Maharashtra Rain News: राज्यभरात आज दहिहंडीचा उत्साह आणि जल्लोष सुरु असतानाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये घरात पाणी शिरल्याने, रस्ते बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्यानेही अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे मुसळधार पाऊस झाला असून मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारात शहरातून वाहणाऱ्या धरणी नाल्याला पूर आल्याने अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले असून घराबाहेर उभी असलेली वाहनेही पाण्यात बुडाली. नाल्याला सुरक्षा कठळी नसल्याने नुकसान वाढली असून देवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगांव तालुक्यातील कोथाळा,साळेगाव,मोगरा, डाके पिंपरी,खतगव्हाण , उपरी,सिमरी पारगाव,पात्रुड ,नित्रुड , गंगामसला,किट्टी आडगाव,टाकरवण तालखेड , काल अचानक जोराचा पाऊस झाल्याने या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस काही भागात झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओढे वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. तर शेतामध्ये देखील पाणीच पाणी साचल्याच पाहायला मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप आले आहे. उभी पिकं पाण्यामध्ये दिसत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यात काल सायंकाळी पुन्हा जोरदार मुसळधार पाऊस झाला असून या दोन तालुक्यातील काही गावांना चालू हंगामात चौथ्यांदा पुराचा फटका बसला आहे.काल सायंकाळी सर्वाधिक मोठा फटका रिसोड तालुक्यातील केनवड, कुकसा, महागाव, पाचंबा, गणेशपूर, बोरखेडी इतर गावाला बसला तर मालेगाव तालुक्यातील वाघी, खंडाळा, शिरपूर, या भागातही जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळं बोरखेडी - गणेशपूर, खंडाळा -वाघी, केनवड - गणेशपूर हे मार्ग काहीवेळ बंद होते मात्र आता या मार्गावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानं या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
LIVE Update: मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! रस्त्यांवर पाणीच पाणी