसळा येथून श्रीवर्धन कडे पुढे जाताना श्रीवर्धन पासून 3 किलोमीटर अलीकडून श्रीवर्धन व हरिहरेश्वर कडे जाणाऱ्या फाट्यावर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या भागातील रस्ता पाण्याखाली गेल्याने हरिहरेश्वरकडे व श्रीवर्धनकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या ठिकाणी रस्त्याच्या आजू बाजूला अनेक बांधकामे झाली असून त्यांनी केलेल्या माती भराव मुळे पावसाळी नाल्यामधून आलेले पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने याचा त्रास श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील या महत्वाच्या राज्यमार्गाला बसून वाहतूक ठप्प होते असल्याची नागरिकांमधुन बोलले जाते.
Live Update : मुंबई समुद्र किनाऱ्यावर 'हायटाइड', 15 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार
मुंबई समुद्र किनाऱ्यावर हायटाइड, १५ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार
नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
Live Update : पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबई शहराच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प
पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबई शहराच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प.
Live Update : मुंबई एपीएमसी बाजारातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी मुंबई एपीएमसी बाजारातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
एपीएमसी प्रशासन आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा.
परंतु, एपीएमसी फळ बाजार आणि भाजीपाला बाजारतील कचरा आणि गाळ यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा.
प्रशासनाने नालेसफाईच्या दावा केला असला तरी, नाल्यातील गाळ अजूनही रस्त्यावर पडून असल्याने एपीएमसी परिसरात घाणीचे साम्राज्य
Live Update : नवी मुंबई महापालिका यंत्रणा अलर्ट मोडवर
रात्रीपासून पडणाऱ्या संतत पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले असून आज सकाळी लवकरच सर्व विभागप्रमुख व विभाग अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी कार्यरत झाले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणताही प्रकारच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 022-27567060 किंवा 022-27567061 या क्रमांकावर अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे
Live Update : मुंबईत मुसळधार, सीएसएमटीच्या दिशेने जाणारी हार्बर रेल्वे ठप्प
मुंबईत मुसळधार, सीएसएमटीच्या दिशेने जाणारी हार्बर रेल्वे ठप्प
मध्य रेल्वे - भायखळा रेल्वे स्टेशनवर तीन ते चार इंचाचं पाणी साचल्यामुळे लोकल विलंबाने धावत आहेत.
हार्बर रेल्वे ठप्प - वडाला ते सीएसएमटी स्थानकावर ८ इंचापेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. वडाळा ते पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू
Live Update : राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस, नागरिकांनी खबरदारी घ्यावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे निर्देश त्यांनी दिले.
संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी,तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा यावर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारतीत संदर्भात देखील काळजी घ्यावी, मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू कशी राहील, किंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क रहावे असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले
हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे.
राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
Live Update : मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानक पाण्याखाली
मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानक पाण्याखाली..
मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर पाणी साचलं आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
Live Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा कहर..सर्वाधिक पाऊस दौंड मध्ये...
पुणे जिल्ह्यात पावसाचा कहर..सर्वाधिक पाऊस दौंड मध्ये, इथे 98 मी.मी. तर लोणावळ्यात 76.मी.मी. आणि बारामतीत 49.5 मीमी पावसाची नोंद
पुणे पाऊस(मिमी) 09:30 PM 25.05.2025,
दौंड 98.0
लोणावळा 76.0
बारामती 49.5
धामधरे 35.5
वडगावशेरी 34.0
निमगिरी 28.0
मालिन 27.0
हडपसर 25.0
बल्लाळवाडी 18.5
नारायणगाव 17.0
डुडुळगाव 12.5
मगरपट्टा 8.0
लवासा 6.0
राजगुरुनगर 5.5
कोरेगाव पार्क 5
भोर 5
NDA 3.5
तळेगाव 2.5
पुरंदर 0.5
Live Update : मराठवाड्यात येत्या 5 दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा
मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. गेल्या 20 दिवसांपासून सुरू झालेला पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात आता हवामान विभागाने पुढील 5 दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मे महिन्यात 13 मिमी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात यंदा 132 मिमी इतका पाऊस पडला आहे, जो 1030 टक्के जास्त आहे. ज्यात सर्वाधिक पावसाची नोंद लातूर जिल्ह्यात झाली असून, येथे 193.4 मिमी पाऊस झाला आहे. तर त्या खालोखाल धाराशिव जिल्ह्यात 167.5 मिमी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले असून धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.
Live Update : चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली...
सततच्या पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन दगडी पुलासह पाच बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिर आहे आणि संपूर्ण वाळवंटाला देखील पाण्याने वेढा दिलाय. चंद्रभागा नदी 45 हजार क्युसेक्स इतक्या क्षमतेने प्रवाहित होत आहे. तर पूर सदृश्य परिस्थिती पंढरपुरात निर्माण होत आहे
Live Update : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका!
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतीची पिकं पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून येतं आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी खरी मान्सून हजेरी लावण्यासाठी उशीर होतो आहे.
शेतकरी खरिपाच्या तयारीत व्यस्त असताना, सततच्या पावसामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी उघडप न मिळाल्यास खरिपाच्या पेरण्या खोळंबण्याची शक्यता आहे.
Live Update : नवी मुंबईत पाऊस जोरदार सुरुवात
नवी मुंबईत पाऊस जोरदार सुरुवात
वाशी खारघर पनवेल पावसाची हजेरी
विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू
Live Update : बीड जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पाऊस सुरूच
बीड जिल्ह्यात आठ दिवसांपासून विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे. मे महिन्यात पावसाला सुरुवात होणे ही प्रथमच घडलेली घटना आहे. या पावसामुळे बीडमधील बालाघाटाच्या पर्वत रांगा हिरवी शालू घेऊन नटल्या आहेत. या नैसर्गिक बदलाचा सर्वात मोठा आनंद वन्यजीवांना झाला आहे. अनेक पक्षी, प्राणी आता मोकळ्या वातावरणात दिसू लागले आहेत. मोर पक्षी विशेषतः यामध्ये लक्ष वेधून घेत आहेत. मोर पक्षी मोठ्या आनंदात बागडत आहेत. पावसामुळे वातावरणात बदल झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
Live Update : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात प्रसिद्ध श्रीरामाच्या मंदिराचा काही भाग कोसळला
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील तानाजी चौक परिसरात असलेल्या प्रसिद्ध श्रीरामाच्या मंदिराचा काही भाग रविवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे कोसळलाय. हे मंदिर पुरातन असून या मंदिरापासून निघणाऱ्या रामरथाची अनेक वर्षांपासूनची पंरपरा आहे.
Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस हा ऑरेंज अलर्ट जारी असणार आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात 58.25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी 466 मिलिमीटर पाऊस पडला आहे. चोर कुडाळ मध्ये सर्वाधिक 74 मिलिमीटर पाऊस पडला आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस
दिनांक - 26/05/2025
१) दोडामार्ग 66 mm
२) सावंतवाडी 49 mm
३) वेंगुर्ला 39 mm
४) कुडाळ 74 mm
५) मालवण 43 mm
६) कणकवली 69 mm
७) देवगड 58 mm
८) वैभववाडी 68 mm
आजचा एकूण पाऊस = 466
आजचा सरासरी पाऊस = 58.25
Live Update : महाड ते रायगड किल्ला मार्ग खचला...
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड वर जाणाऱ्या महाड ते रायगड महामार्गावरील कोंझरच्या वर असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने या ठिकाणी बांधण्यात येत असलेली मोरी व नजीकचा बायपास मार्ग खचला असून या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. काल पासून रायगड मध्ये जोरदार पाऊस चालू असून रात्री काही काळ बंद नंतर मध्यरात्री 3 नंतर पावसाने अनेक ठिकाणी जोर धरला आहे.
Live Update : 12 तासात उजनी धरणात चार टीएमसी पाणी, उजनी धरण सात टक्क्यांनी वाढलं
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनि असणाऱ्या उजनी धरणात तब्बल 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. तर धरण सात टक्क्यांनी वधारलेला आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणात 55 टीएमसी पाणी होते तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात 59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर उजनी धरण वजा सात टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 18 हजार क्युसेक्य इतका विसर्ग येतोय. तर रात्रभरात उजनी धरण क्षेत्रात आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.. त्यामुळे उजनी धरण सततच्या पावसामुळे लवकरच वजाक्षमतेतून प्लस मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
Live Update : पुण्याच्या भीमाशंकर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू ....
पुण्याच्या भीमाशंकर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू ....
- पहिल्या पावसातच भीमा नदीला पूर
- खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटला..
- रात्रभर पाऊस पडत असल्याने पूल कम बंधारा पाण्याखाली ..
Live Update : रस्त्यावरील पावसाच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून...
पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला असताना माळशिरसमध्ये रस्त्यावर असलेल्या पावसाच्या पाण्यात चक्क बैलगाडी वाहून गेली आहे. नातेपुते ते तिरळे रोडचे काम चालू आहे.. पावसामुळे या रोडच्या कामावर मोठे खड्डे पडले परिणामी सखल भागात पाणी साचले गेले. याच पाण्यात आता बैलगाडी वाहून गेली आहे. खताची 15 पोती वाहून नेणारी बैलगाडी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रसंगावधान साधून स्थानिक आसपासच्या शेतकऱ्यांनी बैलास व शेतकऱ्यास वाचवले आहे. मात्र यामध्ये खते वाहून गेले आहेत तर बैलगाडी काढण्याचे प्रयत्न स्थानिकांनी केले आहेत. धोंडीबा इजूगडे असे बैलगाडी पाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Live Update : मुंबईत सध्या कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल या भागात जोरदार पाऊस
मुंबईत सध्या कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल या भागात पाऊस पडत आहे.
हवामान खात्याने मुंबईत पुढील काही तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईकरांना सकाळी मुसळधार पावसाने सुरुवात होऊ शकते. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की पुढील काही तासांत सातत्याने पाऊस सुरू राहू शकतो. पावसाच्या तीव्रतेमुळे शहरातील काही खालच्या भागात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बीएमसीने नागरिकांना आवाहन केले आहे की अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. काल रात्री मुसळधार पावसामुळे काही क्षेत्रात पाणी साचल्याचे दिसून आले होते.
Live Update : खोपोली पेण रोडवरील साजगाव फाट्यावर मोठे झाड पडलं
25 मे रोजी मध्यरात्रीनंतर खोपोलीसह खालापूर तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे खोपोली पेण रोडवरील साजगाव फाट्यावर मोठे झाड पडल्याने खोपोली पेण रोडसह खोपोली अडोशी रोड ठप्प झाला आहे.
तिन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मात्र रात्री पासून पहाटे वाहतूक कमी असल्याने फारसा फरक पडला नाही.
या ठिकाणी खोपोली फायर ब्रिगेड व हेल्प फाऊंडेशनच्या टीमने मदत कार्य करत पहाटेपर्यंत झाड तोडून अंशत: रस्ता मोकळा केला.
अद्याप ही पूर्ण झाड बाजूला करण्यात यश आले नसल्याने अवजड वाहतूक बंद आहे. मात्र मदत कार्य चालू आहे.
Live Update : पावसामुळे मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिट उशीराने...
पावसामुळे मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिट उशीराने...
Live Update : दौंडच्या स्वामी चिंचोलीत दहा घरांमध्ये शिरलं पाणी, घरातील साहित्य जीवनावश्यक वस्तूंची नासाडी
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील साधारणपणे दहा घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत याचा परिणाम म्हणून स्वामी चिंचोली गावातील जवळपास दहा घरांमध्ये हे पावसाचं पाणी शिरलंय. त्यामध्ये घरातील धान्याची पोती भिजलेली गेली आहेत जीवनावश्यक वस्तूंचे देखील नुकसान झाल आहे.
या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्या जात असून थोड्याच वेळा या ठिकाणी पथक देखील दाखल होणार आहे. परिस्थिती काहीशी निवळलेली असून येण्या-जाण्याच्या रस्त्यावरील पाणी ओसरल्याने ग्रामस्थ ये-जा करू शकत आहेत.
Live Update : मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गांवर ट्रकचा अपघात, एक ठार
खालापूर तालुक्यातील वावंढळ गावाजवळ. मुंबई पूणे जुन्या हायवे वरील पुलावरून स्टील कॉईलचा ट्रक पलटी होऊन पुलावरून खाली कलंडला. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला. या ट्रकमध्ये चालक मृत अवस्थेत होता. चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ट्रक हायड्राच्या साहाय्याने सरळ करण्यात आला असून घटनास्थळी खालापूर पोलीस व हेल्प फौंडेशनच्या टीमने मदतकार्य केले.
Live Update : खडपोली नदीपात्रात अडकलेल्या तिघांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला यश
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील नदीपात्रात अडकलेल्या तिघांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला यश आलं आहे. संतोष पवार, त्याची पत्नी सुरेखा पवार आणि पुतण्या ओंकार पवार अशी बचावलेल्या तिघांची नावं आहेत. हे तिघेही दळवटणे येथील आहेत..
हे तिघेही नदीमध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्यात वाढ झाली. त्यामुळे ते नदीपात्रातील एका बेटावर अडकले. या सगळ्या घटनेची तातडीने दखल घेत चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने बचावकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या तीन नागरिकांना बाहेर काढण्यात आले.